हनीवेलच्या एअर टच i9च्या साथीने घरातील हवा शुद्ध बनवा

Screenshot_20190112_132502– या क्षेत्रासाठी नव्या स्मार्ट आय तंत्रज्ञानाने सुसज्ज

Mumbai (GPN) : हनीवेल एअर टच i9 (Honeywell Air Touch i9)मध्ये आहे रिअल टाइम PM2.5 डिस्प्ले, वापरकर्त्यांच्या गरजा जाणणारे, वापरायला सुलभ असे टच कंट्रोल्स, उच्च दर्जाची सफाईदार बांधणी आणि पॉलि कार्बोनेटपासून बनलेली अत्यंत टिकाऊ बॉडी. अशा सर्व वैशिष्ट्यांमुळे एअर टच i9 आपल्या गरजांनुसार सहज हाताळता येतो. एअर टच i9 हे उपकरण या क्षेत्रामध्ये प्रथमच वापरल्या गेलेल्या स्मार्ट आय तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे तंत्रज्ञान घराच्या आतील हवा किती प्रदूषित आहे हे स्वत:च ठरवते व त्यानुसार स्वयंचलित पद्धतीने चालते. यामुळे विजेची बचत होते आणि फिल्टरही दीर्घकाळ चालतो.

या एअर प्युरिफायरच्या रचनेमध्ये खणासारख्या एका आगळ्या कप्प्याचाही समावेश करण्यात आला आहे, ज्यामुळे फिल्टर काढणे, तो पुन्हा बसविणे यांसारखी कामे अत्यंत सोपी होऊन जातात. एअर टच i9 हे उपकरण 415 चौ. फू. आकारापर्यंतच्या खोलीसाठी आदर्श आहे. हवेचा दर्जा दाखविणा-या एलईडी डिस्प्लेवरील रंग खोलीतील हवेच्या दर्जानुसार लाल, पिवळा आणि निळा असे बदलत जातात. यंत्राच्या तळाची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे, जेणेकरून ते चुकून खाली पडल्यास आतील मशीन सुरक्षित राहते. त्याचबरोबर यातील 3D झिरो-ब्लाइंड-अँगल एअर फ्लोची रचना अशाप्रकारे करण्यात आली आहे, ज्यामुळे खोलीच्या अपेक्षित भागाच्या कानाकोप-यामध्ये जास्तीत-जास्त हवा पोहोचते.

एअर टचमध्ये बहुस्तरीय फिल्टरेशन प्रक्रियेचा वापर करण्यात आला आहे. यात हनीवेलचे पेटंटप्राप्त Hisiv तंत्रज्ञान, HEPA फिल्टर आणि एक प्री-फिल्टर अशा तीन चाळण्या आहेत, ज्यामुळे हे यंत्र घराच्या आतल्या वायूप्रदूषणाशी परिणामकारकरित्या दोन हात करते. या तिन्ही चाळण्यांमुळे या फिल्टरमधून पार होणा-या घरातल्या हवेतील दूषित घटक 99 टक्क्यांहून अधिक प्रमाणात दूर होतात. संपूर्णपणे ‘ओझोन फ्री’ अशा एअर टच i9 मध्ये वापरलेल्या फिल्टरेशन तंत्रज्ञानामुळे कोणतेही अपायकारक वायू उत्सर्जित होत नाहीत.

एअर टच i9

प्लग करा. विसरून जा.

उत्पादनाची वैशिष्ट्ये:

  • खोलीतील वायूप्रदूषणाची पातळी ओळखून त्यानुसार यंत्र स्वयंचलित पद्धतीने चालविणारी स्मार्ट आय टेक्नॉलॉजी.
  • रिअल-टाइम PM2.5 लेव्हल डिस्प्ले
  • ताशी 300 cu m इतका CADR, 415 चौ. फुटांपर्यंतच्या जागेसाठी सुयोग्य
  • तीन टप्प्यांमध्ये काम करणारी प्रगत फिल्टरेशन यंत्रणा 99 टक्क्याहून अधिक कार्यक्षमतेने हवेतील दूषित घटक दूर करते
  • जास्तीत-जास्त हवा पार होण्यासाठी 3D एअर फ्लो रचना
  • 100% ओझोन मुक्त – फिल्टरेशन प्रक्रियेचा परिणाम म्हणून कोणतेही अपायकारक वायू उत्सर्जित होत नाहीत
  • उच्च दर्जाची सफाईदार बांधणी आणि पॉलिकार्बोनेटने बनलेली अत्यंत टिकाऊ बॉडी

रु. 22,990

या यंत्राचे आणखी एक छाप पाडणारे वैशिष्ट्य म्हणजे ते स्लीप मोडमध्ये असताना वापरली जाणारी साऊंड रिस्ट्रेन्ड फंक्शनिंग ही यंत्रणा. या यंत्रणेद्वारे स्लीपमोडमध्ये पंख्याचा वेग आपोआपच कमी होतो व त्याचबरोबर इंडिकेटरवरचे लाइट्ससुद्धा बंद होतात.

हनीवेल एअर टच i9 मध्ये इन्टूइटिव्ह (वापरकर्त्यांच्या गरजांनुसार आपोआपच काम करणारे) यंत्रणा आणि वापरायला सुलभ रचना यांचा मोठा आकर्षक मिलाफ झाला असून त्याला तत्परतेने हवा शुद्ध करणा-या दमदार कामगिरीची जोड मिळाली आहे. त्यामुळे हे यंत्र आधुनिक भारतीय घरांसाठी अगदी सुयोग्य असेच आहे.

हनीवेल एअर टच i9 हे क्रोमा आणि भारतभरातील इतर सर्व प्रमुख किरकोळ विक्री केंद्रांमध्ये उपलब्ध आहे.

हनीवेल बिल्डिंग टेक्‍नोलॉजीज विषयी:

हनीवेल बिल्डिंग टेक्‍नोलॉजीज (एचबीटी) हा जागतिक व्‍यवसाय असून त्‍यांचे २३,००० हून अधिक कर्मचारी आहेत. एचबीटी निर्माण करत असलेली उत्‍पादने, सॉफ्टवेअर व तंत्रज्ञाने जगातील १० दशलक्षहून अधिक इमारतींमध्‍ये दिसून येतात. व्‍यावसायिक इमारतींचे मालक आणि कर्मचारी आमच्‍या तंत्रज्ञानांचा वापर करतात. ज्‍यामधून त्‍यांना त्‍यांच्‍या सुविधा सुरक्षित, ऊर्जा कार्यक्षम, स्थिर व उत्‍पादनक्षम असण्‍याची खात्री मिळते. हनीवेल बिल्डिंग टेक्‍नोलॉजीजबाबत अधिक बातमी व माहितीसाठी http://www.honeywell.com/newsroom येथे भेट द्या.

हनीवेल इंडिया विषयीः

हनीवेल (www.honeywell.com) ही फॉर्च्युन १०० सॉफ्टवेअर-औद्योगिक कंपनी जगभरातील ग्राहकांना एअरोस्पेस व ऑटोमोटिव्ह उत्पादने व सेवा; इमारती, घरे आणि उद्योगांना कंट्रोल टेक्नोलॉजिज; टर्बोचार्जर्स; आणि परफॉर्मन्स मटेरियल्स देऊ करणारी तंत्रज्ञान व निर्माण क्षेत्रातील आघाडीची कंपनी आहे. आमची तंत्रज्ञाने एअरक्राफ्ट, कार्स, घरे व इमारती, उत्पादन केंद्रे, पुरवठा शृंखला अशा प्रत्येक निर्माणासाठी मदत करतात आणि आमचे कर्मचारी अधिक सहयोगी होत आमचे निर्माण कार्य स्मार्टर, सुरक्षित व अधिक स्थिर करतात. हनीवेलच्या जागतिक व्यवसायाला भारतातील गेल्या आठ दशकांपासून सुरू असलेल्या व्यवसायाचा भक्कम पाया लाभलेला आहे. त्यांच्या भारतातील सात अत्याधुनिक निर्माण व इंजिनीयरींग प्रकल्पांतून आणि तंत्रज्ञान विकास व प्रयोग यांच्याकरिता स्थापन करण्यात आलेल्या पाच जागतिक सेंटर्स ऑफ एक्सेलन्समधून हनीवेलची भारताप्रती वचनबद्धता दिसून येते. हनीवेलमध्ये बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, गुरगाव, हैद्राबाद, मदुराई, पुणे आणि वडोदरा यांसह ५० ठिकाणच्या कार्यालयांमध्ये जवळपास १५,००० कर्मचारी काम करतात. हनीवेल इंडियाविषयी अधिक माहिती मिळवण्याकरिता कृपया https://honeywell.com/country/in/ ला भेट द्या.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.