मुंबई, 28 जानेवारी, 2023 (GPN) : दक्षिण आशियातील प्रीमिअर एक्स्प्रेस हवाई, एकात्मिक वाहतूक व वितरण कंपनी असलेल्या ब्लू डार्ट एक्स्प्रेस लिमिटेडतर्फे 31 डिसेंबर, 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमीहीचे आर्थिक निकाल मुंबईतील संचालक मंडळाच्या बैठकीत जाहीर केले. 31 डिसेंबर, 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीसाठी कंपनीने ₹86.93 कोटी करोत्तर नफ्याची नोंद केली (आधीच्या वर्षी याच तिमाहीसाठी ₹122.18 कोटी इतका करोत्तर नफा नोंदविला होता). 31 डिसेंबर 2022 रोजी समाप्त झालेल्या तिमाहीचे उत्पन्न ₹1,337 कोटी इतके नोंदविण्यात आले. ही गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेने 6.6% वाढ आहे. या तिमाहीसाठी ईबीआयटीडीए ₹164.53 कोटी इतका नोंदविण्यात आला तर ईबीआयटीडीए मार्जिन 12.3% होते. कामगिरीतील ठळक मुद्दे : आर्थिक वर्ष 22-23 ची तिमाही वि. आर्थिक वर्ष 21-22 ची तिमाही स्वतंत्र एकत्रित Q3 22-23 Q3 21-22 Q3 22-23 Q3 21-22 परिचालनातून मिळविलेले उत्पन्न (₹कोटी) 1,337.08 1,254.75 1,337.08…