अदानी ठरले २०० एमएमटी कार्गोचे दळणवळण करणारे पहिले भारतीय पोर्ट ऑपरेटर

Screenshot_20190403_120948

या महत्त्वाच्या टप्प्यामुळे एपीएसईझेड जगातील आघाडीच्या पाच पोर्ट कंपन्यांमध्ये सामील

Screenshot_20190403_120911

अहमदाबाद, २७ मार्च २०१९: भारतातील पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावरील ९ वेगवेगळ्या बंदरांच्या दिशेने निघालेल्या सुमारे दोन डझन जहाजांसाठी गुरुवार, २१ मार्च हा दिवस नेहमीसारखाच होता.

पण, इथे काम करणाऱ्या हजारो लोकांना ही कल्पनाही नव्हती की, ते एक इतिहास रचत आहेत.याच दिवशी, या बंदरांचे कामकाज पाहणाऱ्या अदानी पोर्टस् अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन लि. (एपीएसईझेड) या भारतातील सर्वात मोठ्या खासगी पोर्ट ऑपरेटर कंपनीने २०० मिलियन मेट्रिक टन (एमएमटी) कार्गो मुव्हमेंटचा महत्त्वाचा टप्पा गाठला. या टप्पा गाठणारी ही पहिली भारतीय पोर्ट ऑपरेटर कंपनी आहे. हा प्रवास खरेतर सोपा नव्हता. कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कामावरील त्यांची श्रद्धा या बळावर कंपनीने अनेक अडथळे पार केलेत.

२००१ साली अदानी पोर्ट्सने आपले कामकाज सुरू केले. खरेतर त्यावेळी या क्षेत्रात खासगी कंपन्या काम करतात, हे ऐकिवातही नव्हते. या कामातील तांत्रिक आणि आर्थिक मागण्या प्रचंड होत्या. मात्र, प्रचंड श्रद्धा आणि निष्ठेने एपीएसईझेडने या अज्ञात क्षेत्रात धाडसी उडी घेतली. यातूनच, आज दोन दशकांनंतर एपीएसईझेड ही जगातील आघाडीच्या पोर्ट ऑपरेटर्स कंपन्यांमध्ये गणली जाते.

“हा टप्पा २०२० पर्यंत गाठण्याची आमची योजना आणि अंदाज होता. पण, आम्ही वेळेआधीच हे लक्ष्य गाठले. अत्यंत परिणामकारक कार्यचलन आणि मालमत्ता व स्रोतांचा पुरेपूर वापर यामुळेच हे शक्य झाले. धामरा आणि मुंद्रा अशा आमच्या आघाडीच्या बंदरांवर क्षमतेमध्ये करण्यात आलेली दमदार वृद्धी आणि एन्नोर व कट्टूपल्लीसारखी नवी बंदरे विकसित करून दुर्गम आणि अविकसित भागांमध्ये अस्तित्व निर्माण करणे याचा या प्रवासात फार मोठा वाटा आहे,” असेएपीएसईझेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.करण अदानी म्हणाले. एकात्मिक लॉजिस्टिक कंपनी म्हणून् पडलेली मोलाची भर आणि कोळशाची सामुद्री वाहतूक यामुळेही कंपनीच्या प्रवासाला बळकटी मिळाल्याचे त्यांनी नमूद केले.

कंपनीची सुरुवात मुंद्रा बंदरावरून झाली. पुढे या यादीत अनेक नावे जोडली गेली. हाजिरा, धामरा,दहेज आणि नुकतेच कट्टुपल्ली येथे कमी महत्त्वाची बंदरे विकसित करण्यात आली. एन्नोर,कांडला, गोवा आणि विझाग अशा देशातील महत्त्वाच्या बंदरांवर २००५ ते २०१८ या काळात टर्मिनल्स उभारली गेली. मुंद्रा बंदर आजही कंपनीच्या यशोशिखरातील माणिक आहे. मात्र,२०० एमएमटी कार्गोचा टप्पा कोणत्याही एका बंदरामुळे गाठला गेलेला नाही. सानिध्यता आणि उत्तर-पश्चिम भागातील दुर्गम भागाला जोडणारी रेल्वे/रस्त्यांचे व्यापक जाळे, बंदरांवरील अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि साधने,जहाजांसाठी शून्‍य मिनिटांचा प्रतिक्षा काळ, जलद टर्न-अराऊंड वेळ आणि स्पर्धात्मक दर यामुळे अदानी पोर्ट्सच्या या नेत्रदिपक यशात भर पडली आहे.

हे यश म्हणजे कार्गोच्या संख्येमागे केलेली ही निरुद्देश पळापळ नाही, तर परिणामकारकता,शाश्वतता, तंत्रज्ञान आणि इतर साधनांचा वापर करत उच्च कार्यक्षमता मिळण्यावर लक्ष केंद्रीत करत गाठलेली सुयोग्य अशी प्रगती आहे. बंदरांवर आणि आसपासच्या भागात राबवलेले शाश्वतता उपक्रम समाजघटकांच्या प्रगतीला कारणीभूत ठरले आणि बंदारांच्या आसपासच्या भागात एक संतुलित परीसंस्था उभी राहिली. सुरक्षा आणि शाश्वततेप्रति बांधिलकी जपत एपीएसईझेएलने भारतात आजवर माहीत नसलेल्या eRTGs सारखे उपक्रम राबवले आहेत.

“भारताच्या आर्थिक बदलांमध्ये बंदरे क्षेत्राचा किती मोठा वाटा आहे, हे आमच्या या यशातून स्पष्ट झाले आहे. देशाचा ९० टक्के व्यापार (व्याप्तीच्या अनुषंगाने) सामुद्री मार्गांवर अवलंबून आहे. हा महत्त्वाचा टप्पा, राष्ट्र उभारणीत आम्ही करत असलेल्या प्रयत्नांचे द्योतक आहे,” असे श्री. करण अदानी म्हणाले. कंपनीने १००,०००हून अधिक रोजगार दिले असून २५०००हून अधिक विद्यार्थी आणि २००,०००हून अधिक लोकांच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम घडवला आहे.

प्रगतीच्या मार्गावर पुढे जात असताना एपीएसईझेने २०२५ पर्यंत आपली प्रगती दुप्पट करून ४०० एमएमटीपर्यंत पोहोचण्याच्या उच्च ध्येयावर लक्ष्य केंद्रीत केले आहे. पारंपारिक व्यवसाय प्रक्रियेला नव्या युगातील डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्यासाठी तंत्रज्ञानावर आधारित नाविन्यतेमुळे हे लक्ष्य गाठणे फारसे कठीण भासत नाही. फ्लीट आणि फ्युअल (ताफा आणि इंधन) व्यवस्थापन,मालमत्तांची देखरेख, प्रक्रियांचे डिजिटलायझेशन,गतीशिलता, कार्यचलनातील इंटेलिजन्स आणि कार्यपद्धतीच्या परफॉर्मन्सवर देखरेख… साधारण वर्षभरापूर्वी सुरू केलेल्या या प्रयत्नांची आता फळे मिळू लागली आहेत.

“नजीकच्या भविष्यकाळात टर्नअराऊंड टाइम कमी करणे, साधनांची भर न करता व्यवहारांचे प्रमाण वाढवणे आणि अनुप्तादक फेऱ्या टाळून इन-ट्रान्झिट व्हिसिबिलिटी युटिलायझेशन वाढवणे अशा काही फायदेशीर गोष्टींवर लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या सगळ्यात आमच्या ग्राहकांसाठी एक गोड बातमी आहे. आता त्यांना त्यांच्या सोयीच्या ठिकाणी बसून कामाची ‘रीअल-टाइम’माहिती मिळू शकेल,” असे श्री. करण अदानीम्हणाले.

अदानी पोर्टस् अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन

अदानी पोर्टस् अॅण्ड स्पेशल इकॉनॉमिक झोन(एपीएसईझेड) ही जागतिक स्तरावरील बहुआयामी अदानी ग्रुपचा एक भाग आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठी पोर्ट डेव्हलपर आणि ऑपरेटर आहे. दोन दशकांहून कमी कालावधीत या कंपनीने बंदरांच्या सुविधा आणि सेवा यात एक भक्कम स्थान निर्माण केले आहे. एपीएसईझेडची मोक्याच्या १० ठिकाणी बंदरे आणि टर्मिनल्स आहेत – गुजरातमध्ये मुंद्रा, दहेज,कांडला आणि हाजिरा, ओदिशामध्ये धामरा, गोव्यात मोरमूगाव, आंध्रप्रदेशात विशाखापट्टणम, चेन्नईमध्ये कट्टूपल्ली आणि एन्नोर. यामुळे देशाच्या एकूण बंदर क्षमतेत या कंपनीचा २४ टक्के सहभाग आहे.किनारपट्टीचा प्रदेश आणि आसपासच्या विस्तृत प्रदेशाची मोठ्या प्रमाणावरील कार्गोचे व्यवस्थापन ही कंपनी पाहते. कंपनी केरळमध्ये विझिंजम येथे ट्रान्सशिपमेंट पोर्टही विकसित करत आहे.

अधिक माहितीसाठी कृपया संपर्क वेबसाइट –www.adaniports.com

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.