October 2019





पांढरा कांदा उत्पादकांचा कुंभमेळा… ‘जैन फार्म फ्रेश’ या कंपनीतर्फे देशभरातील १४ शेतकऱ्यांना ‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ प्रदान सोहळा

पांढरा कांदा उत्पादकांचा कुंभमेळा … मुंबई, 16 ऑक्टोबर, 2019 (GPN): जळगावस्थित जैन उद्योग समुहातील भाजीपालानिर्जलीकरण आणि मसाला निर्मिती करणाऱ्या ‘जैनफार्म फ्रेश’ या कंपनीतर्फे देशभरातील १४ शेतकऱ्यांना‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’प्रदान सोहळा ०४ हजारावर शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्तगर्दीत सोमवारी (दि. १४) झाला. कांदा उत्पादकशेतकऱ्यांचा परिसर म्हणून नाशिक, मालेगाव, कळवण, सटाणा, पिंपळगाव हा परिसर ओळखला जातो. परंतु, गेल्या २० वर्षांत खानदेशच्या तीन जिल्ह्यांसह गुजरात वमध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमधील गावांमध्ये पांढराकांदा उत्पादकांची चळवळ ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीनेउभी केली आहे. कंपनीचे 60 वर प्रतिनिधी ‘ जैन ग्रामसेवक’ च्याजबाबदारीतून शेतकऱ्यांना पांढरा कांदा उत्पादनासाठीप्रेरित करीत आहेत. ‘जैन फार्म फ्रेश कंपनी’ ने यासाठी‘करार शेती’ पॅटर्न अवलंबिला आहे. या अंतर्गतशेतकऱ्यांना बियाणे पुरवठा, लागवड व संगोपन तंत्रआणि उत्पादन हाती आल्यानंतर त्याची ठरलेल्याकिमान हमीभाव आणि वाढीव बाजार भाव असेल तरवाढीव भावाने खरेदीची शाश्वत हमी कंपनीने स्वीकारलीआहे. गेली १९ वर्षे म्हणजे सन २००१ पासून कंपनी हीजबाबदारी निभावत आहे. पांढरा कांदा हा निर्जलीकरणासाठी उपयुक्त मानलाजातो. त्यातील पोषक घटक हे टीकाऊ आणिवापराच्यावेळी सहजपणे पुनर्स्थापित होतात. ‘जैन फार्मफ्रेश’ कंपनीने जळगाव येथे जैन व्हैली परिसरातभाजीपाल्यावर प्रक्रिया करण्याचा आणि मसालेनिर्मितीचा जगभरातील सर्वांत मोठा प्रकल्प उभारलाआहे. यात पांढरा कांढा हे उत्पादन सर्वांत गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीने पांढराकांदा उत्पादकांची अनोखी चळवळ उभी केली आहे. शेती क्षेत्रात एखाद्या कंपनीच्या पुढाकाराने पीकपध्दतीत शेतकऱ्यांनी केलेल्या बदलाचे हे उत्तमउदाहरण आहे. शेत शिवारपर्यंत पोहचून कांदाउत्पादकांना सहाय्य व मार्गदर्शन करणाऱ्या प्रतिनिधींना‘जैन ग्रामसेवक’ असे संबोधन देऊन त्यांची कार्यक्षमफळी कंपनीने उभी केली आहे. पांढरा कांदाउत्पादकांमध्ये कंपनीने निर्माण केलेला आत्मविश्वासआणि परस्परांवरील विश्वासाचे अतूट नाते सोमवारीपुरस्कार वितरण सोहळ्यात सहकुटुंब उपस्थितशेतकऱ्यांच्या गर्दीतून व संवादातून अनुभवता आले. जैन उद्योग समुहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैनयांच्या महत्त्वाकांक्षेतून ‘जैन फार्म फ्रेश’ हा प्रकल्पउभारला गेला आहे. शेतकऱ्यांना नव्या पीक पद्धतीकडेनेणारे प्रशिक्षण, तंत्र, मार्गदर्शन देत त्यांच्या उत्पादनालाखरेदी करण्याची हमी देऊन उत्पादनावर प्रक्रियाकरण्याचा प्रकल्पही आपल्याच भूमित असावा यादूरदृष्टीतून आणि व्यापक हिताच्या उद्देशाने हा प्रकल्पकार्यरत आहे. सन २००१-०२ पासून शेतकऱ्यांशी पांढराकांदा उत्पादन लागवड व उत्पादन खरेदीचे करार केलेजात आहेत. पहिल्यावर्षी ४ जिल्ह्यातील, १०तालुक्यांमधील १०५ गावांतील ४७३ शेतकऱ्यांनी ४३७एकरवर पांढरा कांदा लागवड केली होती. यासाठीकंपनीने प्रक्रियेसाठी उपयुक्त ‘जेव्ही-१२’ हे रब्बीहंगामासाठी सुधारित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्धकरुन दिले होते. जवळपास २,६१० मेट्रीक टन कांदाउत्पादन झाले. कंपनीने ३ रुपये 50 पैसे प्रती किलोदराने कांदा खरेदी केला. जेव्हा की, कंपनीन करारातनोंदलेला हमी भाव ३ रुपये होता. आज १९ वर्षांनी’जेव्ही-१२’ या कांदा लागवडीची चळवळ जवळपास ८जिल्ह्यांमधील ३१ तालुक्यातील ३९३ गावांमधील२,४८९ शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहे. सन २०१५-१६मध्ये शेतकऱ्यांनी सुमारे ४७,१७१ मेट्रीक टन कांदाकंपनीला पुरवठा केला. याच बरोबर कंपनीने पांढऱ्याकांद्याचे खरीप हंगामासाठी सुधारित बियाणे ‘जेव्ही-५’हे सन २००६-०७ मध्ये निर्माण केले. त्याच्या लागवडीचेक्षेत्र झपाट्याने वाढले आहे. सन २०१८-१९ या वर्षात‘जेव्ही-५’ या बियाण्याची लागवड ८ जिल्ह्यातील ३१तालुक्यांमधील ४२४ गावांमधील २,९३३ शेतकऱ्यांनी५,५०९ एकर क्षेत्रावर केली. त्यातून ४४,४२२ मेट्रीक टनकांदा कंपनीला पुरवला. शेतकऱ्यांशी पांढरा कांदा उत्पादन खरेदीचे करारकरताना त्यात हमी भाव जरी नोंदला जात असला तरीप्रत्यक्ष उत्पादन हाती येताना पांढऱ्या कांद्याचा जोवाढीव बाजारभाव असेल तोच कंपनीने अदा केला आहे. अशा व्यवहारात कंपनीने मोठे आर्थिक नुकसानहीसोसले आहे. याचे मोठे उदाहरण सन २०१६-१७ मधीलआहे. त्यावर्षी कंपनीने २,५६१ शेतकऱ्यांकडून ५ रुपये५० पैसे प्रती किलो हमी भावाने कांदा खरेदीचे करारकेले होते. कांदा बाजारात आला तेव्हा भाव १९ रुपयेप्रती किलोपर्यंत पोहचले होते. अशावेळी कंपनीने १९रुपये ५ पैसे भावाने कांदा खरेदी केला. या व्यवहारातकंपनीला ३२,५०० मेट्रीक टन कांद्यासाठी जवळपास४४ कोटी ११ लाख रुपये जादा द्यावे लागले. सन२०१८-१९ मध्येही २,९३३ शेतकऱ्यांनी उत्पादीतकेलेल्या ४४,४२२ मेट्रीक टन कांद्यासाठी १० कोटी ८८लाख रुपये जादा द्यावे लागले. तेव्हा करारातील हमीभाव ५ रुपये ५० पैसे प्रती किलो होता. पण, बाजारभाव७ रुपयांवर गेला. कंपनीने प्रत्यक्षात ७ रुपये ९५ पैसेभाव दिला. ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीने अशा प्रकारच्याव्यवहारातून पांढरा कांदा उत्पादकांच्या मनांत विश्वासाचेव आत्मनिर्भर होण्याचे नाते निर्माण केले आहे. पांढरा कांदा उत्पादकांना प्रोत्साहित करण्यासाठी सन२००१ पासून तर २००४ पर्यंत ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीनेनवतंत्र पुरस्कार देणे सुरु केले होते. सन २००५ मध्येकाही अडथळ्यांमुळे पुरस्कार देणे खंडीत झाले. सन२००५ मध्ये सौ. कांताई जैन या स्वर्गवासी झाल्या. त्यानंतर पांढरा कांदा नवतंत्र पुरस्काराचे नाव ‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ असे करण्यातआले. त्यानंतरही पुरस्कार प्रदान सोहळा लांबत राहिला. अखेर १४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोमवारी पुरस्कार प्रदानसोहळा झाला. या अंतर्गत पुरस्कारार्थी शेतकऱ्याचाशाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व त्याच्या सौभाग्यवतीससाडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. शिवाय, प्रत्येक पुरस्कारार्थीला ११ हजार रुपये पुरस्काराचीरक्कम देण्यात आली. गेल्या १४ वर्षांतील १४ उत्कृष्टकांदा उत्पादकांना ज्येष्ठ साहित्यिक व कृषिरत्न ना. धों. महानोर, कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन पांढरा कांदा उत्पादकांचा कुंभमेळा … जळगावस्थित जैन उद्योग समुहातील भाजीपाला निर्जलीकरण आणिमसाला निर्मिती करणाऱ्या ‘जैन फार्म फ्रेश’ या कंपनीतर्फे देशभरातील१४ शेतकऱ्यांना ‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’प्रदान सोहळा ०४ हजारावर शेतकऱ्यांच्या उत्स्फूर्त गर्दीत सोमवारी (दि. १४) झाला. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा परिसर म्हणून नाशिक, मालेगाव, कळवण, सटाणा, पिंपळगाव हा परिसर ओळखला जातो. परंतु, गेल्या २० वर्षांत खानदेशच्या तीन जिल्ह्यांसह गुजरात वमध्यप्रदेशातील काही जिल्ह्यांमधील गावांमध्ये पांढरा कांदा उत्पादकांचीचळवळ ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीने उभी केली आहे. कंपनीचे 60 वर प्रतिनिधी ‘ जैन ग्रामसेवक‘ च्या जबाबदारीतूनशेतकऱ्यांना पांढरा कांदा उत्पादनासाठी प्रेरित करीत आहेत. ‘जैन फार्मफ्रेश कंपनी’ ने यासाठी ‘करार शेती’ पॅटर्न अवलंबिला आहे. या अंतर्गतशेतकऱ्यांना बियाणे पुरवठा, लागवड व संगोपन तंत्र आणि उत्पादनहाती आल्यानंतर त्याची ठरलेल्या किमान हमीभाव आणि वाढीव बाजारभाव असेल तर वाढीव भावाने खरेदीची शाश्वत हमी कंपनीने स्वीकारलीआहे. गेली १९ वर्षे म्हणजे सन २००१ पासून कंपनी ही जबाबदारीनिभावत आहे. पांढरा कांदा हा निर्जलीकरणासाठी उपयुक्त मानला जातो. त्यातीलपोषक घटक हे टीकाऊ आणि वापराच्यावेळी सहजपणे पुनर्स्थापितहोतात. ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीने जळगाव येथे जैन व्हैली परिसरातभाजीपाल्यावर प्रक्रिया करण्याचा आणि मसाले निर्मितीचा जगभरातीलसर्वांत मोठा प्रकल्प उभारला आहे. यात पांढरा कांढा हे उत्पादन सर्वांतगरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीने पांढराकांदा उत्पादकांची अनोखी चळवळ उभी केली आहे. शेती क्षेत्रातएखाद्या कंपनीच्या पुढाकाराने पीक पध्दतीत शेतकऱ्यांनी केलेल्याबदलाचे हे उत्तम उदाहरण आहे. शेत शिवारपर्यंत पोहचून कांदाउत्पादकांना सहाय्य व मार्गदर्शन करणाऱ्या प्रतिनिधींना ‘जैन ग्रामसेवक’असे संबोधन देऊन त्यांची कार्यक्षम फळी कंपनीने उभी केली आहे. पांढरा कांदा उत्पादकांमध्ये कंपनीने निर्माण केलेला आत्मविश्वास आणिपरस्परांवरील विश्वासाचे अतूट नाते सोमवारी पुरस्कार वितरणसोहळ्यात सहकुटुंब उपस्थित शेतकऱ्यांच्या गर्दीतून व संवादातूनअनुभवता आले. जैन उद्योग समुहाचे संस्थापक श्रद्धेय भवरलालजी जैन यांच्यामहत्त्वाकांक्षेतून ‘जैन फार्म फ्रेश’ हा प्रकल्प उभारला गेला आहे. शेतकऱ्यांना नव्या पीक पद्धतीकडे नेणारे प्रशिक्षण, तंत्र, मार्गदर्शन देतत्यांच्या उत्पादनाला खरेदी करण्याची हमी देऊन उत्पादनावर प्रक्रियाकरण्याचा प्रकल्पही आपल्याच भूमित असावा या दूरदृष्टीतून आणिव्यापक हिताच्या उद्देशाने हा प्रकल्प कार्यरत आहे. सन २००१–०२ पासूनशेतकऱ्यांशी पांढरा कांदा उत्पादन लागवड व उत्पादन खरेदीचे करारकेले जात आहेत. पहिल्यावर्षी ४ जिल्ह्यातील, १० तालुक्यांमधील १०५गावांतील ४७३ शेतकऱ्यांनी ४३७ एकरवर पांढरा कांदा लागवड केलीहोती. यासाठी कंपनीने प्रक्रियेसाठी उपयुक्त ‘जेव्ही–१२‘ हे रब्बीहंगामासाठी सुधारित बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करुन दिले होते. जवळपास २,६१० मेट्रीक टन कांदा उत्पादन झाले. कंपनीने ३ रुपये 50 पैसे प्रती किलो दराने कांदा खरेदी केला. जेव्हा की, कंपनीन करारातनोंदलेला हमी भाव ३ रुपये होता. आज १९ वर्षांनी ‘जेव्ही–१२‘ या कांदालागवडीची चळवळ जवळपास ८ जिल्ह्यांमधील ३१ तालुक्यातील ३९३गावांमधील २,४८९ शेतकऱ्यांपर्यंत पोहचली आहे. सन २०१५–१६ मध्येशेतकऱ्यांनी सुमारे ४७,१७१ मेट्रीक टन कांदा कंपनीला पुरवठा केला. याच बरोबर कंपनीने पांढऱ्या कांद्याचे खरीप हंगामासाठी सुधारितबियाणे ‘जेव्ही–५’ हे सन २००६–०७ मध्ये निर्माण केले. त्याच्यालागवडीचे क्षेत्र झपाट्याने वाढले आहे. सन २०१८–१९ या वर्षात‘जेव्ही–५’ या बियाण्याची लागवड ८ जिल्ह्यातील ३१ तालुक्यांमधील४२४ गावांमधील २,९३३ शेतकऱ्यांनी ५,५०९ एकर क्षेत्रावर केली. त्यातून ४४,४२२ मेट्रीक टन कांदा कंपनीला पुरवला. शेतकऱ्यांशी पांढरा कांदा उत्पादन खरेदीचे करार करताना त्यात हमीभाव जरी नोंदला जात असला तरी प्रत्यक्ष उत्पादन हाती येताना पांढऱ्याकांद्याचा जो वाढीव बाजारभाव असेल तोच कंपनीने अदा केला आहे. अशा व्यवहारात कंपनीने मोठे आर्थिक नुकसानही सोसले आहे. याचेमोठे उदाहरण सन २०१६–१७ मधील आहे. त्यावर्षी कंपनीने २,५६१शेतकऱ्यांकडून ५ रुपये ५० पैसे प्रती किलो हमी भावाने कांदा खरेदीचेकरार केले होते. कांदा बाजारात आला तेव्हा भाव १९ रुपये प्रतीकिलोपर्यंत पोहचले होते. अशावेळी कंपनीने १९ रुपये ५ पैसे भावानेकांदा खरेदी केला. या व्यवहारात कंपनीला ३२,५०० मेट्रीक टनकांद्यासाठी जवळपास ४४ कोटी ११ लाख रुपये जादा द्यावे लागले. सन२०१८–१९ मध्येही २,९३३ शेतकऱ्यांनी उत्पादीत केलेल्या ४४,४२२मेट्रीक टन कांद्यासाठी १० कोटी ८८ लाख रुपये जादा द्यावे लागले. तेव्हाकरारातील हमी भाव ५ रुपये ५० पैसे प्रती किलो होता. पण, बाजारभाव७ रुपयांवर गेला. कंपनीने प्रत्यक्षात ७ रुपये ९५ पैसे भाव दिला. ‘जैनफार्म फ्रेश’ कंपनीने अशा प्रकारच्या व्यवहारातून पांढरा कांदाउत्पादकांच्या मनांत विश्वासाचे व आत्मनिर्भर होण्याचे नाते निर्माण केलेआहे. पांढरा कांदा उत्पादकांना प्रोत्साहित करण्यासाठी सन २००१ पासून तर२००४ पर्यंत ‘जैन फार्म फ्रेश’ कंपनीने नवतंत्र पुरस्कार देणे सुरु केलेहोते. सन २००५ मध्ये काही अडथळ्यांमुळे पुरस्कार देणे खंडीत झाले. सन २००५ मध्ये सौ. कांताई जैन या स्वर्गवासी झाल्या. त्यानंतर पांढराकांदा नवतंत्र पुरस्काराचे नाव ‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्रपुरस्कार’ असे करण्यात आले. त्यानंतरही पुरस्कार प्रदान सोहळा लांबतराहिला. अखेर १४ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर सोमवारी पुरस्कार प्रदान सोहळाझाला. या अंतर्गत पुरस्कारार्थी शेतकऱ्याचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्हव त्याच्या सौभाग्यवतीस साडीचोळी देऊन सत्कार करण्यात आला. शिवाय, प्रत्येक पुरस्कारार्थीला ११ हजार रुपये पुरस्काराची रक्कमदेण्यात आली. गेल्या १४ वर्षांतील १४ उत्कृष्ट कांदा उत्पादकांना ज्येष्ठसाहित्यिक व कृषिरत्न ना. धों. महानोर, कंपनीचे अध्यक्ष अशोक जैन, सौ. ज्योती जैन व सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, सौ. शोभनाजैन, अभय जैन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळीकंपनीतर्फे लक्षवेधी घोषणा करण्यात आली. ती म्हणजे, सन २०१९–२०पासून ‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ हे दरवर्षी दिलेजातील. दरवर्षी ३ शेतकऱ्यांची निवड होईल. पहिला पुरस्कार ३१ हजार, दुसरा २१ हजार आणि तिसरा ११ हजार रुपये तसेच सोबत स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ आणि सौभाग्यवतींसाठी सौभाग्य लेणे स्वरूप असलेल्याया घोषणेचे उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांच्या गजरात स्वागत केले. अशोक जैन यांची प्रांजळ भूमिका जैन उद्योग समुह सध्या आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. समुहातील विविध प्रकल्पांसाठी खेळत्या भांडवलाचा तुटवडा निर्माणझाला आहे. कर्मचाऱ्यांच्या वेतनासह अनेकांच्या देणी देण्यात विलंब होतआहे. याच विलंबाचा फटका पांढरा कांदा पुरवठादार शेतकऱ्यांनाहीबसला. अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे देणे थकले होते. मात्र आहे त्यास्थितीत जवळजवळ सर्वच शेतकऱ्यांना त्यांची देणी अदा केली गेली. अजून काहींची अंशता देणी थकीत आहेत. या विषयाचा उहापोह जैनउद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी या कार्यक्रमात प्रांजळपणेकेला. त्यांच्या या पारदर्शी व उत्स्फूर्त संवादामुळे उपस्थित शेतकरीभारावले. गेल्या २१ वर्षांमधील ऋणानुबंध अधिक घट्ट करुन गेले. अशोक जैन म्हणाले, ‘शेतीसाठी उत्पादने निर्मिती करणे हा आपल्याउद्योगाचा मूळ हेतू आहे. अशावेळी शेती उत्पादनावरील प्रक्रिया व इतरपूरक उत्पादनांच्या निर्मितीत आपण विस्तार केला. शिवाय, विविधठिकाणच्या सरकारी योजनात सहभागी होऊन तेथे गरजेनुसारशेतकऱ्यांना यंत्र–तंत्र याचाही पुरवठा करीत सेवा दिली. महाराष्ट्रासहतामीळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आदी राज्यातही अशी सेवा दिली. मात्र, विविधप्रकारच्या सरकारी व इतर संस्थाकडे २,६०० कोटी रुपयांची येणीथकली. लोकसभेसाठी निवडणूक आली. काही राज्यात सुद्धानिवडणुका झाल्या. सरकार बदलले, धोरणात बदल झाले. शिवाय, बँकांच्या कार्यपद्धतीत बदल झाले. दीर्घ मुदतीच्या कर्जासाठी बँका कठोरझाल्या. त्यामुळे हातातील खेळते भांडवल बँकाच्या व्याज व कर्जचुकविण्यात खर्ची पडले. अशा स्थितीत आमच्याकडून सर्वांची देणीविलंबित झाली. पण, कंपनी या सर्व अडचणींवर मात करुन बाहेर पडतेआहे. यापूर्वी श्रद्धेय भवरलाल जैन हयात असताना २ वेळा अशाचअडचणीतून कंपनी यशस्वीपणे बाहेर निघाली आहे. जैन कुटुंबशेतकऱ्यांना आपल्या कुटुंबाचा घटक मानते. जैन कुटुंबाची शेती आणिभूमिपुत्रांशी नाळ खूप आधीपासून जुळलेली आहे आणि हे ऋणानुबंधकायम दृढ होत राहतील यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आम्हीजळगावात होतो, आहोत आणि रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत राहू. पैसादेण्यात उशीर होतो आहे. मात्र, तो नक्कीच दिला जाईल. प्रत्येकाची पै न्पै दिली जाईल. फक्त आमच्यावर विश्वास कायम ठेवा आणि साथ सोबतकायम असू द्या.’ अशी भावनीक साद त्यांनी घातली. मसाला पिके उत्पादनासाठी आवाहन अशोक जैन हे शेतकऱ्यांसोबत मोकळेपणाने संवाद साधत असतानात्यांनी भविष्यातील पीक पद्धती बदलण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहनकेले. ते म्हणाले, ‘जैन उद्योग समुहाने सर्वांत मोठा मसाला निर्मितीप्रकल्प जळगावात सुरु केला आहे. या प्रकल्पासाठी जसा पांढरा कांदालागतो त्याच पद्धतीने आता लाल मीरची, आले, हळद, धने लागणारआहेत. या शिवाय पांढरा व लाल पेरू, टमाटा आणि निर्यात योग्य केळीयाचीही गरज निर्माण झाली आहे. प्रक्रिया प्रकल्पसाठी ४५ हजार टनमसाल्याचे पदार्थ (पांढरा कांदा वगळून, २० हजार टन ओली लालमीरची, १० हजार टन ओले आले, १५ हजार टन ओली हळद, २ हजारटन कोरडे धने व ४८ हजार मेट्रीक टन फळे (३० हजार टन टमाटा, ५हजार टन पांढरा पेरू व ३ हजार टन लाल पेरु, १० हजार टन निर्यातक्षमकेळी) लागणार आहे. यासाठी कंपनी शेतकऱ्यांसोबत करार करणारआहे. ही संधी लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत बदल करायलाहवा.चालू वर्षीही जेव्ही-12 व जेव्ही-5 या दोन्ही वाणांची तब्बल 50 हजार टन कांद्याची गरज आहे. यावरूनच कंपनीच्या उत्पादनक्षमतेचीकल्पना येऊ शकते.’  ‘स्व. सौ. कांताई जैन पांढरा कांदा नवतंत्र पुरस्कार’ प्रदान सोहळ्यातशेतकऱ्यांनी दिलेला प्रतिसाद आणि कंपनीवर दाखविलेला विश्वासयामुळे संपूर्ण कार्यक्रम वेगळ्या उंचीवर गेला. याचा अनुभव नंतरस्नेहभोजनस्थळी शेतकऱ्यांसोबत चर्चा करताना आला. शेतकऱ्यांसाठीविविध प्रयोग करणारी कंपनी अडचणीत असेल तर आपणही सामंजस्यदाखवून विश्वास ठेवायला हवा, असे बहुतांश शेतकरी बोलत होते. श्रद्धेयभवरलाल जैन यांना शेतकऱ्यांसोबत अपेक्षित ऋणानुबंध नव्या पिढीनेहीअधिक घट्ट केल्याचा हा अनुभव जळगावकर म्हणून मलाही आनंददेणारा होता.  





KENT launches ‘Health Plus’, a compact purifier designed to make washbasin & sink water bacteria free protect your family from bacteria and virus while brushing and various kitchen chores

MUMBAI, 16th OCTOBER, 2019 (GPN): The leading RO water purifier brand, KENT RO Systems Ltd. has added the purity quotient by launching another breakthrough technology product “Health Plus” which ensure pure water intake 24X7.  Health Plus is a specially…