Lisiting of Vishwaraj Sugar Industries Ltd. At BSE On Successful Completion of its IPO-Tourism Australia invites Indians to ‘Experience the game and beyond’ at the ICC T20 World Cups in 2020-Mercedes-Benz commences its product offensive; Introduces for the first time in India the iconic 'G-Class' in its new guise- The 'G 350 d'-Xiaomi India to plant over 1.8 lakh trees in partnership with Sadhguru’s initiative Cauvery Calling-MEDSCAPEINDIA 8TH AWARDS NIGHT MUMBAI-NORTH BOMBAY SARBOJANIN DURGA PUJA SAMITIS MAHA ASHTAMI PUJA-DADASAHEB PHALKE AND PADMA VIBHUSHAN AWARDEE BOLLYWOOD STAR ICON ASHA BHOSLE AWARDED HONORARY DOCTORATE AS UNIVERSITY OF SALFORD STRENGTHENS INVESTMENT IN INDIA-Japan’s Nippon Life Insurance, announces the integration of Nippon India Mutual Fund (erstwhile Reliance Mutual Fund)-BALKRISHNA INDUSTRIES LIMITED (BKT) SCORES GLOBAL AGREEMENT WITH SPANISH FOOTBALL LEAGUE LALIGA-India’s premier Islamic travel show for Hajj, Umrah, Ziyarat and Halal travel operators and travel agents across India "Islamic Travel Mart" returns for its second edition at WTC, Mumbai-Child’s organs save life of 60 year old man at Aster CMI Hospital-Bunts Sangha’s S M Shetty International School and Junior College students visit Aarey Tribal Community-SPEAK AND GROW TO PRESENT IN FRONT OF 300 INTERNATIONAL SCHOOLS AT THE INTERNATIONAL SCHOOL AWARDS DUBAI-Ayushmann Khurrana is ‘Breaking Bald’ in Bala’s Don’t Be Shy and is loving it-Global Leader UFI Filters Group Opens its 18th Industrial Site Worldwide: SOFIMA FILTERS INDIA PVT. LTD.-Diwali For All” a Jaiswal Youth Federation (JYF) an initiative, aims to light up the festive season for the underprivileged ones-Actress Shanthipriya embraces the Indian festivity in her traditional best-Launch of luxurious brand - Resha Interior and Decor by Brand Ambassador Gurmeet Kaur Sidhu-Cinema proves effective weapon against world hunger-DISCOVERY SPORT AND RANGE ROVER EVOQUE GEAR UP TO AMAZE MUMBAI

आता एचडीएफसी एर्गोसह अगदी स्‍वस्‍तामध्‍ये घर आणि महागड्या गॅझेट्सचा विमा उतरवा

IMG_20190917_080530

  • एचडीएफसी एर्गो ३-इन-१ इन्‍शुरन्‍स प्‍लान या सर्वांगीण पॉलिसीमध्‍ये गृह विमा, E@secure  विमा आणि वैयक्तिक अपघात विमाचा समावेश 
  • काळाची गरज असलेली ही स्‍वस्‍त दरातील पॉलिसी ऑनलाइन, वेब समूह अशा विविध व्‍यासपीठांवर, तसेच एजंट्सकडे उपलब्‍ध 

 

मुंबई, १२ सप्‍टेंबर २०१९: एचडीएफसी एर्गो जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी या भारताच्‍या खाजगी क्षेत्रातील तिस-या सर्वात मोठ्या नॉन-लाईफ इन्‍शुरन्‍स पुरवठादार कंपनीने आज ३-इन-१ इन्‍शुरन्‍स प्‍लानची घोषणा केली. ही पॉलिसी गृह विमा, वैयक्तिक अपघात विमा आणि E@secure विमा अंतर्गत उपलब्‍ध असलेल्‍या लाभांना एकत्र करण्‍याचा प्रयत्‍न करते. ही पॉलिसी प्रतिदिन ८ रूपये इतक्‍या परवडणा-या प्रीमिअममध्‍ये प्रतिकूल परिस्थितींविरूद्ध व्‍यापक विमा कव्‍हर देते आणि हे प्रीमिअम एक कप चहाच्‍या किंमतीपेक्षाही कमी आहे.

गृह विमाअंतर्गत फर्निचर व फिक्‍स्‍चर्स आणि टीव्‍ही, रेफ्रिजरेटर, वॉशिंग मशिन अशा इलेक्‍ट्रॉनिक्‍ससाठी विमा कव्‍हर आहे. E@secure व्‍यक्‍तींना अनधिकृत ऑनलाइन व्‍यवहार, फिशिंग व ईमेल स्‍पूफिंग, आयडेन्टिटी थेफ्ट, ई-रेप्‍युटेशनचे नुकसान, सायबर बुलिंग, ई-एक्‍स्‍टॉर्शन अशा सायबर धोक्‍यांविरोधात विमा कव्‍हर देईल. तसेच यापैकी कोणत्‍याही सायबर गुन्‍ह्यांमुळे झालेल्‍या कायदेशीर मूल्‍याला देखील विमा कव्‍हर देईल. या पॉलिसीमध्‍ये कायमस्‍वरूपी व्‍याधी, अपघातामुळे होणारा खर्च, स्‍थलांतरणासाठी होणारा खर्च आणि रोजचा हॉस्पिटलचा खर्च अशा वैयक्तिक अपघातांसाठी विमा कव्‍हर आहे. 

राष्‍ट्रीय आपत्‍ती व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाचा अंदाज आहे की, ६० टक्‍के भारतीय भूक्षेत्रांना भूकंपाचा, तर ८ टक्‍के भूक्षेत्रांना चक्रीवादाळाचा धोका आहे. हा आकडा मोठा असताना देखील भारतात १ टक्‍क्‍यांहून कमी घरांना विमा कव्‍हर आहे. नुकतेच आलेल्‍या महापुरांमुळे या आकडेवारीमध्‍ये आणि विमा न केलेल्‍या मालमत्‍तांच्‍या नुकसानांमध्‍ये वाढ झाली आहे. तसेच सायबर-गुन्‍ह्यांमध्‍ये तिप्‍पट वाढ झाली असताना देखील डीएससीआय अहवालामधील माहितीने निदर्शनास आणले की, २०१८ मध्‍ये भारतीय कॉर्पोरेट्सनी ३५० सायबर विमा पॉलिसी खरेदी केल्‍या. हा आकडा रिटेल क्षेत्रासाठी खूपच कमी आहे. भारतात वैयक्तिक अपघात पॉलिसींची खरेदी देखील कमी आहे. ही पोकळी भरून काढण्‍यासाठी एचडीएफसी एर्गोने ३-इन-१ इन्‍शुरन्‍स प्‍लान सादर केला. हा प्‍लान खिशाला परवडेल अशा प्रीमिअम्‍समध्‍ये अशा आपत्‍तींविरोधात संरक्षण म्‍हणून २०,५०,००० रूपयांचे विमा कव्‍हरेज देतो.

या सादरीकरणाबाबत बोलताना एचडीएफसी एर्गो जनरल इन्‍शुरन्‍सचे कार्यकारी संचालक व मुख्‍य व्‍यवसाय अधिकारी श्री. अनुज त्‍यागी म्‍हणाले, आम्‍हाला आमच्‍या ग्राहकांच्‍या आधुनिक गरजांबाबत चांगली जाण आहे. आजच्‍या व्‍यस्‍त जीवनशैलीमध्‍ये अनेक ग्राहकांमध्‍ये विविध आपत्‍तींना कव्‍हर करणा-या विविध पॉलिसी घेण्‍याचा कल कमी दिसून येतो. एचडीएफसी एर्गोने विविध धोक्‍यांसाठी एकाच छताखाली गरज-आधारित सोल्‍यूशन म्‍हणून ३-इन-१ इन्‍शुरन्‍स प्‍लान सादर केला आहे. या प्‍लानचा प्रीमिअम खूपच कमी आहे. अधिकाधिक व्‍यक्‍तींना विमा संरक्षण मिळेल या खात्रीकरिता हा प्‍लान व्‍यापक वितरण माध्‍यमांवर उपलब्‍ध आहे. 

ग्राहकांचा अनुभव वाढवण्‍यासाठी नाविन्‍यतेचा वापर करण्‍याचा दृष्टिकोन कायम ठेवत एचडीएफसी एर्गोने खात्री घेतली आहे की, ग्राहकांना ही पॉलिसी खरेदी करताना, तसेच क्‍लेम्‍स करताना कोणताच त्रास होणार नाही. हे उत्‍पादन विविध भागांमधील ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करण्‍यसाठी डिजिटली सर्व माध्‍यमांवर, तसेच वेबसाइट समूह आणि एजंट्सच्‍या माध्‍यमातून ऑफलाइन उपलब्‍ध आहे. एण्‍ड-टू-एण्‍ड प्रक्रिया एकसंधी करण्‍यासाठी एचडीएफसी एर्गोने अशाप्रकारे हे उत्‍पादन डिझाइन केले आहे की, ज्‍यामुळे ग्राहकांना क्‍लेम्‍स करतेवेळी कमीत-कमी कागदपत्रे सादर करावी लागतील. एका वर्षासाठी कोणतीही प्रौढ व्‍यक्‍ती ही पॉलिसी घेऊ शकते आणि त्‍यानंतर पॉलिसीचे नूतनीकरण करू शकते. तसेच पॉलिसी खरेदी केल्‍याच्‍या दिवसापासूनच लागू होते. 

पॉलिसीबाबत अधिक माहितीसाठी आणि एचडीएफसी एर्गोने सादर केलेल्‍या विमा पॉलिसींच्‍या पूर्ण रेंजबाबत सविस्‍तर माहितीसाठी कृपया कंपनी प्रतिनिधींशी संपर्क साधा. जोखीम घटक, एक्‍सक्‍लुशन्‍स, अटी व नियमांबाबत अधिक माहितीसाठी कृपया व्‍यवहार पूर्ण करण्‍यापूर्वी विक्री माहितीपत्रक वाचा. 

एचडीएफसी एर्गो बाबत: 

एचडीएफसी एर्गो जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी ही भारताची आघाडीची गृहवित्‍त संस्‍था, हाऊसिंग डेव्‍हलपमेंट फायनान्‍स कॉर्पोरेशन लि. (एचडीएफसी) आणि म्‍युनिक रि ग्रुप ऑफ जर्मनीची प्रमुख विमा कंपनी एर्गो इंटरनॅशनल एजी यांच्‍यामधील ५१:४९ संयुक्‍त उद्मम कंपनी आहे. ऑगस्‍ट २०१७ मध्‍ये एचडीएफसी एर्गो जनरल इन्‍शुरन्‍स कं. लि.ला एचडीएफसी जनरल इन्‍शुरन्‍स लि.मध्‍ये (पूर्वीची एलअॅण्‍डटी जनरल इन्‍शुरन्‍स कं. लि.) विलीन करण्‍याच्‍या आयआरडीएआयच्‍या मान्‍यतेसह कंपनीने जनरल इन्‍शुरन्‍स क्षेत्रामध्‍ये पहिले विलीनीकरण केले. विलीनीकरण कंपनी एचडीएफसी एर्गो जनरल इन्‍शुरन्‍स कं. लि. म्‍हणून ओळखली जाते आणि ती खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी जनरल विमा सेवा देणारी कंपनी आहे. एचडीएफसी एर्गो १०६ शहरांमधील १२२ शाखांचे व्‍यापक नेटवर्क आणि व्‍यापक वितरण नेटवर्कच्‍या माध्‍यमातून रिटेल क्षेत्रामध्‍ये मोटर, आरोग्‍य, पर्यटन, गृह, वैयक्तिक अपघात व सायबर सिक्‍युरिटी विमा अशाप्रकारची उत्‍पादने आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्‍ये मालमत्‍ता, सागरी व दायित्‍व विमा यांच्‍यासारखी सानुकूल उत्‍पादने देते.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "आता एचडीएफसी एर्गोसह अगदी स्‍वस्‍तामध्‍ये घर आणि महागड्या गॅझेट्सचा विमा उतरवा"

Leave a comment

Your email address will not be published.


*