नवी लँड रोव्हर डिफेंडर सादर

Land Rover Defender - 110
Land Rover Defender -110 interior

Land Rover Defender -110 interior

 • अतुलनीय, अनस्टॉपेबल: २१व्या शतकासाठी पुनर्कल्पित आयकॉन
 • आकर्षक बनवण्यासाठी विचारपूर्वक डिझाइन व इंजिनीअरिंग केलेली: पुढचा भाग लहान आणि मागचा भाग थोडासा ओढलेला यामुळे डिफेंडर सिग्नेचर गाडीसारखी दिसते आणि असे चाणाक्ष व स्फूर्तीदायक डिझाइन की सिलवेटमध्येही ओळखता येते.
 • दिसायला मजबूत, असायलाही: टिकाऊ नवीन D7x आर्किटेक्चर वापरून तयार केलेली त्यामुळे सामान्य प्रमाणित एसयूव्हींच्या सुरक्षितता चाचण्यांपेक्षा कितीतरी कठीण प्रसंगांसाठीच्या चाचण्यांतून तावूनसुलाखून तयार झालेली.
 • ऑफ आणि ऑन बोर्ड आंतरराष्ट्रीय दर्जाचे तज्ज्ञ: नवी लँड रोव्हर डिफेंडर क्षमतांच्या विस्ताराची पुनर्व्याख्या केली आहे. ऑल-टरेन क्षमता ही संशयातीत आहे, रस्तावरचा आरामदायीपणा तिच्या वैशिष्ट्यांत भर घालतो.
 • एक्स्पिडिशनसाठी सज्ज: सर्वाधिक पेलोड ९०० किलो, स्टॅटिक रूफ लोड ३०० किलोंपर्यंत, डायनॅमिक रूफ लोड १६८ किलो, टोइंग क्षमता ३७२० किलो*आणि वेडिंग डेप्थ ९०० एमएम ज्यामुळे नवी डिफेंडर डोंगराळ भागांतील साहसी प्रवासासाठीही ठरते सर्वोत्तम ४ बाय ४.
 • इंटिलिजंट ऑफ-रोड तंत्रज्ञान: लँड रोव्हर आद्यप्रवर्तक असलेल्या टरेन रिस्पॉन्स २ हे तंत्रज्ञानाने वेड प्रोग्रॅम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ऑफ-रोड कॉन्फिगरेबल टरेन रिस्पॉनमुळे आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळे अगदी पट्टीचा किंवा नवशिका कारचालक कुणाकडूनही गाडीचे कितीही नुकसान झाले तरीही सर्वाधिक मदत केली जाते.
 • रस्त्यांवरील आरामदायी अनुभव: कुठल्याही प्रकारच्या रस्‍त्‍यावर नवी डिफेंडर उत्तम चालते. आरामदायी अनुभव देते व लांबपल्ल्याचे प्रवासही सहज पार पडतात.
 • सर्वोत्तम क्षमता: डिफेंडरमध्ये आहेत इलेक्ट्रिफाइड पॉवरटरेन्स त्यासोबत अद्ययावत माइल्ड-हायब्रीड आणि प्लग-इन इलेक्ट्रिक गाड्यांचा पर्यायही उपलब्ध आहेत. तसेच शक्तिशाली आणि क्षमतावान पेट्रोल व डिझेल इंजिन्सच्या गाड्याही उपलब्ध आहेत.

 

 • २१व्या शतकातील तंत्रज्ञान: नव्या पीवी प्रो इन्फोटेनमेंट फीचरमुळे तुमच्या मनाला वाटेल ते मनोरंजन उपलब्ध. सॉफ्टवेअर-ओव्हर-द-एअर अपडेट होत असल्यामुळे कायम ताजी सॉफ्टवेअर उपलब्ध होतात, अगदी जगात कुठेही.

 

  • कमी जागेतील, विचारपूर्वक इंटिरिअर: वापरता येणारे, टिकाऊ आणि लवचिक इंटिरिअरह हे एक वेगळेपण आहे आणि त्याचबरोबर एक्सपोज्ड स्ट्रक्चरल एलिमेंट आणि सेंट्रल फ्रंट जंप सीट – कुटुंबियांसोबत साहसाचा आनंद लुटण्यासाठी अगदी योग्य आहेत.
  • भेटा कुटुंबाला: डिफेंडर ११० उपलब्ध आहे ५+ आसनव्यवस्थेसह चार वेगवेगळ्या अॅक्सेसरी पॅक्जमध्ये (एक्सप्लोरर, अडव्हेंचर, कंट्री आणि अर्बन) त्यासोबत आहेत १७० स्वतंत्र अॅक्सेसरीज आणि लहान डिफेंडर ९० आणि टिकाऊ कमर्शियल मॉडेल्सही उपलब्ध आहेत.

 

 • महान गोष्टीची क्षमता: महान गोष्टी करण्यासाठी आवश्यक अंतरातील क्षमता डिफेंडरमध्ये आहे. जिथे इतर जाण्याचे धाडसच करत नाहीत किंवा विचारही करत नाही अशी आव्हाने स्वीकारणारा धैर्यशील विजेता म्हणजे डिफेंडर.
 • आंतरराष्ट्रीय भागीदार: लँड रोव्हरने डिफेंडरला ध्यानात ठेऊन आंतरराष्ट्रीय फेडरेशन ऑर रेड क्रॉस आणि रेड क्रिसेंट सोसायटीज (आयएफआरसी) यांच्याशी असलेली मानवतेच्या विचाराने केलेली भागीदारी कायम ठेवली आहे.

 

गायडॉन, यूके, मंगळवार ११ सप्टेंबर २०१९ (GPN)– ही आहे नवी लँड रोव्हर डिफेंडर. २१व्या शतकाचा एक पुनर्कल्पित आयकॉन, ती चाणाक्ष, क्षमतावान आणि संपूर्ण कुटुंबाच्या दृष्टीने सुरक्षित आहे, अशी तिच्या विभागातील गाडी आहे.

नवी डिफेंडर बनली आहे साहसी हृदयांसाठी आणि चौकस मनांसाठी, ज्यांना समाजाची किंमत कळते आणि जे वेगळेपणा दाखवण्यासाठी तळमळतात त्यांच्यासाठी आहे ही गाडी.

अचूक असे सिलहूट ओळखीचे आहे तरीही नवं. ती दिसते मजबूत आणि आहेही मजबूत पण ती विचारपूर्वक डिझाइन केली आहे आणि आकर्षकपणे बनवली आहे. नाव, आकार आणि क्षमतेत वेगळेपणा असणारी डिफेंडरमध्ये मालकाला त्यांच्या मनोराज्याप्रमाणे हवे तसे बदल करणे शक्य आहे.

संशोधनात सात दशके मूलभूत काम करणाऱ्या लँड रोव्हरने जगभरातील नाविन्याची आस असलेल्या ग्राहकांच्या, मानवतेसाठी काम करणाऱ्या संस्था आणि साहसी कुटुंबांच्या मनांत एक अढळ स्थान प्राप्त केले आहे. पृथ्वीवरील कठिणतम परिस्थितीत स्वत:ला सिद्ध करणारी नवी डिफेंडर आपलं नातं राखते.

रेंज रोव्हर कुटुंबाचा अद्वितीय ऐशोआराम आणि शुद्धता ही मूल्य जपणारी तसेच उच्च क्षमतावान आणि वैविध्यपूर्ण संशोधनाधारित एसयूव्ही असणारी नवी डिफेंडर लँड रोव्हर साम्राज्याला पूर्णत्व देते. जगातील सर्वांत टिकाऊ आणि क्षमतावान ४ बाय ४ गाड्या देणाऱ्या या कुटुंबाच्या दृष्टीने ही ११० गाडी ही नुसती सुरुवात आहे. तिच्या मागोमाग शांतपणे अटोपशीर, लहान व्हीलबेस ९० गाडी २०२०मध्ये येणाऱ्या कर्मशियल मॉडेल्सच्या आधीच बाजारात दाखल होणार आहे.  

हौसेने चालवली जाणारी आणि ओरिजनचा आदर राखणारी नवी डिफेंडर क्षमतेची रूपांतरणीय श्रेणीच उपलब्ध करून देत आहे. अद्ययावत ऑल-टरेन तंत्रज्ञानांमुळे २१व्या शतकातील साहसाची नवी व्याख्या करणारी, आपल्या मूळच्या तात्त्विक गाभ्याशी प्रामाणिक राहणारी गाडी देणं हा लँड रोव्हरचा ७१ वर्षांपासूनचा हॉलमार्क राहिला आहे.

भावनिकदृष्ट्या आकर्षक डिझाइन

इतरांपेक्षा वेगळा सिलहूट असणारी नवी डिफेंडर चटकन ओळखता येते. तसेचपुढचा भाग लहान आणि मागचा भाग थोडासा ओढलेला यामुळे डिफेंडरला अप्रोच आणि डिपार्चरसाठी सर्वोत्तम अँगल प्राप्त होतात. लँड रोव्हर्सच्या डिझायनर्सनी विचारपूर्वक डिफेंडर ट्रेडमार्क्सचा फेरविचार करून हेतूपुरस्सर नव्या ४ बाय ४ डिफेंडरला अपराइट स्टान्स आणि छतावर अल्पाइन लाइंट विंडोज दिल्या आहेत, जेणेकरून २१व्या शतकातील डिफेंडरची नवी ओळख निर्माण होईल. त्याचबरोबर त्यांनी मागच्‍या बाजूला झुकलेले टेलगेट आणि बाहेरून बसवलेले जास्‍तीचे चाक ठेवले आहे. त्यामुळे गाडी इतकी अस्सल दिसते आणि लगेच ओळख पटते.

लँड रोव्हरचे मुख्य डिझाइन अधिकारी गॅरी मॅकगव्हर्न म्हणाले, ‘’नवी डिफेंडर ही आधीच्या गाड्यांपेक्षा सन्माननीय आहे. पण तिने अजून पूर्ण उंची गाठलेली नाही. ही नव्या जगासाठीची नवी डिफेंडर आहे. तिचे वेगळे व्यक्तिमत्त्व तिच्या आगळ्यावेगळ्या सिलहूट आणि सर्वोत्तम आकारामुळे तयार झाले असून त्यामुळे ती विकत घ्यावी अशी तीव्र इच्छा ग्राहकाला होणार आहे. खरोखरंच दिसायला अप्रतिम ४ बाय ४ जिला तिचे स्वतंत्र डिझाइन आणि इंजिनीअरिंग इंटिग्रिटी आहे त्याचसोबत आहे विनातडजोड वचनबद्धता.’’

मूळच्या डिफेंडरच्या लक्षात राहणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला या गाडीच्या आत स्थान देण्यात आले आहे, सामान्यपणे इंटिरिअरच्या आड लपवण्यात येणारे स्ट्रक्चरल एलिमेंट आणि फिक्सिंग इथे दिसतील असे ठेवले आहेत, जेणेकरून साधेपणा व वास्तवतेचा प्रभाव जाणवेल. नव्या फीचर्समध्ये डॅश-माउंटेड गिअर शिफ्टर दिला आहे,  जेणेकरून पर्यायी सेंट्रल फ्रंट जंप सीटची सुविधा मिळेल, त्यामुळे आधीच्या लँड रोव्हर्सच्या गाड्यांप्रमाणे तिघांना शेजारी-शेजारी बसता येईल.

त्यामुळे एकूणात, डिफेंडर ११० मध्ये पाच, सहा किंवा ५+२ सीट्सचे पर्याय उपलब्ध असून दुसऱ्या रांगेतील सिट्सच्या मागे १०७५ आय इतकी सामानाची जागा उपलब्ध आहे आणि दुसऱ्या रांगेली सीट मुडपली तर साधारणपणे २३८० आय इतकी जागा मिळते. डिफेंडर ९० मध्ये ६ जण बसू शकतात, जी एका फॅमिली हॅचबॅक कॉम्पॅक्ट गाडीसारखी आहे.

वापरण्यास सहज असलेल्या फीचर्समध्ये प्रॅक्टिकल टचेस आणि अद्ययावत तंत्रज्ञानाधारित संशोधनांशी संबंधित फीचर्सचा समावेश होतो. टिकाऊ, रबरासारखे फ्लोरिंग असल्यामुळे आयुष्यात एकदाच एवढी महागाची गाडी घेणाऱ्या ग्राहकाच्या नित्याच्या वापरात काही पदार्थ सांडल्यास निर्माण होणारा त्रास राहत नाही तसेच ब्रश किंव वायपरने ते स्वच्छ करता येते. पर्यायी पूर्ण लांबीचे फोल्डिंग फॅब्रिक टप असल्यामुळे खुल्या टपाचा अनुभव मिळतो. यामुळे डिफेंडर ११०च्या दुसऱ्या रांगेतील सीटवर बसलेल्या लोकांनाही गाडी उभी असताना उठून उभे राहता येते, जेणेकरून त्यांना संपूर्ण सफारीचा अनुभव घेता येतो**.

टिकाऊपणाची व्याख्या

लँड रोव्हरचे नवीन इंजिनीअर्ड D7x (for extreme) आर्किटेक्चर हे हलक्या अॅल्युमिनियम मोनोकोक कन्स्ट्रक्शनवर आधारलेले असून त्यामुळे लँड रोव्हरने आतापर्यंत निर्माण केलेल्या दर्जाचा गाडीचा साटा अधिक कणखर  होतो. पारंपरिक बॉडी-ऑन-फ्रेम डिझाइनच्या तुलनेत हा साटा तिप्पट कणखर असतो. त्यामुळे संपूर्ण स्वतंत्र अशा एअर किंवा कॉइल स्प्रंज सस्पेन्शनला सर्वोत्तम फाउंडेशन मिळते आणि नव्या इलेक्ट्रिफाइड पॉवरट्रेन्सनाही सपोर्ट करते.

इंजिनीअरिंगच्या ६२,०००हून अधिक चाचण्या नव्या डिफेंडरने पार केल्या आहेत तसेच चासी आणि बॉडी आर्किटेक्चरला लँड रोव्हरच्या अतिशय कठिण चाचण्यांतून जावे लागले आहे. या चाचण्या सामान्य प्रवासी वाहतुकीच्या गाड्या किंवा एसयूव्हींच्या चाचण्यांपेक्षा माणीकरणाच्या कितीतरी पुढे असून त्या पुन्हा पुन्हा केल्या जातात व गाडी तेवढीच कणखर राहिल्याचे सिद्ध होते. विकासाच्या चाचण्यांदरम्यान प्रोटोटाइप मॉडेल्सनी पृथ्वीवरील सर्वांत कठीणतम परिसरातील लक्षावधी किलोमीटरचा प्रवास केला आहे. यामध्ये ५० अंशांच्या उष्ण हवामानातील वाळवंटापासून उणे ४० अंशांच्या आर्टिकमधील वातावरणापर्यंत आणि कोलोरॅडोतील खडकाळ पर्वतांत १० हजार फूट उंचीवरील रस्त्यांवरही या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

ऑफ आणि ऑन-रोडसाठी जागतिक दर्जाचा तज्ज्ञ

रूपांतरणीय श्रेणींची क्षमता असलेली नवी डिफेंडर इतरांपेक्षा वेगळी उठून दिसते. परमनंट ऑल-व्हील ड्राइव्ह आणि ट्विन-स्पीड ऑटोमॅटिक गिअर बॉक्स, सेंट्रल डिफ्रंशियल आणि ऑप्शनल अॅक्टिव्ह लॉकिंग रिअर डिफ्रंशियल या वैशिष्ट्यांमुळे वाळवंटातील बारीक वाळू आणि आर्टिकमधील गोठवणाऱ्या टुंड्रापर्यंत व त्या मधल्या कोणत्याही तापमानाचा सामना करण्याची क्षमता डिफेंडरमध्ये आहे.

कॉन्फिगरेबल टरेन रिस्पॉन्स हे नव्या डिफेंडरचे नवीन फीचर आहे, ज्यामुळे अनुभवी चालकाला त्याच्या आवडीनुसार सेटिंग्ज फाइन ट्युन्ड करता येतात तर नवशिक्याला ती सिस्टीम आपल्या इंटिलिजंट ऑटो फंक्शनचा वापर करून त्या रस्त्यासाठी सर्वांत योग्य सेटिंग्ज कोणती ते सुचवते.

नव्या बॉडी आर्किटेक्चरमुळे ११० गाडीला २९१ मिमीचा ग्राउंड क्लिअरन्स आणि जगन्मान्य ऑफ-रोड जॉमेट्रीचा अनुभव मिळतो. त्याचबरोबर ही  गाडी अनुक्रमे ३८, २८ आणि ४० अंशांचे (ऑफ रोड हाइट) अप्रोच, ब्रेकओव्हर आणि डिपार्चर अँगल्स देते. तिची सर्वाधिक वेडिंग डेप्थ ९०० मिमी असून तिला टरेन रिस्पॉन्स सिस्टिम २ मध्ये नव्या वेड प्रोग्रॅमची साथ मिळाली आहे. त्यामुळे ड्रायवर संपूर्ण आत्मविश्वासाने खोल पाण्यातही  गाडी नेऊ शकतो.

कोरड्या भूभागावर लँड रोव्हरचे अद्ययावत क्लिअर साइट ग्राउंड व्ह्यू तंत्रज्ञान ड्रायव्हरना मदत करते,  ज्यामुळे ड्रायव्हर डिफेंडरच्या कुठल्याही रस्त्यांवर वर्चस्व गाजवण्याच्या क्षमतेचा पुरता फायदा घेऊ शकतो. तसेच तो भाग बॉनेटमुळे झाकला जातो तो पुढच्या चाकांच्या पुढचा भागही त्याला गाडीतील सेंट्रल टचस्क्रीनवर दिसत असल्यामुळे त्याला खूप फायदा होतो.

परिणामी, नव्या डिफेंडरने ऑफ-रोड प्रवासासाठी लागणाऱ्या राकटपणाचा आणि रस्त्यांवर आरामदायी अनुभव देण्याचा सुवर्णमध्य गाठून क्षमतांच्या श्रेणीची फेरव्याख्या केली आहे. ती गर्दीभरल्या शहरांतील रस्त्यांमधून वाट काढू शकते आणि मोठमोठे पर्वतही सहजपणे चढून जाऊ शकते, वाळवंट पार करू शकते आणि गोठवणाऱ्या थंडीतही तग धरू शकते. काळजीपूर्वकपणे तयार केलेल्या हँडलिंगमुळे ती सर्वप्रकारच्या टरेन्समध्ये आरामदायी फर्स्ट क्लास प्रावसाचा अनुभव देते.

शक्ती आणि क्षमता ª

अद्ययावत पेट्रोल आणि क्लिनर डिझेल इंजिन्समुळे नव्या डिफेंडरमध्ये कुठल्याही वातावरणात तग धरण्याची शक्ती, कंट्रोल आणि क्षमता आहे. तसेच प्लग-इन-हायब्रीड इलेक्ट्रिक गाडी (पीएचईव्ही) या श्रेणीत पुढच्या वर्षी दाखल होणार आहे, जेणेकरून केवळ ईव्ही गटात नविनता येईल.

लाँचच्या ठिकाणी पेट्रालच्या गाड्यांमध्ये चार पी३०० सिलिंडर असलेल्या आणि शक्तिशाली पी४००ची सहा सिलिंडर असलेल्या गाड्या उपलब्ध असून त्यामध्ये सक्षम माइल्ड हायब्रीड इलेक्ट्रिक व्हेइकल टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. चार सिलेंडर डिझेल डी२०० आणि पॉवरफूल डी२४० या दोन्ही गाड्यांचे मायलेज ७.६ लि प्रति १०० किमी आणि कार्बन उत्सर्जन १९९ ग्रॅम प्रति किलोमीटर (NEDC equivalent) आहे. या दोनपैकी गाडी पर्याय म्हणून ग्राहक निवडू शकतो.

संशोधनाधारित इंजिनीअरिंग सोल्यूशन्समुळे चालवण्याच्या क्षमतेला बळ मिळते आणि सपाट अंडरबॉडीमुळे जी एरोडायनॅमिक परफॉर्मन्स (as low as 0.38Cd) सुधारते आणि गाडीच्या अंडरबॉडीचे संरक्षण करते.

२१व्या शतकातील तंत्रज्ञानb

नवी डिफेंडर ही तांत्रिकदृष्ट्या जितकी अद्ययावत आहे तितकीच ती टिकाऊही आहे. यामध्ये आहे लँड रोव्हरची नवी पीव्ही प्रो इन्फोटेनमेंट सिस्टीम. नेक्स्ट जनरेशन टचस्क्रीन ही सूचना देणारी आहे आणि सहज वापरता येणारीही आहे. जिला काही नेहमी वापरल्या जाणाऱ्या गोष्टींची माहिती द्यावी लागते ती मिळाल्यानंतर ती तातडीने तुम्हाला स्वत:हून प्रतिसाद देईल याची हमी बाळगा.

त्याचबरोबर नव्या डिफेंडरमध्ये सॉफ्टवेअर-ओव्हर-द-एअर (एसओटीए) हे नवीन तत्रंज्ञान वापरण्यात आले आहे. त्यामुळे ही गाडी वेगळ्याच उंचीला जाते. या तंत्रज्ञानामुळे ती १४ स्वतंत्र मॉड्युल्स रिमोट अपडेट्स मिळवू शकतात. ग्राहक घरी किंवा कुठल्यातरी दूरवरच्या ठिकाणी झोपलेला असताना ही यंत्रणा डाटा डाऊनलोड करते. त्यामुळे नवी डिफेंडर या युगानुकूल होते. इलेक्ट्रॉनिक अपडेट्स गाडीमध्ये लगेच डाउनलोड होतात त्यात किंचितही उशीर होत नाही आणि तुम्हाला लँड रोव्हरच्या डीलरकडे जायचीही गरज पडत नाही.

जॅग्वार लँड रोव्हरच्या प्रॉडक्ट इंजिनीअरिंग विभागाचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर निक रॉजर्स म्हणाले, ‘’डिफेंडर ही गाडी २१व्या शतकातील आयकॉन ठरावी यासाठी आम्ही तिला प्रचंड क्षमतावान बनवले असून तिचे इंटिरिअर अशा पद्धतीने पुन्हा संशोधित केले आहे की, जे कमी जागेत उपयोगी ठरेल. नवी डिफेंडरने आमच्या क्षमतांच्या पलीकडे जाण्यास भाग पाडून, ज्यावर विचार झाला नाही अशा गोष्टींवर विचार करायला लावून आणि त्याचवेळी मूळच्या लँड रोव्हरचे व्यक्तिमत्त्व व सत्त्व न हरवता काम करायला लावून आम्हाला वेगळ्या पद्धतीने गोष्टी करण्याचा जणू परवानाच दिला आहे. सुरुवातीपासूनच या गाडीच्या उपयोगितेबाबत आम्ही ऑबसेस्ड होतो. मग अगदी आमच्या सर्व संपर्कातून सर्वोत्तम मटेरियलची निवड करण्यापासून आम्ही सर्वोत्तमतेचा ध्यास धरला होता. परिणामी आतापर्यंत तयार केलेल्या सर्वाधिक क्षमतावान लँड रोव्हरचीच निर्मिती झालेली नाही तर खरोखरंच आरामदायी, मॉडर्न गाडी तयार झाली आहे, जी लोकांना चालवायला आवडेल.’’

तुमच्या विश्वासासाठी पर्स्नलाइज्ड

नवी डिफेंडर ९० आणि ११० बॉडी डिझाइन्समध्ये उपलब्ध आहे. ९० मध्ये सहा सिट्स आहेत तर ११० मध्ये पाच, सहा आणि ५+२ सिट्सचे पर्याय उपलब्ध आहेत. मॉडेलमध्ये डिफेंडरचे पहिले एडीशन आणि सर्वांवरचे म्हणजे डिफेंडर एक्स मॉडेल अशी श्रेणी उपलब्ध आहे. त्याचबरोबर स्टँडर्ड एस, एसई, एचएसई ही मॉडेल्सही आहेतच. आधीच्या फोर अॅक्सेसरी पॅक्स लँड रोव्हरप्रमाणेच ग्राहक त्यांच्या गरजांनुसार विविध मार्गांनी गाडी पर्सनलाइज्ड करू शकतात. द एक्सप्लोरर, अडव्हेंचर, कंट्री आणि अर्बन या प्रकारांत डिफेंडरची वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत, ज्यात विशेष निवड करून ती आणखी चांगली करता येऊ शकतात. एक्सुसिव्ह फर्स्ट एडिशन मॉडेलमध्ये युनिक स्पेसिफिकेशन्स आहेत आणि प्रॉडक्शनच्या संपूर्ण वर्षभरात ती ग्राहकांना उपलब्ध असतील.

गाडीच्या बाहेरचे पेंटवर्क अधिक टिकाऊ व्हावे यासाठी ग्राहक नवीन सॅटिन प्रोटेक्टिव्ह फिल्मही लावून घेऊ शकतात. शाश्वत सॉल्व्हंट फ्री आणि संपूर्ण रिसायकल होणाऱ्या रॅपमुळे कारपार्क स्क्रॅचेसपासून ते गाडी घासून जाणे इथपर्यंत घटना घडल्या तरीही गाडीचे रक्षण होते. ही गाडी फॅक्टरी फिट पर्यायांमध्ये इंडस सिल्व्हर, गोंडवना स्टोन आणि पॅनिजिआ ग्रीन या रंगांत उपलब्ध आहे. नव्या डिफेंडरच्या पेंटवर्कचं रक्षण करण्यासाठी तिला हा समकालीन फिनीश देण्यात आला आहे.

त्याचबरोबर अक्सेसरीनी भरलेल्या नव्या डिफेंडरमध्ये वैयक्तिक आवडींनुसार निवड करण्यासाठी अनेक अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत त्यात नव्या लँड रोव्हर अॅक्सेसरीजचाही समावेश आहे. ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट रिमोट कंट्रोल इलेक्ट्रिक विंचº ने नियंत्रित होईल रूफटॉप टेंट आणि इनफ्लॅटेबल वॉटरफ्रुफ ऑनिंग, सर्वांत सोपी टो बार सिस्टीम आणि रूफ रॅक्सचा समावेश आहे.

जॅग्वार लँड रोव्हरचे मुख्य कमर्शिय ऑफिसर फेलिक्स ब्रॉटिंगम म्हणाले, ‘‘नवी डिफेंडर १२८ जागतिक बाजारपेठांमध्ये उपलब्ध होईल. जगातील सर्वांत कडक उत्सर्जन व सुरक्षिततेच्या नियमावलीची पूर्तता करणारी ही गाडी आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि टिकाऊ मेकॅनिकल रचना यांचा संगम साधून आम्ही कणखर असे व्यक्तिमत्त्व घडवलेय ते तुम्हाला डिफेंडरच्या रूपात पहायला मिळेल. आमची नवी ४ बाय ४ गाडी साहसी हृदय आणि चौकस मनांनी तयार केली आहे. चार व्यक्तिमत्वांतून दोन बॉडी स्टाइल्स यातून वाहन निवडून ग्राहकांना सर्वसमावेशक अॅक्सेसरीजच्या विविध पर्यांयांच्या श्रेणीतून आपली खासगी डिफेंडर सजवू शकतील,  जी असेल केवळ त्यांची ४ बाय ४ गाडी – त्यांच्या जीवनशैलीला अनुरूप.’’

अबव्‍ह अँड बियाँड कलेक्शन

डिफेंडरच्या अक्सेसरीज निवडीच्या शक्तीमुळे ती एका गाडीच्या पलीकडचा अनुभव देते. कारण ग्राहक आता नव्या अबाउ अँड बियाँड कलेक्शनमधूनही गाडी खरेदी करू शकतात हे कलेक्शन मुस्टो®च्या सहकार्याने डिझाइन आणि विकसित केलेले २४ पीस कॅपस्युल कलेक्शन आहे. आउटडोअर परफॉर्मन्स अपॅरलची श्रेणी, तांत्रिक उपकरणं आणि अॅक्सेसरीज ऑफ रोडसाठी आवश्यक कणखरता देतात. त्याचबरोबर हायब्रीड जॅकेट या फीचरमुळे क्विकबर्स्ट झिप तंत्रज्ञानाचा वापर करून त्या अॅक्सेसरीला जॅकिटमध्ये रूपांतरित करते. जेणेकरून ६००० किलोच्या टेन्सिल स्ट्रेंथला गाडी जोडली जाऊ शकते.

लाइफस्टाइल पॅक्सची निवड करताना नव्या डिफेंडरमध्ये असलेले मिररिंगही ग्राहकांना उपलब्ध आहे. हे विशेष गटांनुसार निवडता येते, जेणेकरून ते ग्रामीण जीवनशैलीला, शहरी राहणीमानाला, साहसी सहलीला किंवा भटकायला जाण्यासाठी योग्य असेल.

समाप्त

PHOTO Download link 
https://we.tl/t-tuBDyDctuh

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "नवी लँड रोव्हर डिफेंडर सादर"

Leave a comment

Your email address will not be published.


*