अलाद्दिनचे भूत संपूर्ण साम्राज्‍यासमोर जफरच्‍या कटकारस्‍थानाचा उलगडा करणार

Screenshot_20190911_083026

Screenshot_20190911_082759MUMBAI (GPN) : अलाद्दिनचे भूत त्‍याचा सर्वात मोठा शत्रू जफरचा सूड घेण्‍यासाठी परतले आहे. ज्‍यामुळे चाहत्‍यांना रोमांचक साहसी कृत्‍ये पाहायला मिळणार आहे. सोनी सबवरील मालिका अलाद्दिन: नाम तो सुना होगामध्‍ये अलाद्दिनचे भूत जवळपास जफरला ठार मारणारच होते, पण आता ते भूत जफरच्‍या गुन्‍ह्यांना समोर आणणार आहे.

Screenshot_20190911_083026सुंदर जिनी मिनी जिनूला (राशुल टंडन) तिच्‍यासोबत वेळ व्‍यतित करण्‍यासाठी विचारते आणि जिनू ते मान्‍य करतो. अलीचे (सिद्धार्थ निगम) सर्वोत्‍कृष्‍ट जिनीज या संधीचा फायदा घेत जफरला (आमिर दळवी) घाबरवतात. ते जफरसमोर रक्‍तरंजित हात आणि राजाचे भूत अशी भयानक दृश्‍ये दाखवत त्‍याला घाबरवण्‍याचा प्रयत्‍न करतात. जफर खूपच घाबरून जातो. तो अली व यास्‍मीनच्‍या (अवनीत कौर) बतावणीवर विश्‍वास ठेवतो. बतावणी अशी असते की, जफर राजाचा खरा खूनी असल्‍याचे सिद्ध करण्‍यासाठी अलाद्दिनचे भूत त्‍याच्‍याभोवती फिरत आहे. जफरला अलाद्दिनच्‍या भूताकडून एक संशयास्‍पद पत्र मिळते, तेव्‍हा परिस्थिती गंभीर वळण घेते. त्‍या पत्रामध्‍ये जफरचा हेतू बाजारपेठेच्‍या मध्‍यभागी संपूर्ण बगदादसमोर उलगडा करण्‍याचे लिहिण्‍यात आलेले असते. दुसरीकडे यास्‍मीनचा अलाद्दिनचे भूत खरंच अस्तित्‍त्‍वात असण्‍यावर विश्‍वास बसत नाही आणि ती अलीवर बारकाईने नजर ठेवण्‍याचे ठरवते. जफर बाजारपेठेकडे रवाना होतो. यास्‍मीन अलीला तिच्‍यासोबत येण्‍यास सांगते, ज्‍यामुळे तिला अलाद्दिनचे भूत खरंच आहे की नाही याबाबत उलगडा होऊ शकेल.

अलाद्दिनचे भूत खरंच सर्वांसमोर येईल का? यास्‍मीनचा अलीवरील संशय खरा ठरेल का?

अलाद्दिन ऊर्फ अलीची भूमिका साकारणारा सिद्धार्थ निगम म्‍हणाला, ”अलीचा जफरच्‍या कटकारस्‍थानांचा उलगडा करण्‍याचा मास्‍टर प्‍लान अखेरीस अंतिम टप्‍प्‍यावर पोहोचत आहे. अलाद्दिन दीर्घकाळापासून वाट पाहत असलेल्‍या न्‍यायाच्‍या जवळ पोहोचला आहे. या आठवड्यातील आगामी एपिसोड्स अनेक सरप्राईजेजने भरलेले आहेत. आगामी एपिसोड्ससाठी शूटिंग करण्‍याचा मी भरपूर आनंद घेतला आहे. मला अलाद्दिनच्‍या भूमिकेची धावपळ जाणवत आहे. आगामी एपिसोड्स जफरच्‍या कटकारस्‍थानांचा उलगडा करतील. आमचे प्रेक्षक या एपिसोड्सचा भरपूर आनंद घेतील. तर मग अलाद्दिनचे भूत सत्‍य समोर आणण्‍यासाठी जफरला कशाप्रकारे घाबरते हे जाणण्‍यासाठी मालिका पाहत राहा.”  

जफरची भूमिका साकारणारा आमिर दळवी म्‍हणाला, ”जफर अलाद्दिनचे भूत पाहून खूपच घाबरून गेला आहे. पण त्‍याने राजाच्‍या खूनामागील सत्‍याचा उलगडा न करण्‍याचा निर्धार केला आहे. जफर त्‍याचा सर्वात शक्तिशाली जिन ‘जिनू’सह पुन्‍हा एकदा अलाद्दिनला पराभूत करेल. एक कलाकार म्‍हणून या एपिसोड्ससाठी शूटिंग करणे खूपच आव्‍हानात्‍मक होते. मी जफरची पूर्णपणे नवीन भावना साकारली. आगामी एपिसोड्स रोमांच व उत्‍साहाने भरलेले आहेत. मला खात्री आहे की, आमचे प्रेक्षक या एपिसोड्सचा भरपूर आनंद घेतील.”

अधिक जाणण्‍यासाठी पाहत राहा ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्‍त सोनी सबवर

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "अलाद्दिनचे भूत संपूर्ण साम्राज्‍यासमोर जफरच्‍या कटकारस्‍थानाचा उलगडा करणार"

Leave a comment

Your email address will not be published.


*