एचडीएफसी एर्गो इन्शुरन्स अवेअरनेस अवॉर्ड ज्युनिअर – क्विझ २०१९च्या विभागीय फेरीत डीएव्‍ही पब्लिक स्‍कूलची बाजी

Screenshot_20190911_084037
DAV Public School-Winning Team-City Finale-Mumbai-HDFC ERGO Insurance Awareness Award-Junior Quiz 2019

DAV Public School-Winning Team-City Finale-Mumbai-HDFC ERGO Insurance Awareness Award-Junior Quiz 2019

  • मुंबई पश्चिम भागातील विभागीय अंतिम फेरीत डीएव्‍ही पब्लिक स्‍कूलचे विद्यार्थी १२ शाळांच्या विद्यार्थ्यांशी स्पर्धा करणार
  • लहान वयातच विमा जागरुकता निर्माण करण्यासाठी प्रथमच अशा प्रकारची स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे
  • ५० शहरांतल्या १,००० हून अधिक शाळांमध्ये राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेच्या चौथ्या सत्राचे आयोजन

 

मुंबई, ११ सप्‍टेंबर २०१९: एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी ही भारतातील अग्रेसर नॉन-लाईफ इन्शुरन्स कंपनी असून त्यांच्या इन्शुरन्स अवेअरनेस अवॉर्ड ज्युनिअर – क्विझ २०१९च्या शहर फेरीत डीएव्‍ही पब्लिक स्‍कूल विजेती ठरली आहे. आज ही स्पर्धा मुंबई येथे आयोजित करण्यात आली. सुमीत वाबळे आणि प्रथमेश डी यांनी ही पातळी यशस्वीरित्या पार केली असून यात २० शाळा सहभागी झाल्या होत्या. विजेते आता अहमदाबाद, इंदौर, बडोदा, भोपाळ, गोवा, औरंगाबाद, नागपूर, नाशिक, पुणे, राजकोट आणि सुरत येथील शहरी फे-यांच्‍या क्‍वॉलिफायर्ससोबत मुंबईमध्‍ये आयोजित करण्‍यात येणा-या पश्चिम भागातील विभागीय अंतिम फेरीत स्‍पर्धा करतील.

विद्यार्थ्यांना या राष्ट्रीय पातळीवरील चॅम्पियनशीप स्पर्धेसाठी तयार करण्याकरिता तसेच विमा क्षेत्राविषयी जागरुकता निर्माण करण्यासाठी एचडीएफसी एर्गोतर्फे मुंबईमधील २० शाळांतील इयत्ता आठवी व नववीच्या सुमारे ५,००० विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. अत्यंत मजेशीर आणि एन्गेजिंग मार्गाने लहान मुलांना विमा विषयाबाबत माहिती देणे हे एचडीएफसी एर्गोच्या इन्शुरन्स अवेअरनेस अवॉर्ड ज्युनिअर – क्विझ या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

एचडीएफसी एर्गोच्या इन्शुरन्स अवेअरनेस अवॉर्ड ज्युनिअर – क्विझच्या शहर फेरीबाबत बोलताना कंपनीच्या शेअर्ड सेवा आणि ऑनलाईन व्यापार विभागाचे अध्यक्ष श्री. मेहमूद मन्सूरी म्हणाले, ”मुंबई शहरात झालेल्या एचडीएफसी एर्गो इन्शुरन्स अवेअरनेस अवॉर्ड ज्युनिअर क्विझ –२०१९ मध्ये विजेत्या ठरलेल्या डीएव्‍ही पब्लिक स्‍कूलच्या टीमचे आम्ही अभिनंदन करतो. हा उपक्रम आम्ही गेली चार वर्षे यशस्वीरित्या राबवत असून लहान वयातच मुलांपर्यंत विमा हक्कांविषयी प्राथमिक माहिती पोहोचवण्याचा आमचा मूळ हेतू आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या पाहून आम्ही समाधानी झालो आहोत.”

Screenshot_20190911_084148२०१६ साली सादर झालेली एचडीएफसी एर्गो इन्शुरन्स अवेअरनेस अवॉर्ड क्विझ ज्युनिअर ही स्पर्धा स्पर्धकांमध्ये लहान वयातच विम्याविषयीची उत्सुकता आणि जागरुकता निर्माण करते. विमा हा घटक नेहमीच चुकीच्या अर्थी केवळ गुंतवणूक म्हणून तसेच, कर बचत घटक म्हणून गणला जातो. परंतु, एखाद्याने विमा केवळ या दोनच हेतूंनी विकत घेऊ नये. अपघात, पूर, आग, आजारपण आदी आपत्तींनंतर विम्यामुळे आयुष्य पूर्वपदावर येण्यास मदत होते. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी व पालकांनाही विम्याचे महत्व व ही संकल्पना समजावून सांगण्याचा आमचा उद्देश असून त्याविषयी अधिक जाणून घेण्यासाठी त्यांना आम्ही प्रोत्साहनही देणार आहोत.

एचडीएफसी एर्गो बाबत:

एचडीएफसी एर्गो जनरल इन्‍शुरन्‍स कंपनी ही भारताची आघाडीची गृहवित्‍त संस्‍था, हाऊसिंग डेव्‍हलपमेंट फायनान्‍स कॉर्पोरेशन लि. (एचडीएफसी) आणि म्‍युनिक रि ग्रुप ऑफ जर्मनीची प्रमुख विमा कंपनी एर्गो इंटरनॅशनल एजी यांच्‍यामधील ५१:४९ संयुक्‍त उद्मम कंपनी आहे. ऑगस्‍ट २०१७ मध्‍ये एचडीएफसी एर्गो जनरल इन्‍शुरन्‍स कं. लि.ला एचडीएफसी जनरल इन्‍शुरन्‍स लि.मध्‍ये (पूर्वीची एलअॅण्‍डटी जनरल इन्‍शुरन्‍स कं. लि.) विलीन करण्‍याच्‍या आयआरडीएआयच्‍या मान्‍यतेसह कंपनीने जनरल इन्‍शुरन्‍स क्षेत्रामध्‍ये पहिले विलीनीकरण केले. विलीनीकरण कंपनी एचडीएफसी एर्गो जनरल इन्‍शुरन्‍स कं. लि. म्‍हणून ओळखली जाते आणि ती खासगी क्षेत्रातील तिसरी सर्वात मोठी जनरल विमा सेवा देणारी कंपनी आहे. एचडीएफसी एर्गो ११० शहरांमधील १२२ शाखांचे व्‍यापक नेटवर्क आणि व्‍यापक वितरण नेटवर्कच्‍या माध्‍यमातून रिटेल क्षेत्रामध्‍ये मोटर, आरोग्‍य, पर्यटन, गृह, वैयक्तिक अपघात व सायबर सिक्‍युरिटी विमा अशाप्रकारची उत्‍पादने आणि कॉर्पोरेट क्षेत्रामध्‍ये मालमत्‍ता, सागरी व दायित्‍व विमा यांच्‍यासारखी सानुकूल उत्‍पादने देते.

 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एचडीएफसी एर्गो इन्शुरन्स अवेअरनेस अवॉर्ड ज्युनिअर – क्विझ २०१९च्या विभागीय फेरीत डीएव्‍ही पब्लिक स्‍कूलची बाजी"

Leave a comment

Your email address will not be published.


*