अवनीत कौरने सांगितला काम व शिक्षणामध्‍ये संतुलन राखण्‍यामागील मंत्र

Screenshot_20190911_090648
Avneet Kaur as Sultana in Aladdin Naam Toh Suna Hoga

Avneet Kaur as Sultana in Aladdin Naam Toh Suna Hoga

मुंबई, ११ सप्‍टेंबर २०१९ (GPN) :युवा अभिनेत्री अवनीत कौरने सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’मधील यास्‍मीनच्‍या भूमिकेतील अद्वितीय अभिनयासह चाहत्‍यांना मंत्रमुग्‍ध केले आहे. ती आता तिच्‍या १२वीच्‍या बोर्ड परीक्षेसाठी (एचएससी) तयारी करत आहे. पण असे करताना ती पडद्यावर प्रेक्षकांचे मनोरंजन देखील करत आहे.  

पडद्यामागे अवनीत एक वेगळी कसोटी पार पाडत आहे. ती तिच्‍या परीक्षेसाठी तयारी आणि सोनी सबवरील मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’मधील तिची भूमिका यास्‍मीन उत्‍तमपणे साकारण्‍यामध्‍ये संतुलन राखण्‍याचा प्रयत्‍न करत आहे.  

अवनीतने तिचे करिअर आणि शिक्षण यामध्‍ये परिपूर्ण संतुलन राखले आहे. पण यंदा तिला शैक्षणिक वर्षातील महत्‍त्‍वपूर्ण परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षण आणि शूट्समध्‍ये कशाप्रकारे संतुलन राखत आहे याबाबत जाणून घेण्‍यासाठी आम्‍ही यास्‍मीनची भेट घेतली. तिने आनंदाने तिच्‍या जीवनातील या महत्‍त्‍वपूर्ण टप्‍प्‍यादरम्‍यान तिचा मंत्र सांगितला:

”माझ्या मते १२वीची परीक्षा कोणत्‍याही विद्यार्थ्‍यासाठी महत्‍त्‍वाची आहे. प्रत्‍येकजण ‘मौजमजेने भरलेले ११वीचे वर्ष ते अत्‍यंत आव्‍हानात्‍मक १२वीची परीक्षा’ या टप्‍प्‍यामधून जातो. मी माझ्या कामाचा आणि शूटिंगसाठी बाहेर जाण्‍याचा आनंद घेते. पण आता माझा हा नित्‍यक्रम नाही. मी माझ्या अभ्‍यासावर अधिक लक्ष देत आहे. पण त्‍यासोबतच मी माझे चाहते व प्रेक्षकांना यास्‍मीनच्‍या भूमिकेचा आनंद देणे देखील चुकवणार नाही. म्‍हणून मी माझे सीन्‍स पूर्ण करण्‍यासाठी आठवड्यातून १-२ वेळा सेटवर जाते.”

अवनीत तिने ठरवलेले निर्धार पूर्ण करण्‍यासाठी वेळापत्रकाचे काटेकोरपणे पालन करते. अत्‍यंत लोकप्रिय मालिका ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’चा भाग असलेली ही अत्‍यंत लोकप्रिय अभिनेत्री सोशल मीडियावर देखील अत्‍यंत लोकप्रिय आहे. आताच्‍या दिवसांमधील नित्‍यक्रमाबाबत सांगताना अवनीत म्‍हणाली,

”मला माझे शिक्षण व कामामध्‍ये संतुलन राखण्‍याची आता सवय झाली आहे. पण यंदाचे वर्ष खूपच आव्‍हानात्‍मक आहे. विविध प्रोजेक्‍टस् व असाइनमेंट्स सादर करावे लागतात. मी भाग्‍यवान आहे की, मला चांगले शिक्षक मिळाले, ते मला सर्व विषयांमध्‍ये मदत करत आहेत. दररोज सकाळी मी दिवसभराचे वेळापत्रक आखते. काय करायचे आहे याचे वेळापत्रक केल्‍याने सर्व गोष्‍टी सुरळीत होतात. हे काहीसे आव्‍हानात्‍मक आहे. पण मला खात्री आहे की, भावी जीवनात मी मागे वळून पाहिल्‍यानंतर केलेल्‍या कामगिरीचा मला अभिमान वाटेल.”

अवनीत कौरला यास्‍मीनच्‍या भूमिकेत पाहत राहा ‘अलाद्दिन: नाम तो सुना होगा’ दर सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्‍त सोनी सबवर

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "अवनीत कौरने सांगितला काम व शिक्षणामध्‍ये संतुलन राखण्‍यामागील मंत्र"

Leave a comment

Your email address will not be published.


*