सोनी सबवरील मालिका ‘भाखरवडी’मध्‍ये गायत्रीचे अपहरण

Screenshot_20190911_091436

~ १० सप्‍टेंबरपासून मालिका भाखरवडीचे प्रसारण पाहा रात्री १०.३० वाजता ~

मुंबई, १० सप्‍टेंबर २०१९ (GPN) : सोनी सबवरील जीवनाचा सार दाखवणारी मालिका भाखरवडीने मराठी (गोखले) व गुजराती (ठक्‍कर) कुटुंबांच्‍या विचारसरणी तफावतीवरील कथानकासह प्रेक्षकांच्‍या मनात खास स्‍थान निर्माण केले आहे. या आठवड्यात ही हलकी-फुलकी कौटुंबिक मालिका रोमांचक वळण घेणार आहे. गायत्रीच्‍या अपहरणाने सर्वांना धक्‍का बसणार आहे.  

सुरूवातीला चाहत्‍यांना पाहायला मिळेल की, अण्‍णा (देवेन भोजानी) व अभिषेकमधील दुरावा दूर करण्‍यासाठी महेंद्र (परेश गनात्रा) आणि अभिषेक (अक्षय केळकर) यांनी दोन सुंदर महिला मोलकरीण सुलक्षणा व चंद्रमुखीचा वेष घेतलेले गुपित उर्मिलासमोर (भक्‍ती राठोड) उघडकीस येते. दोन्‍ही कुटुंबे उत्‍सवी उत्‍साहामध्‍ये सामावून गेले आहेत आणि ते त्‍यांच्‍या घरांमध्‍ये गणपती बाप्‍पाचे आगमन करत आहेत. त्‍याचवेळी अण्‍णा व गायत्री (अक्षिता मुदगल) त्‍यांच्‍या घरामध्‍ये बेंगळुरूमधून अभिषेकला पुन्‍हा आणण्‍याचे ठरवतात. ते बेंगळुरूसाठी रवाना होत असतानाच एक घटना घडते. गायत्रीचे अपहरण होते. सर्वजण घाबरून जातात.

गायत्रीचे अपहरण कोण करतो? ठक्‍कर व गोखले कुटुंब तिची सुटका करू शकतील का? आगामी एपिसोडमध्‍ये जाणून घ्‍या.

गायत्रीची भूमिका साकारणारी अक्षिता मुदगल म्‍हणाली, ”या आठवड्यामध्‍ये चाहत्‍यांना काही तणावग्रस्‍त क्षण पाहायला मिळणार आहेत. निरागस गायत्रीचे अपहरण होणार आहे. अपहरणकर्त्‍याचा शोध घेण्‍याच्‍या घटना प्रेक्षकांना आठवडाभर रोमांचक राइडवर घेऊन जाणार आहेत. कुटुंबातील प्रत्‍येकजण भावनिक होऊन या अपहरणामागे कोणाचा हात आहे हे जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न करणार आहेत. तसेच प्रेक्षकांना काही धक्‍कादायक उलगडा पाहायला मिळणार आहे.”

कृपया लक्षात घ्‍या की, चाहते आता ‘भाखरवडी’ मालिकेचा आनंद घेऊ शकतात दर सोमवार ते शुक्रवार,  

रात्री १०.३० वाजता, फक्‍त सोनी सबवर

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "सोनी सबवरील मालिका ‘भाखरवडी’मध्‍ये गायत्रीचे अपहरण"

Leave a comment

Your email address will not be published.


*