टेक्नो कडून ‘सेगमेंट प्रथम’ 6.1, एचडी + डॉट नॉच डिस्प्ले आणि एआय फ्रंट फ्लॅश फोन फक्त 5499 रुपयांत सादर; भारतात संपूर्ण नवीन स्पार्क सिरीजचे लाँचिंग!

Go

PR creativeGoSpark_Go_M

  • टेक्नो स्पार्क गो आणि टेक्नो स्पार्क 4 एअर हे दोन स्मार्टफोन्स भारतात अनुक्रमे 5499 आणि 6999 रुपये किंमतीस उपलब्ध 
  • उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी ग्राहकांना टेक्नो स्पार्क गो सोबत 799 रुपये किंमतीचा ब्लूटूथ इअरपिस मोफत मिळणार

गुरुवार, दि. 29 ऑगस्ट 2019 : गेल्या महिन्यात ब्रँडचे फ्लॅगशिप मॉडेल असणार्‍या फँटम 9 च्या प्रभावी लाँचनंतर, प्रिमियम स्मार्टफोन निर्मात्या टेक्नोने आपल्या चाहत्यांच्या उत्साहाचा आनंद आणखी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने भारतातील आपला पोर्टफोलिओ आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीने आणखी एक जागतिक प्रोडक्ट लाईन स्पार्क बाजारपेठेत उतरवण्यासाठीही पावले उचलली आहेत. 

मध्यम श्रेणीच्या स्मार्टफोन विभागात आपला ठळक ठसा उमटवल्यानंतर, टेक्नो ब्रँडने आपला गिअर बदलताना त्यांची जागतिक पातळीवरील बेस्ट सेलिंग असणारी स्पार्क सिरीजचे दोन नवीन एंट्री लेवलचे स्मार्टफोन्स भारतीय बाजारपेठेत उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. या सिरीजमधील टेक्नो स्पार्क गो आणि टेक्नो स्पार्क 4 एअर हे दोन स्मार्टफोन्स अनुक्रमे 5499 आणि 6999 रुपये किंमतीस उपलब्ध आहेत. 

नव्याने लाँच करण्यात आलेल्या दोन स्मार्टफोन्सची विक्री आजपासून सुरु होणार असून ते देशभरातील 35 हजारहून अधिक ऑफलाईन रिटेल स्टोअर्समधून खरेदी करता येतील. उत्सवांच्या वातावरणाचा आनंद आणखी द्विगुणीत करण्यासाठी प्रत्येक टेक्नो स्पार्क गो ची खरेदी करणार्‍या प्रत्येक ग्राहकाला 799 रुपये किंमतीच्या ब्लूटूथ इअरपिसची मोफत भेटवस्तू मिळणार आहे. परंतु ही ऑफर मर्यादित कालावधीपर्यंतच उपलब्ध असणार आहे.

सन 2017 मध्ये भारतात प्रवेश केल्यानंतर टेक्नो ब्रँडचा भारतीय बाजारपेठेत वेगाने विस्तार होत आहे. मजबूत कॅमन प्रोडक्ट पोर्टफोलिओ हे टेक्नोचे खास वैशिष्ट्य आहे. ‘आणखी अपेक्षा करा’ या ब्रँड तत्वज्ञानावर आधारीत काम करणार्‍या टेक्नोने आपल्या स्मार्टफोन्सची कॅमेरा क्वालिटी आणि इतर अनेक खास वैशिष्ट्यांमुळे मध्यम श्रेणीतील मॉडेल्समध्ये वेगळेपण कायम राखले आहे. स्पार्क सिरीज भारतीय बाजारपेठेत उतरवून टेक्नो संबंधीत एंट्री लेवल 

श्रेणीतील सर्वोत्तम डिझाईन, डिस्प्ले आणि कॅमेरा अनुभव ग्राहकांना मिळवून देण्याची आपली कटीबध्दता कायम राखत आहे. 

लाँचिंगप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना ट्रान्शन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अरीजीत तलापात्रा यांनी सांगितले की, “टेक्नोच्या माध्यमातून आम्ही किफायतशीर किंमतीत भविष्यपूरक डिव्हायसेस ग्राहकांसाठी उपलब्ध करुन देण्याचे काम करत असतो. नेहमीच आपल्या कार्यकक्षा विस्तारत काम करण्याच्या आमच्या कार्यपध्दतीमुळे टेक्नोचा पोर्टफोलिओ एक गेमचेंजर बनून राहत असतो. प्रत्येक नवीन लाँचच्या रुपाने आम्ही प्रोडक्ट इनोव्हेशन आणि ग्राहकाभिमुख दृष्टीकोनाला अधिकाधिक प्राधान्य देत असतो. उच्च गती इंटरनेटचा वाढता प्रसार आणि इंटरनेट डेटाचा वापरही खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यामुळे ग्राहकांच्याकडून एंट्री लेवल विभागातही उच्च गुणवत्ता व्हिडिओ डिस्प्ले डिव्हायसेसही मागणी होत आहे. टियर 3 शहरे आणि गावांमधील या अपेक्षेचा विचार करुन टेक्नो स्पार्कची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामधून एंट्री लेवलमधील स्मार्टफोन्समधूनही ग्राहक उच्च दर्जाचा व्हिडिओ पाहण्याचा आनंद लुटतात. त्यांना विविड 6.1 इंच डॉट नॉच डिस्प्ले, आय केअर फीचरसह ब्राईटर कलर आउटपूट, ड्यूअल व्होल्ट आणि व्हिडिओ चॅट फ्लॅशसह एआय पॉवर्ड कॅमेरा यासारखी अद्ययावत फीचर्स हाताळण्याची संधी मिळत आहे. या सर्वांना अँड्रॉईड 9 पायचा युजर फ्रेंडली सपोर्ट मिळत असल्यामुळे ग्राहकांना अद्भूत अनुभव मिळू शकतो. 

टेक्नो स्पार्कची ठळक वैशिष्ट्ये :

गुंतवून टाकणाऱ्या व्हिडिओचा अनुभव 

6.1’’ एचडी+ डॉट नॉच डिस्प्लेबरोबरच 19.5:9 चे विशिष्ट गुणोत्तर आणि बॉडीच्या गुणोत्तराच्या एकूण स्क्रीनपैकी 85 टक्के लक्षणीय स्क्रीन या वैशिष्ट्यांमुळे स्मार्टफोनवर व्हिडिओ पाहणे, वाचणे आणि ब्राउज करणे अतिशय आनंददायी ठरते. याशिवाय हा फोन खास करून 450 निट्स स्क्रीन ब्राइटनेस आणि 1000:1 अशा कॉण्ट्रास्ट गुणोत्तराच्या उच्च प्रकारात येतो, यामुळे तुम्ही अगदी उन्हात असलात तरीही तुमचा व्हिडिओ पाहण्याचा अनुभव उत्तमच असतो. तसेच या उपकरणात अनोखे असे एआय रीड मोड येते, यात वातावरणानुसार आपोआप स्क्रीनवरील ब्राइटनेस आणि रंग हवे तसे घेतले जातात, यामुळे तुमच्या डोळ्यांना बदलत्या वातावरणाचा कोणताही त्रास होत नाही आणि तुमचा वाचनाचा अनुभव कधी नव्हे इतका सुखकारक होतो. 

भविष्यातील डिझाईन 

टेक्नो स्पार्क ड्युओचे डिझाईन म्हणजे हा फोन सुंदर दिसावा अशाच प्रकारे तयार करण्यात आला आहे, डॉट नॉच 2.5डीची सुंदर वळलेली टोकं, पाठीमागचे 3डी कव्हर, पातळ बेझल्स आणि उत्तम चमकदार फिऩिश यासह हा फोन नटलेला आहे. ज्या ग्राहकांना आपले व्यक्तिमत्त्व आपल्या फोनमधून प्रतिबिंबित व्हावे असे वाटते, त्यांच्यासाठी हे सर्व घटक एकत्र करून तयार झालेला टेक्नो स्पार्क ड्युओ उत्तम ब्रँड आहे. हा फोन नेब्युला ब्लॅक आणि रॉयल पर्पल अशा दोन आकर्षक आणि समकालीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. 

कमी प्रकाशातील फोटोंचा त्रास टाळा 

कॅमेरा ऑप्टिक्ससह टेक्नो पार्क गो 8 मेगापिक्सेल एआय रेअर कॅमेरा देतो, एफ2.0 चे लहान छिद्र आणि रात्रीसाठी वापरता येणारे 2.0 अल्गोरिदम यांच्या जोडीने फोनमध्ये ड्युएल फ्लॅशही उपलब्ध आहे. यामुळे तुम्ही घेतलेले छायाचित्र सुस्पष्ट, ठळक आणि सुंदर येते, अगदी कुठल्याही प्रकारचा प्रकाश असला तरीही. तर दुसरीकडे, टेक्नो स्पार्क 4 एअर पहिलावहिला ड्युएल लेन्स कॅमेरा देते, तोही 13 मेगापिक्सेल एफ1.8 प्रायमरी सेन्सर असलेला, यामुळे तुम्हाला हवी असलेली पोर्टेट अगदी उत्तमच खेचली जातात. ड्युएल फ्लॅश लाइट तुमचा अंधारातला फोटोही सुंदरच रिझल्ट देते. याशिवाय स्पार्क ड्युओमध्ये पोर्टेट, एचडीआर, नाइट मोड आणि प्रोफेशनल कॅमेराची सेटिंग्ज इतक्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे, यामुळे तुमच्या एकूण फोटोग्राफीच्या अनुभवात कमालीची वृद्धीच होते. 

तुमचा सेल्फी घेण्याचा अनुभव अधिक समृद्ध करा 

स्लिट फ्रंट फ्लॅशसह 5 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा हा डॉट नॉच डिस्प्लेमधला महत्त्वाचा घटक आहे, यामुळे कुठल्याही प्रकाशात तुमचा फोटो अतिशय उत्तमच खेचला जातो. फ्लॅश लाइटमुळे तुमचा सेल्फी अधिक टोकदार आणि चमकदार येतो, अगदी कमी उजेड असला तरीही. एआय ब्युटी मोड, पोर्टेट मोड, इन बिल्ट लोकलाइज्ड एआर स्टीकर्स आणि वाइड सेल्फी मोड यासारखी भरपूर वैशिष्ट्ये यात देण्यात आलेली आहेत, यामुळे तुमच्या सेल्फी घेण्याचा अनुभव अधिकाधिक चांगलाच होतो. एआय ब्युटी मोड आणि अॅडजस्ट करता येणारा फ्लॅश लाइट, यामुळे तुमच्या पाठिमागे काहीही वातावरण असले किंवा कसाही उजेड असला तरीही तुम्ही व्हिडिओ कॉलवर बोलताना अतिशय सुंदरच दिसता.

तुमचा स्मार्टफोन अनलॉक करण्याच्या अनुभवावर भर 

टेक्नो स्पार्क ड्युओने वापरकर्त्यांसाठी अतिरिक्त सुरक्षितता वापरली आहे, यासाठी फेस अनलॉक 2.0 या अत्याधुनिक सुरक्षितता पर्यायाचा वापर अनलॉक करण्यासाठी केला आहे, यामुळे तुमचे डोळे बंद असताना तुमचे डोळे बंद असताना फोन अनलॉक होणार नाही. आता तुमची स्क्रीन अधिक जलद आणि सुरक्षितपणे अनलॉक करता येणार आहे. फेस अनलॉक 2.0 तुमच्या स्क्रीनमध्ये फील लाइट वैशिष्ट्यही घेऊन येते, यामुळे अंधारातही तुम्हाला स्क्रीन ताबडतोब अनलॉक करता येते. याशिवाय टेक्नो स्पार्क 4 एअरमुळे अँटी-ऑइल फिंगरप्रिंट सेंसर दिला जातो, खास भारतीय ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून हे वैशिष्ट्य देण्यात आले आहे. इतकेच नाही, तर ग्राहकांना त्यांची खासही अॅप लपवता येतात आणि केवळ तीन सेकंदात फिंगरप्रिंटसह स्क्रीनवर पुन्हा आणता येतात. सुरक्षितता हा आता गंभीर मुद्दा राहिलेला नाहीये. सुरक्षितता, खासगीपणा आणि सुलभता यांचे उत्तम मिश्रण तुम्हाला फक्त 7 हजार रुपयांत उपलब्ध झाले आहे. 

विना अडथळा मल्टी टास्किंगचा अनुभव

या फोनमध्ये डिस्प्ले, डिझाईन आणि सुरक्षिततेची वैशिष्ट्ये ठळक आहेतच. परंतु ड्युओमध्ये प्रचंड 3000 एमएएच बॅटरी क्षमतेसह उत्तम ऊर्जा बचत तंत्रज्ञान समाविष्ट्य करण्यात आले आहे, यामुळे वापरकर्त्यांना इंटरनेटवर विविध संहिता पाहताना, फोटोंवर क्लिक करताना आणि त्याचवेळेस कॉल करताना कोणताही अडथळा जाणवणार नाही. फोन एकदा पूर्णपणे चार्ज झाला की तुम्ही सलग 9.8 तास विना अडथळा एकामागोमाग एक व्डिडिओ पाहू शकता, 7.6 तास वेबवर ब्राउझ करू शकता, 10 तास कॉलवर बोलू शकता आणि 12.4 तास संगीत ऐकू शकता. 

सुधारित ऑपरेटिंग सिस्टम एचआयओएस 5.0

अँड्रॉइड 9.0 एचआयओएसवर आधारित टेक्नो स्पार्क ड्युओ तुम्हाला एआय व्हिडिओ कॉल, स्मार्ट पॅनेल, कुठल्याही त्रासाशिवायचे नोटिफिकेशन्सचे व्यवस्थापन, एआय रीड मोड, एआय बॅटरी लॅब आणि सेफ चार्जिंग अशा सुधारित वैशिष्ट्यांसह कमाल अनुभव देतो. यासारख्या अनेक वैशिष्ट्यांमुळे तुमचा फोन वापरण्याचा अनुभव अधिकाधिक समृद्ध होतो. 

प्रवेश करतानाच सर्वोत्तम कामगिरी आधी देणारा फोन 

मीडीया टेक हेलिओ ए22, 2.0 गिगाहर्ट्झ क्वाड कोर प्रोसेसर आणि 2 जीबी रॅम यासह सज्ज असलेला टेक्नो स्पार्क गो अतिशय शार्प कामगिरी करतो आणि कुठल्याही त्रासाशिवाय चालतो. ड्युओतर्फे ड्युएल व्होएलटीई सिम सोल्युशन हे भविष्यकाळातील सुसज्ज वैशिष्ट्यही दिले जाते. तसेच स्पार्कड्युओसह ग्राहक 4जी व्होएलटीई दोन्ही सिम लॉटमध्ये वापरू शकतात, तेही एकाच वेळेस, याशिवाय ग्राहकांना या फोनमध्ये 3 इन 1 मल्टी कार्ड स्लॉटसुद्धा उपलब्ध होतो, ग्राहक ड्युएल नॅनो सिम यात वापरू शकतात आणि मायक्रो एसडी कार्ड वापरून 256 जीबी पर्यंतची विस्तारीत मेमरी मिळवू शकतात. यामुळे तुमचे मल्टी टास्किंग अधिक लाभ देणारे ठरते.

मॉडेल  टेक्नो स्पार्क गो  टेक्नो स्पार्क ४ एअर 
डिस्प्ले 6.1″ HD+ डॉट नॉच डिस्प्ले  6.1″ HD+ डॉट नॉच डिस्प्ले 
प्रोसेसर  MTK Helio A22 2.0GHz  क्वाड-कोर  MTK Helio A22 2.0GHz  क्वाड-कोर 
रॅम/रॉम  2GB रॅम  & 16GB रॉम  (256GB पर्यंत विस्तारीत ) 3GB RAM & 32GB ROM (256GB पर्यंत विस्तारीत )
सॉफ्टवेअर   Android 9.0 आधारीत HiOS 5.0  Android 9.0 आधारीत HiOS 5.0 
सेल्फी कॅमेरा  5 MP AI Selfie कॅमेरा फ्लॅशसह 5 MP AI Selfie कॅमेरा फ्लॅशसह
रिअर कॅमेरा 8MP ड्युअल फ्लॅश सह AI कॅमेरा  13MP+VGA ड्युअल फ्लॅश सह AI कॅमेरा 
सिम स्लॉट  ड्युअल सिम + मेमरी कार्ड  ड्युअल सिम + मेमरी कार्ड 
बॅटरी  3000mAh 3000mAh
सुरक्षा फीचर  AI फेस अनलॉक  AI फेस अनलॉक  + अँटी ऑईल फिंगरप्रिंट 
रंग  नेबूला ब्लॅक  आणि रॉयल पर्पल  नेबूला ब्लॅक  आणि रॉयल पर्पल 
किंमत  INR 5,499 INR 6999
   


यासोबतच सर्व डिव्हायसेससाठी “111” अभिवचनाच्या माध्यमातून टेक्नो स्मार्टफोन्सना एका वर्षात वन टाईम स्क्रीन रिप्लेसमेंट गॅरंटी, 100 दिवसांची फ्री रिप्लेसमेंट आणि 1 महिन्याची विस्तारीत वॉरंटीही दिली जात आहे.”

टेक्नो मोबाईलविषयी:

टेक्नो मोबाईल हा ट्रान्सशियन होल्डिंग्जचा प्रिमियम मोबाईल फोन ब्रँड असून त्यांची फिचर फोन्स, स्मार्ट फोन्स आणि टॅबलेटच्या मोबाईल उपकरण पोर्टफोलियोची संपूर्ण श्रेणी आहे. एक ब्रँड म्हणून टेक्नो परिवर्तनशील अत्याधुनिक तंत्रज्ञान आपल्या उत्पादनांत देऊ करतो. ‘थिंक ग्लोबली, अ‍ॅक्ट लोकली ही टेक्नोची गाईडलाईन आहे. 2006 मध्ये टेक्नोची स्थापना झाली असून जगभरातील 60 देशांमध्ये टेक्नोचे अस्तित्व आहे. हा आफ्रिकेतील तीन सर्वोत्तम ब्रँडसपैकी एक आहे आणि जगातील एक मातब्बर कंपनी मानली जाते. टेक्नो मँचेस्टर सिटी फुटबॉल क्लबची अधिकृत स्मार्ट फोन्स आणि हँडसेट पार्टनर आहे. अधिक माहितीकरिता, कृपया संपर्क साधा : www.tecno-mobile.com

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "टेक्नो कडून ‘सेगमेंट प्रथम’ 6.1, एचडी + डॉट नॉच डिस्प्ले आणि एआय फ्रंट फ्लॅश फोन फक्त 5499 रुपयांत सादर; भारतात संपूर्ण नवीन स्पार्क सिरीजचे लाँचिंग!"

Leave a comment

Your email address will not be published.


*