70-90% भारतीयांमध्ये ड जीवनसत्वाचा अभाव आणि मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा धोका

IMG-20190828-WA0010

संपूर्ण भारतात 2019 मध्ये केलेल्या अभासानुसार ड जीवनसत्व कमतरता आणि उच्च रक्तदाब तसेच टाईप 2 मधुमेह यांच्यात दुवा असल्याचे आढळले.

  • सुमारे 70-90% भारतीयांमध्ये ड जीवनसत्वाचा अभाव आढळतोआणि या कमतरतेपायी बाळांच्या आणि बालकांच्या सांगाड्याच्या वाढीवर तसेच प्रौढांमध्ये हाडांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. त्याशिवायया कमतरतेमुळे मधुमेहउच्च रक्तदाब आणि हृदय-श्वसन संबंधी आजार जडण्याचा धोका आहे.
  • संपूर्ण भारतात 2019 मध्ये केलेल्या अभासानुसार ड जीवनसत्व आणि उच्च रक्तदाब तसेच टाईप 2 मधुमेह यांच्यात दुवा असल्याचे आढळले. या अभ्यासात असे दिसून आले कीटाईप 2 मधुमेह रुग्णांपैकी 84.2% ना ड जीवनसत्वाची कमतरता होती, तर 82.6% ना उच्च रक्तदाबाचा त्रास होता.
  • या निरीक्षणातून या मोठ्या प्रमाणावर पसरणाऱ्या कमतरतेविषयी तपासणीनिदान आणि उपचाराची गरज अधोरेखित होते, ज्यामुळे संसर्गजन्य नसलेल्या आजारांचा धोका आणि ताण कमी करायला मदत होऊ शकते.

29 ऑगस्ट, 2019, मुंबई: बिगर संसर्गजन्य आजार (एनसीडी) भारताच्या सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यावश्यक असून त्याद्वारे विकार आणि मृत्यूमध्ये भरीव वाढीला आयते कोलीत सापडते. एनसीडीमध्ये टाईप 2 मधुमेह आणि उच्च रक्तदाब झपाट्याने बळावत आहेत. पी जी तळवलकर, वैशाली देशमुख, एम. सी. दीपक आणि दिनेश अगरवाल लेखक असलेल्या भारतभर 2019 दरम्यान करण्यात आलेल्या अभ्यासानुसार ड जीवनसत्वाच्या कमतरतेचा संबंध हा टाईप 2 मधुमेह आणि उच्च रक्तदाब यांच्याशी आढळला. या अभ्यासानुसार 84.2% रुग्ण हे टाईप 2 मधुमेहग्रस्त तर 82.6% रुग्ण मधुमेहबाधित आढळले. या महत्त्वाच्या विशिष्टपणे भारतात करण्यात आलेल्या निरीक्षणानुसार संशोधन मंडळाने देखील जीवनसत्व ड आणि गंभीर आजारांचा संबंध असल्यावर शिक्कामोर्तब केला.

भारतात, अनेक अभ्यासांमधून असे समजते की, 70% ते 90%लोकसंख्येला जीवनसत्व ड’ची कमतरता जाणवते, हिवाळ्यात तर जीवनसत्व ड’ची पातळी शोधणे जवळपास दुरापास्त असते.[1] &[2]  त्याशिवाय, अभ्यासातून दिसते की, उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा प्रदेशात कमतरतेच्या पातळीत फारसा बदल आढळून येत नसून कमतरता व्याप्ती अनुक्रमे 88%, 90%, 93%  आणि 91%राहिली.[3] मुंबईत अभ्यासातून आढळले की, शहरी प्रौढांमध्ये जीवनसत्व ड कमतरतेचे प्रमाण 88% होते.[4] ड जीवनसत्व हा अतिशय महत्त्वपूर्ण असा  सूक्ष्म पोषक घटक आहे, ज्यामुळे शरीरातील कल्शियम आणि फॉस्फोरस नियंत्रित होण्यासाठी मदत होते. हाडे, दात आणि स्नायू आरोग्यदायक ठेवण्यासाठी यांचा उपयोग होतो.[5] ड जीवनसत्व हे एकंदर आयोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरते.[6] कमतरतेचा संबंध हा हृदय आणि श्वसनसंबंधी आजार, मधुमेह,कर्करोग आणि क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारांशी आहे.[7] ड जीवनसत्व शरीराच्या आत संश्लेषित होत असते[8] म्हणजे ते पूर्णपणे शरीराद्वारे तयार केले जात असले तरीही त्याकरिता संपूर्ण शरीराला सूर्यप्रकाश मिळणे गरजेचे असते. या पोषक घटकाचे जगभरात योग्य निदान किंवा उपचार योग्यप्रकारे होत असून ते अतिशय दुर्लक्षित राहिलेले जीवनसत्व मानले जाते.[9]

भारतासारख्या देशात सूर्यप्रकाश मुबलक आढळत असला, तरीही ड जीवनसत्वाच्या कमतरतेची कारणे अनेक आहेत. अनेक लोकांना पुरेसा सूर्यप्रकाश उपलब्ध होत नाही. तसेच आधुनिक जीवनशैलीमुळे घराबाहेर व्यायाम करणे तसेच मोकळा वेळ काढणे शक्य होत नाही. त्याव्यतिरिक्त हवेतील वाढत्या प्रदुषणामुळे त्वचेत जीवनसत्व ड संश्लेषित होण्यासाठी आवश्यक असलेल्या युवीबी किरणांच्या प्रक्षेपणाला अडथळा येतो.[10] कपड्यांच्या पुराणमतवादी प्रथांसोबत निगडीत असलेल्या सामाजिक नियमांचा भर, त्वचेचा गोरेपणा म्हणजे आकर्षकपणा अशा बेगडीपणाला भुलून दुपारच्या वेळेत सूर्यप्रकाशात फिरणे टाळले जाते. वास्तविक ही वेळ फारच फायदेशीर मानली जाते. त्याशिवाय, शाकाहाराला भारतीय आहारात फारच महत्त्व आहे,त्यामुळे देखील ड जीवनसत्वाने समृद्ध अन्नघटक सेवनापासून दूर राहतात.[11] लोकसंख्येची आणखी एक बाजू म्हणजे गरीबी. ज्यामुळे कुपोषणाचा समाजात शिरकाव होतो. या जीवनसत्वाचा अभाव दूर करण्यासाठी आवश्यक अन्नघटक समाजातील अशा वर्गाच्या आहारात समाविष्ट होणे अशक्यच असते.[12]

जीवनसत्वाचा अभाव जवळपास सर्वच वयोगटात आढळतो, यामध्ये लिंग किंवा विशिष्ट व्यवसाय-भेद आढळून येत नाही. [13]  कमतरतेचे परिणाम महत्त्वाचे मानले जातात. बालपण तसेच पौगंडावस्थेत जीवनसत्व ड सोबत पुरेसा कॅल्शियमयुक्त आहार प्रौढपणात आवश्यक असलेली हाडांची घनता गाठण्याच्या दृष्टीने आवश्यक ठरतो.[14] ज्या बालकांच्या हाडांमध्ये खनिजांचे प्रमाण अल्प असते, त्यांच्यात सांगाड्याशी संबंधी विकृती म्हणजे रिकेटस् आढळतो.[15]  अबोटच्या मेडिकल डायरेक्टर डॉ. श्रीरुपा दास सविस्तरपणे सांगतात की, “भारतात 84% गर्भवती महिलांमध्ये ड जीवनसत्वाची कमतरता आढळते, ज्याचा परिणाम नवजात शिशूंच्या ड जीवनसत्व पातळीवर देखील दिसून येतो.[16] ड जीवनसत्वाचा अभाव असलेल्या मातांना प्रसूतीपूर्व आणि प्रसूतीपश्चात सांगाडा निर्मिती विकासात अडथळे येतात. ज्याचा परिणाम उंची आणि हाडांच्या-आरोग्यावर होतो.” प्रौढ व्यक्तींमध्ये ड जीवनसत्वाच्या कमतरतेचा संबंध हा अल्प अस्थी घनता आणि स्नायूंच्या कमजोरीशी असतो. ज्यामुळे अस्थिभंग आणि ऑस्टीयोमलेशिया, ऑस्टीयोपेनिया आणि ऑस्टीयोपोरोसीससारख्या हाडांच्या विकृतींमध्ये वाढ होण्याचा धोका बळावतो.[17] & [18]

या कमतरतेचा संबंध गंभीर आजाराशी आहे. ड जीवनसत्वाच्या अभावाचा संबंध टाईप 2 मधुमेह आणि उच्च रक्तदाबाशी होता, असे पी. जी. तळवलकर लेखक असलेल्या 2019 च्या भारतभर केलेल्या अभ्यासात असे आढळते. या प्रातिनिधिक अभ्यासात अल्प ड जीवनसत्वे (अभाव आणि अपुरेपणा) असलेले एकंदर 83.7% रुग्ण होते. त्यापैकी 82% नव्याने निदान झालेल्या केस होत्या. नव्याने निदान झालेल्या केसमध्ये ड जीवनसत्वाच्या वाढत्या अभावामुळे रुग्णांमध्ये टाईप 2 मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा दोन्ही विकारांचे सर्वाधिक प्रमाण आढळले.

तळवलकर डायबेटीज क्लिनिकचे डॉ. पी जी तळवलकर यांच्या निरीक्षणानुसार, “84% हून अधिक रुग्णांमध्ये ड जीवनसत्वाच्या कमतरतेपायी टाईप 2 मधुमेहाचे प्रमाण आढळले तर 82% रुग्णांमध्ये उच्च रक्तदाबाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. या अभ्यासात जीवनसत्वाच्या कमतरतेसोबत हायपोथीरोडीझम आणि लठ्ठपणा किंवा प्रमाणाबाहेर वजन यांच्या परस्पर-संबंधाची छाननी करण्यात आली. सर्वाधिक (76%) हायपोथीरॉईड रुग्णांमध्ये ड जीवनसत्वाची अल्प पातळी आढळली. त्याशिवाय, 82% रुग्ण लठ्ठ किंवा प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे होते, ज्याचा संबंध जीवनसत्वाच्या कमतरतेशी, सहाय्यक विकार आणि शरीराच्या वजनाशी असल्याकडे अंगुलीनिर्देश करण्यात आला. या निरीक्षणातून नियमित तपासणीतून प्रारंभिक अवस्थेत निदान होण्याची गरज अधोरेखित झाली, ज्यामुळे ड जीवनसत्वाचे व्यवस्थापन होऊन बिगर संसर्गजन्य आजारांशी संबंधित ताण किंवा धोके कमी होण्यास मदत होऊ शकते.”

कमतरतेपायी रुग्णांमध्ये गंभीर आजार जडून गुंतागुंत होण्यात भर पडते. उदाहरणार्थ, अगोदरच्या लोकसंख्या अभ्यासात आढळले आहे की, ज्या रुग्णांमध्ये ड जीवनसत्वाच्या कमतरतेसोबत उच्च रक्तदाबाचा त्रास असतो, त्यांच्यात इस्केमिक स्ट्रोकचा धोका तिप्पट वाढतो.[19]काही कमतरता किंवा उच्च जोखीम असल्यास त्वरित उपचार गरजेचा ठरतो, पूरक औषधांचे सेवन जीवनसत्व अभावावरील एक सर्वाधिक खात्रीलायक उपाय आहे. [20]  डॉ. पी जी तळवलकर म्हणतात की, “सर्वसाधारणपणे, 60,000 आययुचा डोस 8 आठवडे घेणे श्रेयस्कर ठरते.[21], अर्थात हे प्रमाण घेतेवेळी वय, विकास टप्पा, गर्भारपण आणि हंगामी बदल असे घटक लक्षात घेतले पाहिजेत.[22] एकदा का जीवनसत्वाचा पुरेसा संग्रह झाला की मग तो टिकवण्यासाठी सोबतच दुपारच्या वेळी 30 ते 45 मिनिटे सूर्यप्रकाशात फिरावे, ड जीवनसत्व आणि कल्शियमयुक्त आहार घ्यावा. रुग्णाच्या आवश्यकतेनुसार आणि स्थितीनुरूप त्यासोबत सप्लिमेंटेशन सुरू ठेवावे. ड जीवनसत्वयुक्त आहारात भरपूर सूर्यप्रकाशात आढळणारे कॉड लिव्हर ऑईल, साल्मन मासा, मॅकेरेल, सार्डिन, ट्युना, अंड्याचे बलक आणि मशरूमचा समावेश होतो.[23]”

त्याशिवाय ड जीवनसत्वाच्या आहारासोबत शरीरात त्याचे पुरेसे संश्लेषण होते आहे याची खातरजमा करावी, ज्यामुळे त्याचा पुरेसा संग्रह राहतो. ड जीवनसत्वाचा कल्पक पुरवठा कसा होतो हे अतिशय महत्त्वाचे ठरते. भारतात करण्यात आलेल्या एक अभ्यासात आढळून आले की, मुलांमध्ये दुधातून मिळणाऱ्या मेदयुक्त जीवनसत्व D3 च्या तुलनेत सप्लिमेंटेशनच्या अनुषंगाने मिळणारे प्रमाण हे ड जीवनसत्वाचे प्रमाण वाढविण्यात उपयुक्त ठरते. [24] वास्तविक सर्वच मुलांना पुरेसे जीवनसत्व हे सप्लिमेंटेशनच्या रुपात द्यावे. याचप्रकारच्या 2015 मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासातून[25] निदर्शनास आले होते की,अपूर्व औषध पुरवठा प्रणाली, जसे की अबोटतर्फे सुरू करण्यात आलेल्या नॅनोटेक्नोलॉजीने ड जीवनसत्वाचे मोठ्या प्रमाणावर संश्लेषण केले होते. जे पारंपरिक तयारीहून 90% अधिक होते. पारंपरिक पद्धतीत ते 50% च्या आसपास होते.

डॉ. श्रीरुपा दास म्हणाल्या की, “जीवनसत्व कमतरतेचे वाढते प्रमाण आणि अभावाचे परिणाम पाहता, पुरेसे ड जीवनसत्वाची गरज ओळखणे आरोग्याच्या दृष्टीने प्राधान्याचे ठरेल. सूक्ष्म पोषक घटक (मायक्रोन्यूट्रीयंट) विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी अबोट वचनबद्ध आहे. प्रतिबंधात्मक उपचार पद्धतींचा वापर केल्याने जीवनसत्वाच्या पुरेशा प्रमाणाची खातरजमा राहते आणि त्यात कल्पकता उपलब्ध करून देण्यासाठी शरीरात जास्तीतजास्त संश्लेषणाची खातरजमा राहते.”

[1] PG Talwalkar, Vaishali Deshmukh, M.C. Deepak. Prevalence and Clinico-Epidemiology of Vitamin D deficiency in Patients with Type-2 Diabetes Mellitus and Hypertension: A Cross-sectional, Observational, Pan-India Study. Indian Journal of Diabetes and Endocrinology. 2019;1(1):11-18.

[2] Indian Journal of Endocrinology and Metabolism: The Endocrine Society of India expert group guidelines on Vitamin D deficiency in India: Recommendations for prevention and treatment: A commentary (2016)

[3] Studies referenced in Ritu J Vitamin D Deficiency in India: Prevalence, Causalities and Interventions 2014

[4] Ritu J Vitamin D Deficiency in India: Prevalence, Causalities and Interventions 2014

[5] https://www.nhs.uk/conditions/vitamins-and-minerals/vitamin-d/

[6] https://www.who.int/elena/titles/vitamind_infants/en/

[7] Nutrients: Vitamin D Deficiency in India: Prevalence, Causalities and Interventions (2014)

[8] Indian Journal of Endocrinology and Metabolism: The Endocrine Society of India expert group guidelines on Vitamin D deficiency in India: Recommendations for prevention and treatment: A commentary (2016)

[9] Indian Journal of Endocrinology and Metabolism: The Endocrine Society of India expert group guidelines on Vitamin D deficiency in India: Recommendations for prevention and treatment: A commentary (2016)

[10] Journal of Association of Physicians India: Vitamin D Deficiency: Indian Scenario (2011)

[11] Nutrients: Vitamin D Deficiency in India: Prevalence, Causalities and Interventions (2014)

[12] Nutrients: Vitamin D Deficiency in India: Prevalence, Causalities and Interventions (2014)

[13] Journal of Association of Physicians India: Vitamin D Deficiency: Indian Scenario (2011)

[14] Nutrients: Vitamin D Deficiency in India: Prevalence, Causalities and Interventions (2014)

[15] Harinarayan CV. How to treat Vitamin D deficiency in sun-drenched India – guidelines. J Clin Sci Res 2018;7:131-40

[16] Indian J Med Res 127, March 2008, pp 229-238

[17] Molecular nutrition and food research: Modern India and the vitamin D dilemma: evidence for the need of a national food fortification program (2010)

[18] Harinarayan CV. How to treat Vitamin D deficiency in sun-drenched India – guidelines. J Clin Sci Res 2018;7:131-40

[19] PG Talwalkar, Vaishali Deshmukh, M.C. Deepak. Prevalence and Clinico-Epidemiology of Vitamin D deficiency in Patients with Type-2 Diabetes Mellitus and Hypertension: A Cross-sectional, Observational, Pan-India Study. Indian Journal of Diabetes and Endocrinology. 2019;1(1):11-18.

[20] Indian Journal of Endocrinology and Metabolism: The Endocrine Society of India expert group guidelines on Vitamin D deficiency in India: Recommendations for prevention and treatment: A commentary (2016)

[21] Nutrients: Vitamin D Deficiency in India: Prevalence, Causalities and Interventions (2014)

[22] Indian Journal of Endocrinology and Metabolism: The Endocrine Society of India expert group guidelines on Vitamin D deficiency in India: Recommendations for prevention and treatment: A commentary (2016)

[23] Harinarayan CV. How to treat Vitamin D deficiency in sun-drenched India – guidelines. J Clin Sci Res 2018;7:131-40

[24] J Pediatr Endocrinol Metab 2016; 29(12): 1373-1377

[25] Journal of Pharmaceutical Investigation: Ex-vivo absorption study of a nanoparticle based novel drug delivery system of vitamin D3 (Arachitol NanoTM) using everted intestinal sac technique (2016)

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "70-90% भारतीयांमध्ये ड जीवनसत्वाचा अभाव आणि मधुमेह तसेच उच्च रक्तदाबाचा धोका"

Leave a comment

Your email address will not be published.


*