कॅस्ट्रोल इंडियाने ग्राहकांसाठी कार्बन न्युट्रल शाश्वतता सोल्युशन्स सादर केले

Photo By GPNPhoto By GPN
Photo By GPN

Photo By GPN

●        भारतातील उद्योगक्षेत्रामधील अशा प्रकारच्या पहिल्याच उपक्रमामध्ये बेंगळुरू येथील प्रथम मोटर्स झाली पहिली ‘कॅस्ट्रॉल सर्टिफाइड कार्बन न्युट्रल’ कार डीलरशिप

●        कार्बन उत्सर्जन कमी करून आपली कामे शून्य कार्बन पद्धतीने सुरू करण्यास कॅस्ट्रोल वाहन डीलरशिप्सना मदत करणार

●        कॅस्ट्रोल सर्टिफाइड कार्बन न्युट्रल प्रोग्राम सरकारच्या शाश्वतता उद्दिष्टांना पूरक

बेंगळुरू27 ऑगस्ट 2019 – कॅस्ट्रोल इंडिया लिमिटेड या भारतातील अग्रगण्य वाहन व औद्योगिक वंगण(ल्युब्रिकंटउत्पादन कंपनीने भारतात या उद्योगक्षेत्रातील पहिला कॅस्ट्रोल सर्टिफाइड कार्बन न्युट्रल कार्यक्रम सुरू केला आहेवाहन डीलरशिप्सना कार्बन उत्सर्जन कमी करण्यामध्ये हा कार्यक्रम मदत करणार आहे.*

प्रथम मोटर्स ही बेंगळुरूमधील आघाडीची वाहन डीलरशिप पहिली कॅस्ट्रोल सर्टिफाइड कार्बन न्युट्रल डीलरशिप ठरणार आहेया डीलरशिपने आपल्या १२ विक्री व सेवा केंद्रांवरील कामांद्वारे होणारे कार्बन उत्सर्जन १०० टक्के कमी केले आहेप्रथम मोटर्सद्वारे सध्या होणाऱ्या कार्बन उत्सर्जनाचा अंदाज काढण्यात तसेच डेमो व कर्टसी कार्सकार्यशाळा व शोरूम्समधील विजेचा वापर तसेच व्यवसायासाठी होणारा प्रवास या डीलरशिपच्या सर्व ऑपरेन्समधील कार्बन उत्सर्जन कमी करण्यात कॅस्ट्रोलने प्रथम मोटर्सला सहाय्य केले.याशिवायप्रथम मोटर्स आपल्या ग्राहकांना वाहनातील कार्बन उत्सर्जन शून्यावर आणून १०,००० किलोमीटरपर्यंत कार्बन न्युट्रल ड्रायव्हिंग करण्याचा पर्यायही देणार आहेबीपी टार्गेट न्युट्रलच्या सहाय्याने कॅस्ट्रोलने हा कार्यक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमाच्या माध्यमातून प्रथमने १,४५९ टन CO2eचे उत्सर्जन कमी केले आहे**, एखाद्या व्यक्तीने बेंगळुरू ते मुंबई असा विमान प्रवास ८,६०० वेळा करण्यासाठी एवढा कार्बन उत्सर्जित होतो.

प्रथम मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी समर भसीन यावेळी म्हणाले, “एकंदर पर्यावरणविषयक आव्हानाची दखल घेऊन आम्ही प्रथम मोटर्समधील उत्सर्जन कमी करण्यास उत्सुक आहोतआमच्या डीलरशिपमधील कार्बन उत्सर्जन कमी करण्यात कॅस्ट्रोल इंडियासोबत काम करायला मिळालेयाचा आम्हाला आनंद आहेयाशिवाय पुढील पिढीसाठी एक शाश्वत भविष्य देण्याच्या आमच्या प्रयत्नांत आमचे ग्राहकही आम्हाला मदत करत आहेत.”

कॅस्ट्रोल इंडिया लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक ओमेर डॉर्मेन या घोषणेबद्दल म्हणाले, “कार्बन उत्सर्जन कमी असलेल्या पर्यावरणाच्या दिशेने होणाऱ्या स्थित्यंतरात सहाय्य करणे हे आमचे धोरण आहे.आमच्या ग्राहकांद्वारे कार्बन उत्सर्जन कमी व्हावे यासाठी मदत करणारी उत्पादने व सोल्युशन्स तयार करणे हा याचाच भाग आहेभारतातील उद्योगक्षेत्रामधील पहिला शाश्वतता उपक्रम सुरू केल्याचा आम्हाला अभिमान आहेकॅस्ट्रोल सर्टिफाइड कार्बन न्युट्रल प्रोग्राममुळे प्रथम मोटर्सला पर्यावरण संवर्धनात आघाडीचे स्थान मिळवणे तसेच त्यांच्या ग्राहकांना कार्बन उत्सर्जन घटवण्यात मदत करणे शक्य झाले आहे.”

या अनोख्या ऑफरसह कॅस्ट्रोलच्या कार्बन न्युट्रल उत्पादनश्रेणीचा पुरवठाही सातत्याने सुरू आहे– कॅस्ट्रोल एज प्रोफेशनल आणि कॅस्ट्रोल मॅग्नाटेक प्रोफेशनल ही उत्पादने भारतातील फ्रँचायशी वर्कशॉप ग्राहकांना पुरवली जात आहेत.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "कॅस्ट्रोल इंडियाने ग्राहकांसाठी कार्बन न्युट्रल शाश्वतता सोल्युशन्स सादर केले"

Leave a comment

Your email address will not be published.


*