ट्विटरच्या ‘हॅशटॅग’चा 12 वा वर्धापनदिन;

IMG_20190823_235014

#Viswasam,#LokSabhaElections2019 आणि#CWC19  हे 2019 मधील सर्वाधिक ट्विट केलेले हॅशटॅग

‘हॅशटॅग डे’चे औचित्य साधून मंचाच्या वतीने विशेष इमोजीचे अनावरण

23 ऑगस्ट, 2019: जेव्हा जगात एखादी घटना घडते,त्यावेळी ट्विटर अनेक वर्षांपासून हॅशटॅगच्या स्वरुपात सर्वाधिक महत्त्वाच्या घडामोडींची नोंद घेत आले आहे. आज इंटरनेटवर या हॅशटॅगचा 12 वा वर्धापनदिन साजरा होत असताना, ट्विटरने भारतात 2019 या वर्षाच्या पूर्वार्धात आपल्या मंचावरील संभाषणात वर्चस्व गाजविलेल्या सर्वाधिक पसंतीच्या हॅशटॅग्जचे अनावरण केले.

सर्वाधिक पसंतीचा ठरलेला एक हॅशटॅग ट्रेंडज्यातून ट्विटरवर प्रादेशिक मनोरंजनाचा उदय प्रतिबिंबित होतोतो आहे तमिळ अॅक्शन-ड्रामा फिल्म#Viswasam 

त्यानंतर या क्रमात राजकारण आणि प्रशासनावरील संभाषणांचा क्रमांक येतो.#LokSabhaElections2019 च्या प्रचार मोहिमांदरम्यान राजकारणी आणि राजकीय पक्षांनी ट्विटरवर भारतीय नागरिकांशी आणि संपूर्ण जगाशी संवाद साधण्याकरिता या हॅशटॅगचा पुरेपूर वापर केला तर नागरिकांनी मंचावर लढतीत उतरलेल्या नेत्यांना थेट तक्रारी करण्यासाठी या हॅशटॅगचा उपयोग केला.

जगभरातील क्रिकेटचा चाहतावर्ग वर्ल्ड कपच्या निमित्ताने एकवटला, त्यावेळी विजेते क्षण, धक्कादायक निर्णय, अभिजात झेल, आणि चषकाशी संबंधित अभिनव माहिती, पावसाचे मिम्स याकरिता #CWC19हा वर्षातील 3 ऱ्या क्रमांकाचा हॅशटॅग ठेवला.

मनोरंजन क्षेत्राने नवीन ट्रेंड बनविणे सुरू ठेवल्याने भारतीय तेलुगु भाषेतील अॅक्शन-ड्रामा फिल्म#Maharshi चौथ्या क्रमांकावर होती.

#NewProfilePic ने मंचावर दृश्यात्मक मजकुराला चालना दिली, कारण मंचावरील वापरकर्ते या हॅशटॅगचा वापर करून स्वत:ची प्रोफाईल छायाचित्रांचे अपडेट ट्विट करत होतेत्यामुळे हा वर्षातील 5 व्या क्रमांकाचा सर्वाधिक ट्विट केलेला हॅशटॅग ठरला.

त्याशिवायट्विटरने समुदाय आणि संभाषणांना एकत्रित करणाऱ्या चिन्हाचा इमोजी ट्विटरने लॉंच केला. या खासकरून डिझाईन करण्यात आलेल्याइमोजीमध्ये हॅशटॅग चिन्हाच्या स्टॅम्पसोबत हृदय होते. ज्या माध्यमातून संवादाचे सौंदर्य दिसत होते. हॅशटॅगने ऑनलाईन संभाषणाच्या पद्धतीने कसे परिवर्तन आणले,त्याचे दर्शन या हॅशटॅगमधून पाहायला मिळाले. त्यामुळे वैश्विक संभाषणे आणि हालचाली अधिक बळकट झाले.

इमोजी दिवसभर लाइव्ह राहणार असून इंग्रजी आणि हिंदीत उपलब्ध असेल. विश्वातले वापरकर्ते संभाषणात सहभागी होऊन स्वत:च्या संभाषणाला#HashtagDayand #हैशटैगदिवस हॅशटॅग करून साजरा करतील.

ट्विटरवर हॅशटॅगचा जन्म 10 हून अधिक वर्षांपूर्वी झालाआणि आज त्याने सर्वाधिक मान्यता मिळवली असूनवर्षानुवर्षे अनेक चिन्हांचा सढळ हाताने वापर केला.

वापरकर्त्यांनी ट्विट करण्यासाठी हॅशटॅगची शक्ती कशी वापरावी ते पहा:

  • हॅशटॅगचा वापर वास्तविक ट्विटच्या वर्गवारीसाठी केला जातो – ट्विट करताना समर्पक संकेतशब्द किंवा शब्दसमुहाच्या अगोदर(#) हे चिन्ह वापरावे
  • एखाद्या विशिष्ट संकल्पनेवरील संभाषण पाहण्यासाठी कोणत्याही संदेशावरील केवळहॅशटॅग शब्दावर क्लिक करा आणि समान हॅशटॅग तुमच्या टाईमलाईनवर झळकतील
  • लोकप्रिय हॅशटॅग बऱ्याचदा Trending Topics म्हणून झळकतील
  • जर अंतर राखले किंवा विरामचिन्हांच्या चुका राहिल्यास हॅशटॅग काम करणार नाही
  • वापरकर्त्याने सार्वजनिक खात्यावर हॅशटॅगवापरून ट्विट केल्यास, एखाद्याने त्या हॅशटॅगने सर्च केल्यास हे ट्विट सहज दिसू लागेल

#HashtagDay च्या शुभेच्छा!

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "ट्विटरच्या ‘हॅशटॅग’चा 12 वा वर्धापनदिन;"

Leave a comment

Your email address will not be published.


*