सिग्निफायतर्फे भारतात लिवस्पेसबरोबर संलग्नितता जाहीर

  • सिग्निफायची लाइटिंग उत्पादने लिवस्पेसच्या व्यासपीठावरून इंटिरिअर डिझाइनर्ससाठी उपलब्ध होणार
  • लिवस्पेसच्या ग्राहकांना कंपनीच्या भारतभरातील केंद्रांतून फिलिप्स ह्यू स्मार्ट लाइटिंगचे पर्याय निवडता येऊ शकतात

नवी दिल्लीभारत– सिग्निफाय Signify(युरोनेक्स्ट : लाईट), (फिलिप्स लाइटिंग नावाने प्रसिद्ध) या लाइटिंग उद्योगक्षेत्रातील अग्रेसर असलेल्या कंपनीने आज लिवस्पेसबरोबर भागीदारी केल्याचे जाहीर केले आहे, लिवस्पेस ही होम डिझाईन आणि रिनोव्हेशनमधली भारत व आग्नेय आशियातील आघाडीची कंपनी आहे. घरे सुशोभित करण्यासाठी सिग्निफायची उत्पादने इंटिरिअर डेकोरेटर्स आणि आर्किटेक्ट यांना, या भागीदारीचा भाग म्हणून भारतातील लिवस्पेसच्या व्यासपीठावरून उपलब्ध करून दिली जातील. याबरोबरच ग्राहक लिवस्पेस एक्सपिरिअन्स केंद्रांवरही भेट देऊ शकतात, येथे त्यांना फिलिप्स ह्यू स्मार्ट लाइटिंग उत्पादनांची विस्तारित श्रेणी उपलब्ध होईल आणि ही सर्व उत्पादने भारतभरातील दुकानांमध्ये उपलब्ध असतील.

स्मार्ट लाइटिंगमध्ये कंपनीने आताच पाऊल टाकले आहे आणि भारतातही हा प्रकार वाढतो आहे, स्मार्ट होम असिस्टंट आणि इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे हा प्रकार सर्वदूर पोहचतो आहे. नवीन घर बांधताना किंवा घराची दुरुस्ती करताना ग्राहक स्मार्ट लाइटिंगच्या पर्यायांमध्ये रुची दाखवत आहेत, अशा प्रकारचे लाइटिंग वापरायला सोपे आहेच शिवाय ते सौंदर्य वाढवणारेही आहे. या भागीदारीतून आम्ही स्मार्ट लाइटिंगचे अनेक पर्याय सादर करत आहोत,यामुळे ग्राहकांना त्यांचे घऱ डिझाईन करता येणार आहे, हे पर्याय लिवस्पेसच्या व्यासपीठावरून उपलब्ध होतील.

“भारतात घराला चार चाँद लावण्यात लिवस्पेसचा हात कुणी धरू शकत नाही. आमच्याकडे ग्राहकांच्या नव्या घरासाठी किंवा रिनोव्हेशनसाठी उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. ही भागीदारी झाल्यामुळे आम्ही अतिशय आनंदी झालो आहोत, यामुळे ग्राहकांना स्मार्ट लाइटिंगची विस्तारित श्रेणी उपलब्ध होणार आहे,’’ असे भारतातील सिग्निफाय कंपनीचे प्रमुख विपणन अधिकारी सुकांतो आयच म्हणाले. “या भागीदारीमुळे भारतात अधिकाधिक स्मार्ट लाइटिंगबाबत लोकांमध्ये प्रसार होण्यास मदत होणार आहे, अलिकडेच स्टार स्पोर्टसवरच्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यानच्या लाइव्ह शोमध्ये फिलिप्स ह्यूबद्दल आम्ही ब्रँड कँपेन राबवली आहे.’’

“लाइटिंगमुळे घराच्या अंतर्गत सजावटीचे सौंदर्य वाढते, घरातील वातावरण बदलते. सिग्निफाय या क्षेत्रात अग्रेसर असून, 127 वर्षांपासून कार्यरत आहे,’’ असे कीचन, फर्निचर अँड डेकॉर व्यवसायाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष सौरभ जैन म्हणाले. “आमच्या ग्राहकांना होम इंटिरिअरचा उत्तम अनुभव आमच्याकडून हवा आहे, या भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांना तो नक्की मिळेल असा विश्वास मला वाटतो. मार्केटमध्ये अग्रेसर असलेल्या आणि ज्यांची उत्पादने आमच्या ग्राहकांना खात्रीपूर्वक सेवा आणि अनुभव देऊ शकतील अशा भागीदारांबरोबर लिवस्पेस काम करण्यास नेहमीच उत्सुक असते.’’

फिलिप्स ह्यू Philips Hue ही एक वैयक्तिक वायरलेस लाइटिंग सिस्टम आहे, यामुळे तुम्हाला घरात कुठल्याही प्रसंगानुरूप वातावरणनिर्मिती करता येते. एखादी डीनर पार्टी असो की मित्र-मैत्रिणींबरोबरचा एखादा गेम प्लॅन, किंवा नुसताच आराम करायचा असो, अगदी ऑफिसच्या कामानंतरचा `मी टाइम’अनुभवायचा असो, यापैकी कुठल्याही कारणासाठी तुम्हाला हवा तसा लाइट करून घेता येतो. तुमच्या खोलीप्रमाणे तुम्ही हवा तो रंग निवडू शकता, यासाठी तुमच्याकडे 16 अब्ज रंग उपलब्ध आहेत, इतकंच नाही तर फिलिप्स ह्यूतर्फे सफेद रंगाच्या अनेक शेडही देण्यात येतात, या रंगांमुळे तुमच्या दरदिवशीच्या लाइटिंगचा एक्स्ट्रा ऑर्डिनरी अनुभव घेता येतो. फिलिप्स ह्यू सिंक अॅप, ग्राहकांना ऑन स्क्रीन अॅक्शनद्वारे त्यांच्या फिलिप्स ह्यू लाइट्सचा ब्राइटनेस हवा तसा अॅडजस्ट करण्याची संधी देते, याबरोबरच गेमचा, सिनेमाचा आणि संगीताचा आवाजही यासह अॅडजस्ट करता येतो. लाइट आणि करमणूक एकत्रितपणे ग्राहकांना समृद्घ अनुभव देतात, आणि हा अनुभव नक्कीच विशेष ठरतो.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "सिग्निफायतर्फे भारतात लिवस्पेसबरोबर संलग्नितता जाहीर"

Leave a comment

Your email address will not be published.


*