जेके टायर अँड इंडस्ट्रीजच्या जागतिक स्तरावरील निर्मिती सेवांना मान्यता प्राप्त

IMG_20190824_000833ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलच्या व्यावसायिक आरोग्य आणिसुरक्षितेतच्या ऑडिटमध्ये पाच तारांकने प्राप्त

  • चेन्नई, मैसूर, बनमोर आणि लकसर येथील निर्मिती प्लांट्ससाठीसन्मानित

नवी दिल्ली, 23 ऑगस्ट 2019 जेके टायर   अँडइंडस्ट्रीज या भारतातील रेडिअल तंत्रज्ञानात अग्रेसरअसणाऱ्या कंपनीने उद्योगक्षेत्रातील प्रमुख निर्मितीसेवांसाठी दर्जात्मक टप्पा गाठला आहे.

कंपनीने ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलतर्फे आयोजितकरण्यात आलेल्या व्यावसायिक आरोग्य आणिसुरक्षिततेच्या ऑडिटमध्ये पाच तारांकने प्राप्त केलीआहेत, सर्वोत्तम सेवांसाठी हे यश प्राप्त झाले आहे,आरोग्य व सुरक्षित व्यवस्थापन यंत्रणा आणि संलग्नितसेवा यासाठीच्या वचनबद्धतेची प्रात्यक्षिके कंपनीनेयावेळी दिली.

जेके टायरला चेन्नईमैसूरबनमोर आणि लकसरयेथील चार निर्मिती सेवांसाठी ब्रिटीश सेफ्टीकौन्सिलतर्फे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या प्लांटच्या साइट विस्तारीत, योग्य आणि मूल्यांकीतव्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षेची धोरणे, प्रक्रियाआणि सेवा राबवतात. या ऑडिट प्रक्रियेत परिक्षणकरण्याबरोबरच ज्येष्ठ व्यवस्थापन कर्मचारी, कर्मचारीआणि इतर भागधारक यांच्या मुलाखती घेण्यात आल्या,ऑपरेशनल उपक्रमांची उदाहरणे एकत्रितपणे पाहलीगेली.

या ऑडिटमध्ये प्रामुख्याने आरोग्य आणि सुरक्षिततेचेव्यवस्थापन यांच्या सर्वोत्तम सेवा निर्देशकांचे मूल्यांकनकेले गेले, तसेच आमच्या 60 घटकांचे तपशीलवारपरिक्षण करण्यात आले. जेके टायरला ऑडिटनंतरसर्वोत्तम सेवांसाठी पाच तारांकने प्राप्त झाली.

ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलच्या धोरणे आणि तांत्रिकसेवांचे संचालक डेव्हीड पार म्हणाले की, “आमच्याव्यावसायिक सर्वोत्तम सेवा आरोग्य आणि सुरक्षिततेच्याऑडिटमध्ये पाच तारांकने मिळवणे हे आउटस्टँडिंग यशआहे आणि संस्थेच्या योग्य कामाची ती पोचपावतीचआहे, ही संस्था आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीनेसातत्याने सुधारणा करत असते आणि आपल्याकर्मचाऱ्यांना येणाऱ्या धोक्यांचे, आरोग्याचे, सुरक्षिततेचेआणि कल्याणाचे  व्यवस्थापन करत असते.’’

यानिमित्ताने जेके टायर अँड इंडस्ट्रीज लिमिटेडचेअध्यक्ष (इंडिया ऑपरेशन्सश्रीराजीव प्रसादम्हणाले की, “हे प्राप्त झालेले यश म्हणजे जागतिकस्तरावरील निर्मिती व्यवस्थापनाचा दर्जा आमच्या सर्वप्लांटमध्ये राबवणे, त्यासाठी वचनबद्ध असणे यालामिळालेली पोचपावतीच आहे. प्रमाणपत्र प्राप्तझाल्यामुळे आम्हाला सुरक्षित उत्पादन निर्मितीच्या दिशेनेअसेच प्रयत्न करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले आहे.’’

जेके टायर अॅण्‍ड इंडस्‍ट्रीज लिमिटेड विषयी:(

जेके ऑर्गनायझेशनचा भाग असलेली जेके टायर अॅण्‍ड इंडस्ट्रीज लि. ही भारतातील अग्रणी टायरउत्पादक कंपनी असून जगभरातील सर्वोत्तम  टायर उत्पादकांपैकी एक आहे. ऑटोमोबाइल उद्योगक्षेत्रातील विविध व्यापारी विभागांसाठी उत्पादनांचे 25 विस्तृत पर्याय कंपनी देऊ करते. जेके टायर ही सुपरब्रँड 2017च्या यादीमध्ये दाखल झालेली भारतातील एकमेवर टायर उत्पादक कंपनी आहे व हा सन्मान कंपनीला सहा वेळा मिळाला आहे. 

सहा खंडांमधील 100 देशांमध्ये जेके टायरच्या उत्पादने उपलब्ध आहेत. त्यामागे भारतातील 9 व मेक्सिकोतील 3 अशा 12 निर्मितीकेंद्रांचे भक्‍कम पाठबळ कंपनीच्या मागे आहे. या सर्व केंद्रांमधून होणारे टायर उत्पादन आज प्रतीवर्ष 35 दशलक्ष इतके आहे. एप्रिल 2016 मध्ये जेके टायरने बिर्ला टायर्सकडून कॅव्हेंडिश इंडिया लि. ही कंपनी हस्तगत केली. या संपादनामुळे कंपनीच्या उत्पादनकेंद्रांमध्ये आणखी तीन आधुनिक निर्मितीकेंद्रांची भर पडली व त्यांचा एकूण आकडा 12 वर गेला. यामुळे कंपनीला दुचाकी/तिचाकी वाहनांच्या क्षेत्रातही जोरदार मुसंडी मारता आली. 2018 मध्‍ये कंपनीने म्‍हैसूर येथे अत्‍याधुनिक रघुपती सिंघानिया सेंटर ऑफ एक्‍सलन्‍सचे (आरपीएससीआई) उद्घाटन केले.  

भारतात रेडिअल तंत्रज्ञानाचा पाया घालणार्‍या जेके टायरने 1977 साली आपले पहिले रेडिअल टायर तयार केले व आज ही कंपनी ट्रक बस रेडिअल विभागात नेतृत्वपदी विराजमान आहे. गेल्या तीन दशकांच्या कालावधीत तंत्रज्ञानातील नाविन्यपूर्ण संकल्पना सातत्याने राबविणार्‍या या कंपनीकडे आज प्रत्येक प्रकारच्या प्रवासी तसेच व्यापारी वाहनांसाठी टायर्सची विस्तृत श्रेणी उपलब्ध आहे. यात 3 किलोग्रॅम वजनाच्या दुचाकी चाकापासून ते 3.5 टन वजनाच्या ओटीआर टायर्सपर्यंत सर्व पर्यायांचा समावेश आहे. 

जेके टायर्स अँड इंडस्ट्रीज लि.कडे 4000 वितरक आणि स्टील-व्हील्स व एक्सप्रेस व्हील्स नावाचे 400 हून अधिक समर्पित ब्रँड शॉप्स आहेत, जे आपल्या ग्राहकांना संपूर्ण समस्या समाधान पुरवतात. 

पाच तारांकित व्यावसायिक आरोग्य आणि सुरक्षितता ऑडिट बद्दल 

पाच तारांकित ऑडिट हे विस्तारीत, समकालीन आणि प्रमाणित प्रक्रिया आहे, यामध्ये आरोग्य आणि सुरक्षितता व्यवस्थापनातील कामगिरीचे अत्याधुनिक सर्वोत्तम सेवा तंत्रज्ञानावर आधारित मूल्यांकन केले जाते. 

या ऑडिट प्रोसेसमध्ये कागदपत्रांचे परिक्षण, व्यवस्थापन आणि इतर भागधारकांच्या मुलाखती घेतल्या जातात, तसेच ऑपरेशनल सँपलिंगही केले जाते. 

या ऑडिटनंतर ज्या संस्थांना पाच तारांकने प्राप्त झाली आहेत अशा संस्था ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल स्वॉर्ड ऑफ ऑनर अवॉर्डमध्ये प्रवेश करण्यासाठी पात्र ठरतात, या पुरस्कारात आरोग्य आणि सुरक्षिततेच्या व्यवस्थापनातील सर्वोत्कृष्टतेला मान्यता दिली जाते. 

ही पुरस्काराची स्कीम स्वतंत्र राबवली जाणारी प्रक्रिया आहे, यासाठी पाच तारांकने प्राप्त करणाऱ्या संस्थेने ऑडिट फाइंडिंगवर उभारणी आणि सातत्यशील सुधारणा योजनां लेखी सादर करणे आवश्यक असते. 

ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल बद्दल

कामाच्या ठिकाणी कुणीही जखमी होऊ नये किंवा आजारी पडू नये यावर ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलचा ठाम विश्वास आहे. 

1957 वर्षी ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलची स्थापना झाली, अपघातांपासून, कुठल्याही अडथळ्यांपासून किंवा प्रतिकूल परिस्थितीपासून कामगारांचे संरक्षण करणे हा कौन्सिलचा मुख्य हेतू होता. यूकेमध्ये सुरक्षिततेसाठी कायदा व्हावा यामध्ये कौन्सिलची भरीव भूमिका होती. कौन्सिलचे सदस्य 60 पेक्षा जास्त देशांतील कामगारांचे संरक्षण करणे आणि त्यांच्या कल्याणार्थ प्रयत्न करणे यासाठी वचनबद्ध आहेत, आरोग्यदायी आणि सुरक्षित कामाचे ठिकाण व्यवसायासाठीही चांगले असते असा कौन्सिलचा विश्वास आहे.

आपल्या परोपकारी कामात ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलने सर्व क्षेत्र, सेवांमध्ये आरोग्य आणि सुरक्षिततेच्या नेटवर्किग फोरमचे नेतृत्व केले आहे, याबरोबरच ब्रिटन आणि इतर देशांमध्येही सर्वोत्तम सेवांना प्रोत्साहन दिले आहे. याशिवाय विविध सेवा आणि उत्पादने, प्रशिक्षण, पात्रता, प्रकाशने, ऑडिट आणि पुरस्कार अशी सर्वोतपरी मदत कौन्सिलतर्फे केली जाते. ब्रिटीश सेफ्टी कौन्सिल, आपल्याकडे काम करणारा कामगार दिवसाच्या अखेरीस सुरक्षितपणे कामाच्या ठिकाणाहून घरी जावा यासाठी काम करणाऱ्या संस्था, चॅरिटी आणि वैयक्तिक स्तरावर काम करते. 

आमच्या संस्थेला कोट करताना तुम्ही ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलचे काम संक्षिप्त स्वरूपात देण्यापेक्षा बीएससीबद्दल तपशीलवार माहिती दिलीत तर आम्ही आपले आभारी असू. 

ब्रिटीश सेफ्टी कौन्सिलचे नेटवर्क्‍स: 

वेबसाइट: www.britsafe.org

ट्विटर: www.twitter.com/britsafe

फेसबुक: www.facebook.com/britishsafetycouncil

यूट्यूब: www.youtube.com/britishsafetycouncil

लिंक्‍डइन ग्रुप: www.linkedin.com/company/british-safety-council

सेफ्टी मॅनेजमेंट मॅगझीन: https://sm.britsafe.org 

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "जेके टायर अँड इंडस्ट्रीजच्या जागतिक स्तरावरील निर्मिती सेवांना मान्यता प्राप्त"

Leave a comment

Your email address will not be published.


*