जग्वार लॅण्ड रोव्हरने पुण्यात केले ३एस रिटेलर फॅसिलिटीचे उद्घाटन

Jaguar Land Rover - Pune 3S Retailer Launch (5)
Jaguar Land Rover - Pune

Jaguar Land Rover – Pune

  • ४४६० चौरस मीटरहून अधिक क्षेत्रात पसरलेलीअतिप्रगत ३एस (सेल्ससर्व्हिस आणि स्पेअर पार्ट्स)रिटेलर फॅसिलिटी११ कार डिसप्ले आणि १८ सर्व्हिसबेजचा समावेश आणि जग्‍वार व लॅण्‍ड रोव्‍हरच्‍या मोठ्या श्रेणीचे प्रदर्शन
  • डीलरशिप पुणेबेंगळुरू महामार्गावरील मोक्याच्याठिकाणी
  • देशातील २५ प्रमुख शहरांतील २७आउटलेट्समध्ये जग्वार लॅण्ड रोव्हर इंडियाचे वितरणजाळे

पुणे, २३ ऑगस्ट २०१९ : जग्वार लॅण्ड रोव्हर इंडियाने आज आपली पुण्यातील नवीन ३एस रिटेलर फॅसिलिटी एसीई पर्किन्ससोबत सुरू केली. जग्वार लॅण्ड रोव्हर इंडियाचा स्थानिक उत्पादन कारखाना पुण्यात आहे आणि ही रिटेलर फॅसिलिटी पुणे-बेंगळुरू महामार्गावर अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे. सयाजी हॉटेलच्या शेजारी असलेली ही फॅसिलिटी या प्रदेशातील सर्व ग्राहकांसाठी सोयीची आहे. नवीन फॅसिलिटीचे उद्घाटन जग्वार लॅण्ड रोव्हर इंडिया लिमिटेडचे(जेएलआरआयएल) अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी,एस पर्किन्सचे व्यवस्थापकीय संचालक विक्रम मोदी आणि संचालक विवेक मोदी यांच्या हस्ते झाले.

डीलरशिप फॅसिलिटी ४४६० चौरस मीटर क्षेत्रात पसरलेली आहे.सर्वोच्च दर्जाच्या विक्री व विक्रीउत्तर सेवा पुरवण्याच्या दृष्टीने या फॅसिलिटीचे डिझाइन करण्यात आले आहे. फॅसिलिटीमध्ये जग्वार व लॅण्ड रोव्हरच्‍या वाहनांची व्‍यापक श्रेणी प्रदर्शनासाठी ठेवण्याची सोय आहे. त्याचबरोबर कस्टमायझेशनसाठी डिजिटल पर्सनलायझेशन स्टुडिओ आणि डेडिकेटेड अप्रुव्ह्ड विभाग येथे आहे. या फॅसिलिटीमध्ये एक एकात्मिक सेवा कार्यशाळा असून यामध्ये अतिप्रगत उपकरणे व ती हाताळण्यासाठी टेक्निशिअन्स व अन्य सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली उच्चस्तरीय प्रशिक्षणप्राप्त टीम आहे.

जग्वार लॅण्ड रोव्हर इंडिया लिमिटेडचे (जेएलआरआयएल)अध्यक्ष  व्यवस्थापकीय संचालक रोहित सुरी म्हणाले: “आम्ही सात वर्षांहून अधिक काळापासून एस पर्किन्सशी जोडलेले आहोत आणि पुण्यातील नवीन ३एस फॅसिलिटीसोबत ही भागीदारी अधिक दृढ करताना आम्हाला आनंद होत आहे. ही एकात्मिक, अत्याधुनिक फॅसिलिटी आमच्या मौल्यवान ग्राहकांना विक्री, विक्रीउत्तर सेवा व सुटे भाग एकाच छताखाली देऊ करेल. या फॅसिलिटीचे स्थळही सर्वांसाठी सोयीस्कर आणि सहज पोहोचण्याजोगे आहे.”

ग्राहक जग्वारसाठी  www.findmeacar.in  या तर लॅण्ड रोव्हरसाठी www.findmeasuv.in या ऑनलाइन बुकिंग प्लॅटफॉर्मवर जाऊन कार बुक करू शकतात.

जग्वार व लॅण्ड रोव्हरच्या भारतातील उत्पादन श्रेणीबाबत अधिक माहिती घेण्यासाठी कृपया भेट द्या-www.jaguar.in आणि www.landrover.in

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "जग्वार लॅण्ड रोव्हरने पुण्यात केले ३एस रिटेलर फॅसिलिटीचे उद्घाटन"

Leave a comment

Your email address will not be published.


*