हिरो विमेन्‍स इंडियन ओपनच्‍या लेडिज युरोपियन टूरमधील १०व्‍या पर्वामध्‍ये युकेची बेकी मॉर्गन यशस्‍वी घोडदौड कायम ठेवणार

IMG_20190823_233819

IMG_20190823_233734

  • सलग दुस-या वर्षासाठी जागतिक स्‍तरावर थेट प्रक्षेपण
  • ५००,००० युएस डॉलर्सचे बक्षीस
  • गुरूग्राममध्‍ये ३ ते ६ ऑक्‍टोबर २०१९ दरम्‍यान स्‍पर्धेचे आयोजन

गुरूग्राम, २३ ऑगस्ट, २०१९:

हिरो विमेन्‍स इंडियन ओपन ही देशातील सर्वात मोठी व्‍यावसायिक महिला गोल्‍फ स्‍पर्धा २०१९ एडिशनसह प्रतिष्ठित लेडिज युरोपियन टूरमध्‍ये १०व्‍या वर्षात पदार्पण करण्‍यासाठी सज्‍ज आहे.

हिरो विमेन्‍स इंडियन ओपन २०१९ ही स्‍पर्धा ३ ते ६ ऑक्‍टोबर २०१९ दरम्‍यान गुरूग्राममधील गॅरी प्‍लेअर लेआऊट ऑफ द डीएलएफ गोल्‍फ आणि कंट्री लब येथे आयोजित करण्‍यात येणार आहे.

वर्ष २००७ मध्‍ये सुरू झालेल्‍या या स्‍पर्धेच्‍या बक्षीसाची रक्‍कम ५००,००० युएस डॉलर्स आहे. वर्ष २००९ मध्‍ये ही स्‍पर्धा लेडीज युरोपियन टूरचा भाग बनली आणि तेव्‍हापासून प्रत्‍येक सरत्‍या वर्षासह स्‍पर्धेचा दर्जा वाढला आहे. सलग दुस-या वर्षासाठी हिरो विमेन्‍स इंडियन ओपन स्‍पर्धा चार दिवस ७२ होल्‍सवर खेळली जाईल आणि जागतिक स्‍तरावर या स्‍पर्धेचे थेट प्रेक्षपण करण्‍यात येईल.

हिरो इंडियन ओपन २०१९च्‍या आंतरराष्‍ट्रीय सहभागींमध्‍ये गतविजेती युकेची बेकी मॉर्गन आणि २०१७ मध्‍ये विजेती ठरलेली फ्रान्‍सची कॅमीली शेवालीयर यांचा समावेश आहे. स्‍पर्धेसाठी खेळाडूंची नोंदणी जोमाने सुरूवात झाली आहे. यंदा देखील सॉल्‍हेम कपचे खेळाडू,जबरदस्‍त फॉर्मात असलेली सध्‍याची कर्णधार कॅट्रियोना मॅथ्‍यू यांच्‍यासह तगडी स्‍पर्धा होण्‍याचे संकेत दिसून येत आहेत. नोंदणी बंद होण्‍यासाठी भरपूर कालावधी असताना मैदानावरील जुगलबंदीचा उत्‍साह वाढतच जाणार आहे.

हिरो मोटोकॉर्पच्‍या कॉर्पोरेट कम्‍युनिकेशनचे प्रमुख श्री. भरतेंदू काबी म्‍हणाले, भारतातील विमेन्‍स गोल्‍फमध्‍ये अलिकडील वर्षांत दर्जेदार खेळाडू व स्‍पर्धांचे प्रमाण वाढताना दिसत आहे. भारतातील महिला गोल्‍फर्स आंतरराष्‍ट्रीय दौ-यांवर आपल्‍या खेळ व कौशल्‍याची छाप पाडत आहेत आणि भवितव्‍य खूपच चांगले दिसत आहे. दोन दशकांहून अधिक काळापासून जगभरातील खेळाला पाठिंबा दिलेल्‍या हिरो मोटोकॉर्पमध्‍ये आम्‍हाला गोल्‍फमधील ही प्रगती पाहून अभिमान वाटतो. हिरो विमेन्‍स इंडियन ओपन सारख्‍या स्‍पर्धा या प्रगतीचे मोठे स्रोत ठरले आहेत. आम्‍ही आशा करतो की, ही स्‍पर्धा अनेक उदयोन्‍मुख गोल्‍फर्सना या खेळाकडे एक पसंतीचे करिअर म्‍हणून पाहण्‍यास प्रोत्‍साहित करेल. आम्‍ही या स्‍पर्धेला, तसेच गेल्‍या दशकापासून भारतातील महिलांच्‍या गोल्‍फला पाठिंबा दिलेल्‍या लेडिज युरोपियन टूरचे आभार मानतो.

लेडिज युरोपियन टूरचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी श्री. मार्क लिचेंथिन म्‍हणाले, लेडिज युरोपयिन टूरला हिरो विमेन्‍स इंडियन ओपनमध्‍ये आमचा दीर्घकालीन सहयोग सुरू ठेवण्‍याचा अभिमान वाटतो. एलईटीच्‍या वतीने मी गेल्‍या १० वर्षापासून आणि भविष्‍यामध्‍ये सतत पाठिंबा देणा-या हिरो मोटोकॉर्प आणि डब्‍ल्‍यूजीएआयचे मन:पूर्वक आभार मानतो. आमच्‍या सदस्‍यांना चॅम्पियनशीपचा वाढता प्रोफाइल व दर्जाप्रती योगदान देण्‍याचा आनंद झाला आहे. यामुळे ही रोमांचक स्‍पर्धा स्‍थानिक व जागतिक पातळीवर सादर करण्‍यासाठी परिपूर्ण व्‍यासपीठ मिळते.

विमेन्‍स गोल्‍फ असोसिएशन ऑफ इंडियाच्‍या अध्‍यक्षा श्रीम. कविता सिंग म्‍हणाल्‍या,  विमेन्‍स गोल्‍फ असोसिएशन ऑफ इंडियाला आमचे शीर्षक प्रायोजक हिरो मोटोकॉर्प लि.च्‍या पाठिंब्‍यासह हिरो विमेन्‍स इंडियन ओपनच्‍या १३व्‍या पर्वाचे आयोजन करण्‍याचा अभिमान वाटत आहे. ही स्‍पर्धा आणि हिरो विमेन्‍स प्रोफेशनल गोल्‍फ टूरचा वर्षानुवर्षे होत असलेला विकास आणि भारतीय खेळाडू करत असलेली चांगली कामगिरी पाहून आम्‍हाला प्रेरणा मिळते. गेल्‍या वर्षी बक्षीस रक्‍कमेमध्‍ये वाढ आणि जगभरात थेट प्रेक्षपणासह हिरो विमेन्‍स इंडियन ओपन ख-या अर्थाने लेडिज युरोपियन टूरमधील महत्‍त्‍वाची स्‍पर्धा बनली आहे. डब्‍ल्‍यूजीएआयच्‍या वतीने मी सातत्‍याने पाठिंबा देणारे हिरो मोटोकॉर्प, लेडिज युरोपियन टूर आणि इतर अनेक प्रायोजक व हितचिंतकांचे मन:पूर्वक आभार मानतो.

हिरो विमेन्‍स इंडियन ओपनमध्‍ये नेहमीच भारतीय महिला गोल्‍फर्सकडून चांगला खेळ दिसून आला आहे. यामधून हिरो विमेन्‍स प्रो गोल्‍फ टूर या स्‍थानिक पातळीवरील टूरमध्‍ये व्‍यावसायिक खेळाडूंसह खेळणा-या उदयोन्‍मुख हौशी खेळाडूंना प्रेरणा मिळत आहे. लेडिज युरोपियन टूरमधील विजेती अदिती अशोकनंतर दिक्षा डागर नुकतीच मार्चमध्‍ये २०१९ साऊथ आफ्रिकन विमेन्‍स येथे विजय प्राप्‍त करत फक्‍त दुसरी भारतीय खेळाडू बनली आहे. अशा काही उत्‍तम खेळाडू देखील आहेत,  अलिकडेलच अव्‍वल १० खेळाडूंमध्‍ये सामील झालेली वाणी कपूर, २०१८ मध्‍ये चांगला खेळ सादर केलेली गौरिका बिश्‍नोई;तसेच त्‍वेसा मलिक व रिधीमा दिलवारी. गौरिका स्‍थानिक हिरो ऑर्डर ऑफ मेरिटमध्‍ये देखील अव्‍वलस्‍थानी आहे.

इतर प्रमुख आंतरराष्‍ट्रीय सहभागी आहेत एलईटी ऑर्डर मेरिटच्‍या माजी विजेत्‍या बेथ अॅलेन व बेकी ब्रेव्हर्टन. तसेच इतर एलईटी विजेते जसे मेघन मॅकलॅरेन, मारियन स्‍कार्पनॉर्ड, कन्‍यालक प्रीडासुत्‍तीजीत,अॅस्ट्रिड वेसन डी प्रॅडेने, फ्लोरिन्‍टान पार्कर आणि लिंडा वेसबर्ग यांच्‍यामध्‍ये देखील तगडी स्‍पर्धा पाहायला मिळणार आहे.

या स्‍पर्धेमध्‍ये स्‍थानिक टूरमधील भारतीय स्‍टार्स आणि आघाडीचे हौशी खेळाडू देखील असणार आहेत.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "हिरो विमेन्‍स इंडियन ओपनच्‍या लेडिज युरोपियन टूरमधील १०व्‍या पर्वामध्‍ये युकेची बेकी मॉर्गन यशस्‍वी घोडदौड कायम ठेवणार"

Leave a comment

Your email address will not be published.


*