एईएमएलतर्फे सुलभ बिल भरणासाठी दहिसरमध्‍ये ‘जिनिअस पे किओस्‍क’ सादर

Photo 02
(L-R) Mr. Rajiv Nakhare, Senior Vice President,  Adani Electricity Mumbai ltd (AEML), Shri Gopal Shetty, Member of Parliament - BJP, Mumbai North and Ms. Sampada Jaint, Head Commercial Management, North Division,  AEML today at the Genius Pay launch in Dahisar (E) near Shailendra School

(L-R) Mr. Rajiv Nakhare, Senior Vice President, Adani Electricity Mumbai ltd (AEML), Shri Gopal Shetty, Member of ParliamentBJP, Mumbai North and Ms. Sampada Jaint, Head Commercial Management, North Division, AEML today at the Genius Pay launch in Dahisar (E) near Shailendra School

– उत्‍तर मुंबईतील भाजप खासदार श्री. गोपाळ शेट्टी यांच्‍या हस्‍ते दहिसरमधील शैलेंद्र एज्‍युकेशन सोसायटी नजीक चौथ्‍या ‘जिनिअस पे सेवेचे उद्घाटन —

— एईएमएल ग्राहकांची सुविधा वाढवण्‍यासाठी मुंबईमध्‍ये’जिनिअस पे किओस्‍क’ स्‍थापित करणार —

मुंबई, 23 ऑगस्‍ट २०१९: ग्राहककेंद्री दृष्टिकोनाप्रती आपली कटिबद्धता कायम राखत अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लि.ने (एईएमएल) आज सुलभ बिल भरणासाठी दहिसरमधील शैलेंद्र एज्‍युकेशन सोसायटीजवळील अदानी रिसीव्हिंग केंद्रामध्‍ये चौथे स्‍वयं-देयक किओस्‍कजिनिअस पे सादर केले. जिनिअस पेच्‍या सादरीकरणासह एईएमएलने बिल भरण्‍याची प्रक्रिया सुलभ केली आहे. ग्राहकांना आता अधिक काळ रांगांमध्‍ये उभे राहावे लागणार नाही. मुंबईतील ग्राहकांच्‍या सोईस्‍कर ठिकाणी जिनिअस पे किओस्‍क स्‍थापित करण्‍यात येतील आणि धनादेश, रोख, डेबिट/क्रेडिट कार्डसच्‍या माध्‍यामतून देयके स्‍वीकारण्‍यात येतील.

एईएमएल मुंबईभरात जिनिअस पे किओस्‍क स्‍थापित करतील, ज्‍यामुळे ग्राहक त्‍यांच्‍यापासून ५ मिनिटांच्‍या जवळच्‍या अंतरावर असलेल्‍या ठिकाणी त्‍वरित देयके भरण्‍यासाठी या स्‍मार्ट, त्रासमुक्‍त आणि इंटरअॅक्टिव्‍ह डिजिटल किओस्‍क यंत्रणेचा वापर करू शकतात. ग्राहकांसाठी जिनिअस पे सेवा रोज सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत उपलब्‍ध असेल. ग्राहक किओस्‍क मशिन्‍सच्‍या माध्‍यमातून बिलांच्‍या डुप्लिकेट कॉपीज देखील प्राप्‍त करू शकतात.

या घोषणेबाबत बोलताना एईएमएलचा प्रवक्‍ताम्‍हणाला, आजच्‍या गतिशील जीवनशैलीमधील वेळेचे महत्‍त्‍व जाणून घेत अदानी इलेक्ट्रिसिटीने बिल भरण्‍याचा अनुभव स्‍मार्ट व सुलभ करण्‍याकरिता आमच्‍या ग्राहकांसाठी जिनिअस पे किओस्‍क यंत्रणा सादर करण्‍याचे ठरवले आहे. मुंबईतील एक आघाडीची वीज वितरण कंपनी म्‍हणून आम्‍ही सातत्‍याने आमच्‍या ग्राहकांना सर्वोत्‍तम सेवा देण्‍यासाठी तंत्रज्ञान सादर करत आहोत. त्‍यांचे समाधान करण्‍याशी आम्‍ही नेहमीच कटिबद्ध आहोत.

एईएमएल सातत्‍याने नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब करण्‍याच्‍या माध्‍यमातून ग्राहक सेवा सुधारत आली आहे.जिनिअस पे या स्‍मार्ट, त्रासमुक्‍त आणि इंटरअॅक्टिव्‍ह यंत्रणेसह एईएमएलने ग्राहक सेवा वाढवण्‍यासाठी चॅटबोट, वॉईसबोट, बिझनेससाठी व्‍हॉट्सअप आणि ऑटोमेटेड आयव्‍हीआर अशा उपयोगी सेवा देखील सादर केल्‍या आहेत.

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड विषयी

अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड या वैविध्यपूर्ण अदानी समूहाचा भाग म्हणजे ऊर्जानिर्मिती, पारेषण आणि रिटेल वीज वितरणाचा एकात्मिक व्यवसाय आहे.ही कंपनी मुंबई व उपनगरांतील ४०० चौरस किलोमीटर भागात पसरलेल्या तीन दशलक्षहून अधिक ग्राहकांना ९९.९९ टक्‍के खात्रीशीर सेवा पुरवते. हे प्रमाण देशातील सर्वोच्च आहे. मुंबईतील सर्वांत मोठ्या आणि सर्वांत कार्यक्षम ऊर्जा वितरण नेटवर्कच्या माध्यमातून अदानी इलेक्ट्रिसिटी २,००० मेगावॅटची विजेची गरज पूर्ण करते.प्रगत तंत्रज्ञानाच्या मदतीने कंपनी ग्राहकांना जागतिक दर्जाची सेवा पुरवते. भारताच्या ‘सर्वांसाठी वीज’ या दृष्टिकोनाशी सुसंगती राखत नवीन भौगोलिक प्रदेशात कार्यक्षेत्र विस्तारण्याची अदानी इलेक्ट्रिसिटीची योजना आहे.

अधिक माहितीसाठी कृपया आमच्याwww.adanielectricity.com या वेबसाइटला भेट द्या.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "एईएमएलतर्फे सुलभ बिल भरणासाठी दहिसरमध्‍ये ‘जिनिअस पे किओस्‍क’ सादर"

Leave a comment

Your email address will not be published.


*