वर्ल्डस्किल्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन २०१९ साठी भारतीय संघ जाहीर

IMG_20190821_000320
  • रशियातील कझान येथे २२ ते २७ ऑगस्ट २०१९ दरम्यान होणाऱ्या ६ दिवसांच्या द्विवार्षिक स्पर्धेमध्ये १८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील ४८ स्पर्धक करणार भारताचे प्रतिनिधित्व
  • देशभरात झालेल्या ५००हून अधिक जिल्हा,राज्यप्रादेशिक व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमधून उमेदवारांची निवड
  • स्पर्धकांचे सरासरी वय २२सर्वांत लहान स्पर्धकाचे वय १७

विश्वस्किल्स आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारे महाराष्ट्रातील 7 जण

image008Tushar Phadatare

तुषार फडतरेवय १९वाहन तंत्रज्ञान
वडिलांचा व्यवसाय: टाटा मोटर्समध्ये कार्यरत

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून तुषार पूर्णवेळ अप्रिंटाइस म्हणून टाटा मोटर्सच्या महाराष्ट्रातील पुणे येथील कारखान्यामध्ये रुजू झाला. त्याची कामाबद्दलची कळकळ आणि निष्ठा यांना प्रत्यक्ष अनुभवातून अनुभवाची जोड लाभल्याने इंडियास्किल्सच्या राष्ट्रीय स्पर्धेत वाहन तंत्रज्ञान विभागात पहिला क्रमांक प्राप्त करण्यात त्याला मदत झाली. आता देशाचे प्रतिनिधित्व करून पदक मिळवण्याची आशा तुषारला वाटत आहे.

image010Divya Umesh Godse

दिव्या उमेश गोडसेवय २२इन्फर्मेशन नेटवर्ककेबलिंग
वडिलांचा व्यवसाय: माजी लष्करी कर्मचारी

दिव्याला लष्कराची पार्श्वभूमी असल्याने शिस्त आणि देशप्रेम हा तिच्या पालनपोषणाचा भागच होता.वर्ल्डस्किल्समध्ये सहभाग हा दिव्यासाठी देशाप्रती असलेली बांधिलकी निभावण्याचाच मार्ग आहे. दिव्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन्सची प्रचंड आवड आहे. ती सध्या पुण्यातील एमआयटी अॅकॅडमी ऑफ इंजिनीअरिंगमधून पदवी घेत आहे. अगदी सुरुवातीच्या स्तरावर असूनही दिव्याने अनेक अनुभवी व्यावसायिकांवर मात करत वर्ल्डस्किल्स कझानसाठीच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आणि ती जे काही करेल, ते सर्वोत्तम पद्धतीने करेल अशा विश्वास देशाला दिला.

image012Omkar Shivaling

ओमकार शिवलिंग गुरववय २०मोबाइलरोबोटिक्स
वडिलांचा व्यवसाय: इंडस्ट्रिअल फॅब्रिकेटर

लहानपणापासून ओंकार रोबोजशी खेळत असायचा.वडिलांना कारखान्यांमध्ये भलीमोठी यंत्रे हाताळताना बघून त्याने स्वत:च यंत्रे तयार करण्याचे ठरवले. या दृष्टीने तयारी म्हणून त्याने पुण्यातील एमआयटी कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन्स इंजिनीअरिंगला प्रवेश घेतला. शिकण्याचा उत्साह असल्याने ओंकारने ५व्या राष्ट्रीय ज्युनियर रोबोकॉन स्पर्धेत तसेच साय-कॉन १७मध्ये स्वयंसेवक म्हणून भाग घेतला होता.ओमकारला ओळखणारे लोक तो अत्यंत कष्टाळू आणि मनापासून काम करणारा असल्याचे सांगतात. तो जे काही करतो ते अगदी मनापासून करतो.

image014RohanRavindra

रोहन रवींद्र हानगीवय २१मोबाइल रोबोटिक्स 
वडिलांचा व्यवसाय: लष्करी अधिकारी

रोहनची आई चित्रकार आहे, तर वडील लष्करात अधिकारी. सध्या रोहन इलेक्ट्रॉनिक्समधून बी-टेक करत आहे. एक इंजिनीअरिंगचा विद्यार्थी म्हणजे तो मोकळ्या वेळात व्हिडिओ गेम्सना चिकटून बसत असेल असे तुम्हाला वाटेल. मात्र, रोहनसाठी मुख्य विरंगुळा आहे इमारती व विमानांची स्केचेस काढणे. त्याच्या मते यामुळे त्याच्या मनाला उत्तेजन मिळते आणि पुनरावृत्तीची मानसिक क्षमता सुधारते. रोहनला देशाची संरचनात्मक(इन्फ्रास्ट्रक्चरल) परिस्थिती सुधारण्याची तसेच देशाला शब्दश: नवीन उंचीवर घेऊन जाण्याची इच्छा आहे.

image016 ShrenikJ. Jugale

श्रेणिक जेगुगळेवय २२प्रिंट मीडिया तंत्रज्ञान
वडिलांचा व्यवसाय: दुकानदार

अहमदनगर जिल्ह्यातील पाथरहाडी या छोट्या गावात राहणाऱ्या श्रेणिकचे वडील उपजीविकेसाठी प्रीटिंगचे दुकान चालवतात. प्रिंट मीडिया तंत्रज्ञान कोणत्याही उद्योगात, मग तो उद्योग छोटा असो, मध्यम असो किंवा मोठा असो, किती अविभाज्य भूमिका बजावू शकते हे लक्षात आल्यानंतर श्रेणीकने प्रिंटिंग इंजिनीअरिंग आणि ग्राफिक्स कम्युनिकेशनमध्ये प्रवेश घेण्याचे व त्यातच करिअर करण्याचे ठरवले. अधिक एक्स्पोजर मिळवण्यासाठी त्याने तैताजा २०१९ या स्किल्स फिनलंड स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. आपली कौशल्ये परिपूर्ण करण्यासाठी तो जर्मनीतील हाइडेलबर्गला जाऊन आला. चौकस बुद्धी घेऊन जन्माला आलेल्या श्रेणीकला तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातील नवीन प्रगतीबद्दल वाचायला खूप आवडते.

image018Shweta Ratanpur

श्वेता रतनपुरावय २२ग्राफिक डिझाइन तंत्रज्ञान
वडिलांचा व्यवसाय: सर्व्हिस इंजिनीअर

श्वेताला तिची आवड खूप लहानपणीच कळली होती.अगदी वयाच्या ८व्या वर्षी आर्ट आणि पेंटिंगच्या क्लासमध्ये नाव घालण्यापासून ते अहमदाबाद येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाइनमध्ये अभ्यास करत असेपर्यंत तिला आपली आवड पक्की माहीत होती.आपली खरी आवड कळली आणि त्या मार्गावर चालता आले याबद्दल ती स्वत:ला सुदैवी समजते. ग्राफिक डिझाइनसोबत तिला वाचनाची आवड आहे. त्यातून विधायक ऊर्जा मिळते असे तिला वाटते.

  • image019Vaibhav S Raut

वैभव एसराऊतवय २२इलेक्ट्रिकलइन्स्टॉलेशन्स
वडिलांचा व्यवसाय: टर्नर फिटर

मासेमारीची आवड असलेला वैभव महाराष्ट्रातील बोईसर या छोट्याशा गावातील आहे. संघर्षाच्या काळात शांत व निश्चयी राहणारा म्हणून तो ओळखला जातो. वैभवने इलेक्ट्रिकल इन्स्टॉलेशन्समधील आपली कौशल्ये परिपूर्ण करण्यासाठी आपला सगळा वेळ व शक्ती वाहून घेऊन काम केले आहे. आपल्या आईवडिलांना अभिमान व आनंद वाटावा असे काहीतरी करण्याची त्याची इच्छा आहे. Ends

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "वर्ल्डस्किल्स इंटरनॅशनल कॉम्पिटिशन २०१९ साठी भारतीय संघ जाहीर"

Leave a comment

Your email address will not be published.


*