टाटा मोटर्सने सर्वांसमोर मांडली भारतातील भविष्यकालीन सार्वजनिक वाहतूक साधने

Rohit Srivastava, VP and Product Line Head, Passenger Commercial Vehicles, Tata Motors at PRAWAAS 2019

Tata CityRide LPO 1515प्रवास २०१९ मध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आली वाहतूक वाहनांची पूर्णपणे नवीन श्रेणी

मुंबई२६ जुलै २०१९: भारतातील अग्रगण्य बस ब्रॅण्ड टाटा मोटर्सने प्रवास २०१९ मध्ये सात नवीन सार्वजनिक वाहतूक वाहने प्रदर्शनासाठी मांडली आहेतदोन वर्षांतून एकदा होणाऱ्या प्रवास प्रदर्शनात प्रवासी वाहतूक क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानेनवकल्पनाउत्पादने व सेवा सर्वांसमोर मांडल्या जातातप्रवास २०१९ हे प्रदर्शन २५ ते २७ जुलै२०१९ या काळात नवी मुंबई येथे भरले आहे.

यंदा टाटा मोटर्सने मॅग्ना १६२३स्टारबस १२१२,सिटीराइड १५१५विंगर ९ सीटरटाटा मॅजिकवरील कॉम्पॅक्ट पेशंट ट्रान्सपोर्ट अँब्युलन्सटाटा हेक्झा एसयूव्ही तसेच ड्रायव्हर व प्रवाशांचा आराम आणि सुरक्षिततेच्या मागण्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने डिझाइन केलेल्या आणि त्याचबरोबर सर्वोत्तम ड्राइव्हॅबिलिटी असलेल्या अल्ट्रा इलेक्ट्रिक बसेस प्रदर्शनात ठेवल्या आहेतउत्कृष्ट कार्यात्मक रचना (डिझाइनआणि अत्याधुनिक नवोन्मेष वापरून उत्पादित केलेल्या या बसेसची ऊर्जाकार्यक्षमता अधिक आहे आणि सर्व्हिस लाइफही दीर्घ आहेया प्रदर्शनात मांडलेल्या अल्ट्रा इलेक्ट्रिक बसेसव्यतिरिक्त कंपनीने कल्पित स्मार्ट सिटीजच्या भविष्यकाळातील वाहतूकविषयक गरजा पूर्ण करण्यासाठी हायब्रिडफ्युएल सेलएलएनजी आणि आर्टिक्युलेटेड बसेस यांसारखी शाश्वत वाहतूक उत्पादनांची श्रेणी विकसित केली आहे.

टाटा मोटर्सच्या प्रवासी व्यावसायिक वाहनविभागाचे प्रोडक्ट लाइन प्रमुख  उपाध्यक्ष श्री.रोहित श्रीवास्तव म्हणालेसंपूर्ण देशातशहरी व ग्रामीण भागातहीजलद गतीने वाढणाऱ्या शहरांमुळे कार्यक्षम सार्वजनिक वाहतुकीची मागणीही प्रचंड वाढली आहेटाटा मोटर्सने उत्पादित केलेल्या बसेसने कायमच ही वाढती मागणी पूर्ण करण्यात हातभार लावला आहे.त्याचबरोबर ड्रायव्हर व प्रवासी यांच्या प्रवासासंदर्भातील गरजा पूर्ण करणारी सर्वोत्तम दर्जाची उत्पादने कंपनीने दिली आहेतआमच्या ग्राहकांना सुरक्षितता तसेच आराम यांच्याशी कोणतीही तडजोड न करता वाहतुकीचा कार्यक्षमपर्यावरणपूरक व परवडण्याजोगा पर्याय देण्यास आमचे प्राधान्य आहेप्रवास २०१९ मध्ये मांडलेल्या उत्पादनांतून आम्हाला भारतीय बाजारपेठेची किती सखोल जाण आहेयाची खात्री पटते.”

टाटा मोटर्सच्या प्रवासी व्यावसायिक वाहनविभागाचे विक्री  मार्केटिंग प्रमुख श्रीसंदीप कुमार्हणतात, “गेल्या अनेक वर्षांपासून बाजारपेठेत आघाडीच्या स्थानावर असल्याने टाटा मोटर्सने बस विभागात अनेक नवकल्पना तसेच सुरक्षितता सुविधांचा पाया घातला आहेआमची विस्तृत उत्पादनश्रेणी ग्राहकांसमोर तसेच अनेकविध संबंधितांसमोर आणण्यासाठी प्रवास २०१९ हे उत्तम व्यासपीठ आहे.आमच्या आगामी धोरणांमध्ये शाश्वत वाहतूक साधने हा पायाभूत घटक असेल तसेच शाश्वत वाढग्राहकांचे समाधान व नफा यांच्यात योग्य समतोल साधून सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात टाटा मोटर्स प्रगती पुढे सुरू ठेवेल हे आम्हाला या प्रदर्शनाच्या माध्यमातून सर्वांना दाखवायचे आहे.”

सार्वजनिक वाहतूक साधनांची विस्तृत श्रेणी विकसित करणारी टाटा मोटर्स भारतात बस विभागात बाजारपेठेत आघाडीच्या स्थानावर आहे (कंपनीच्या भारतातील बाजारपेठेमधील वाटा ३८ टक्क्यांहून अधिक आहे).२०१८१९ या आर्थिक वर्षातशहरातील सार्वजनिक वाहतुकीत दर्जेदार बसेसची मागणी वाढल्याने तसेच पर्यटन क्षेत्राची वाढ झाल्यानेबस उद्योग मागील वर्षाच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढला आहेया स्थिर मागणीनुसार पुरवठा करण्यासाठी टाटा मोटर्स प्रवाशांना अधिक आरामदायी तसेच तंत्रज्ञानात्मक दृष्टीने प्रगत अशा वाहनांचा विकास स्वतकरत राहील आणि त्यायोगे भारतातील जनवाहतुकीच्या क्षेत्रात क्रांती आणत राहील.

कंपनीची व्याप्ती देशाच्या अत्यंत दुर्गम भागातही असून,सर्व ग्राहकांना विक्रीउत्तर सेवा वेळेत दिली जाईल याची काळजी कंपनी घेतेसध्याच्या आर्थिक वर्षात कंपनीने चॅनल पार्टनर्स वाढवून विक्री व सेवा नेटवर्क अधिक भक्कम करण्याची योजना आखली आहे. ‘संपूर्ण सेवाउपक्रमाच्या छत्राखालील मूल्यवर्धित सेवांच्या माध्यमातून ग्राहकांना उत्तम दर्जाच्या विक्रीउत्तर मदतीचा लाभ घेता येईलयामध्ये २४X७ ब्रेकडाउन असिस्टन्स,टाटा झिपीविविध उपयोजनांसाठी एएमसी पॅकेजेस,टेमीमॅटिक्स सेवा म्हणून स्कूलमन तसेच डिलाइट या टाटा मोटर्सच्या लॉयल्टी प्रोग्रामचा समावेश आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.