कॅस्ट्रॉल इंडीया BS VI साठी सज्ज

  • ग्रीन मोबिलिटी आणि कमी कर्बन उत्सर्जनासाठी भारत सरकारच्या मिशनला सहाय्य
  • पोर्टफोलिओ BS VI सज्ज झाल्याची घोषणा
  • ह्या बदलासाठी सज्ज होण्यासाठी 2,50,000 इतकी मॅकेनिक्सची संख्या होणार

मुंबई, 24 जुलै 2019 – कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड ह्या देशातील आघाडीच्या ऑटोमोटीव्ह आणि औद्योगिक लुब्रिकंट उत्पादन कंपनीने आज विविध प्रकारांमधील श्रेणीतील आपल्या BS VI तयारीची घोषणा केली ज्याद्वारे उद्योगामध्ये नव्यानेच अशी वैशिष्ट्ये मिळतील व ती देशाला कमी कार्बन वापराच्या भविष्याच्या निकत घेऊन जातील.

2020 मध्ये येणा-या BS VI उत्सर्जन मानकांच्या संदर्भात, कॅस्ट्रॉलने जागतिक आर अँड डी आणि तंत्रज्ञानाच्या कंपनीच्या एक्सेसच लाभ घेऊन आपले नेतृत्व पुन: स्थापित केले आहे व ह्यामध्ये काही वर्षांपूर्वी युरोपात राबवण्यात आलेल्या युरो 6 मानकांच्या अंमलबजावणीच्या अनुभवाचा समावेश आहे. अधिक स्वच्छ व अधिक हरित मोबिलिटीच्या दिशेने भारत सरकारच्या मिशनला पूरक अशा लुब्रिकंटसह कॅस्ट्रॉल आता सुसज्ज आहे. कॅस्ट्रॉलच्या सज्जतेमध्ये ऑटोमोटीव्ह उद्योगातील एकून वाढीमधील भक्कम भागीदारीचा वाटा आहे.

दुचाकी, प्रवासी कार व व्यावसायिक वाहन इंजिन तेल अशा विविध कॅस्ट्रॉल पॉवर ब्रँडसचा BS VI सज्ज दालनात समावेश आहे व ही उत्पादने ग्राहकांना सुधारित गुणवत्ता आणि परफॉर्मन्सची सतत ग्वाही देतात.

ह्या विश्ष घोषणेविषयी बोलताना, कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडचे मार्केटिंग व्हाईस प्रेसिडंट केदार आपटे ह्यांनी म्हंटले, “आमच्या विविध उत्पादन श्रेणीमध्ये कॅस्ट्रॉल इंडियाच्या BS VI सज्जतेची घोषणा करताना मला आनंद होत आहे. आम्ही भारत सरकारच्या शाश्वततेच्या उद्दिष्टाचे समर्थन करतो आणि कमी कार्बन असलेल्या भविष्याला साध्य करण्यासाठी सोल्युशन्स देण्यासाठी कटिबद्ध आहोत. आम्हांला ठाम विश्वास आहे की, कॅस्ट्रॉल हा भारतीय ऑटोमोटीव्ह उद्योगातील एक विश्वसनीय भागीदार असून तो भारताला पुढे नेत आहे. आमच्या BS VI सज्ज उत्पादन श्रेणीद्वारे उद्योगातील आमचे नेतृत्व तसेच नावीन्यपूर्णता आणि नूतन तंत्रज्ञानाचा आमचा अभिमानास्पद वारसा पुढेही टिकून राहात आहे.”

आम्ही आमच्या मुख्य बिजनेसमधील प्रगती पुढे सुरू ठेवत आहोत आणि ओईएम भागीदारांसोबत व पुरवठादारांसोबत जवळून काम करत आहोत आणि ग्राहकांसोबत खोलवरचे नाते उभे करून आपल्याला प्रतीक्षा आहे तो उत्साहवर्धक बदल घडवत आहोत.”

कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडचे टेक्नोलॉजी हेड राजेश मदतहिंगल ह्यांनी म्हंटले, “भारतीय बाजारपेठेमध्ये आमच्या शंभर वर्षांच्या अनुभवासह जागतिक योग्यतेमुळे आम्ही विविध ग्राहक लाभ होतील अशा प्रकारे तांत्रिक दृष्टीने श्रेष्ठ लुब्रिकंटस सातत्याने देण्यास सक्षम ठरलो आहोत. BS VI सज्ज लुब्रिकंटसची ही श्रेणी कॅस्ट्रॉल इंडियाचे आणखी एक पाऊल आहे जे कमी उत्सर्जन असलेल्या BS VI ऑटोमोटीव्ह इंज़िन्सना पूरक आहे आणि लिक्विड इंजिनिअरिंगच्या दृष्टीने हे एक पुढचे पाऊल आहे.”

बदलत्या ऑटोमोटीव्ह तंत्रज्ञानासंदर्भात विविध भागधारकांमध्ये जागरूकता आणि शिक्षणाच्या जागरूकतेच्या संदर्भातही कॅस्ट्रोल कटिबद्ध आहे. ह्या मुख्य परिवर्तनाशी संबंधित मॅकेनिक्स प्रशिक्षण चालू आहेत व ह्या बदलाच्या तयारीसाठी राष्ट्रीय पातळीवर 2,50,000 मॅकेनिक्सपर्यंत पोहचण्याची योजना सुरू आहे.

कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेडविषयी

कॅस्ट्रॉल इंडिया लिमिटेड ही भारतातील आघाडीच्या लुब्रिकंटस कंपनीपैकी एक आहे व तिने लुब्रिकंटसमधील आघाडीची व नावीन्यपूर्ण कंपनी म्हणून स्वत:ला स्थापित केले आहे =. कॅस्ट्रॉल सीआरबी, कॅस्ट्रॉल जीटीएक्स अशा प्रसिद्ध ब्रँडसह व अलीकडच्या काळातील कॅस्ट्रॉल एक्टीव्ह, कॅस्ट्रॉल मॅग्नेटिक आणि कॅस्ट्रॉल व्हेक्शन अशा पॉवर ब्रँडसह कंपनीच्या उत्पादनांचा वापर देशभरातील लक्षावधी ग्राहक करत आहेत. उच्च परफॉर्मन्स असलेले लुब्रिकंटस आणि मेटलवर्किंग फ्ल्युईडस उद्योगांसारख्या निवडक सेगमेंटमध्येही कंपनीची उपस्थिती आहे व ऑटोमोटीव्ह उत्पादनापासून यंत्रे व पवन व ऊर्जा अशा क्षेत्रांमध्येही कंपनी कार्यरत आहे.

कॅस्ट्रॉल इंडियाचे भारतामध्ये मोठे उत्पादन व वितरण नेटवर्क आहे आणि तीन उत्पादन प्लांटस आणि 350 डिस्ट्रिब्युटर्स असलेले वितरण नेटवर्क आहे व 100,000 पेक्षा जास्त रिटेल आउटलेटसद्वारे ग्राहकांना उत्पादनांची विक्री केली जाते. कॅस्ट्रॉल सब- डिस्ट्रिब्युटर्स हेसुद्धा ग्रामीण बाजारपेठांमधील अतिरिक्त आउटलेटसपर्यंत पोहचतात तर कॅस्ट्रॉल इंडिया 3000 पेक्षा जास्त संस्थात्मक खात्यांना थेट सेवाही पुरवते.

वेबसाईत: www.castrol.co.in
ट्विटर हँडल: @Castrol_India

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.