Lisiting of Vishwaraj Sugar Industries Ltd. At BSE On Successful Completion of its IPO-Tourism Australia invites Indians to ‘Experience the game and beyond’ at the ICC T20 World Cups in 2020-Mercedes-Benz commences its product offensive; Introduces for the first time in India the iconic 'G-Class' in its new guise- The 'G 350 d'-Xiaomi India to plant over 1.8 lakh trees in partnership with Sadhguru’s initiative Cauvery Calling-MEDSCAPEINDIA 8TH AWARDS NIGHT MUMBAI-NORTH BOMBAY SARBOJANIN DURGA PUJA SAMITIS MAHA ASHTAMI PUJA-DADASAHEB PHALKE AND PADMA VIBHUSHAN AWARDEE BOLLYWOOD STAR ICON ASHA BHOSLE AWARDED HONORARY DOCTORATE AS UNIVERSITY OF SALFORD STRENGTHENS INVESTMENT IN INDIA-Japan’s Nippon Life Insurance, announces the integration of Nippon India Mutual Fund (erstwhile Reliance Mutual Fund)-BALKRISHNA INDUSTRIES LIMITED (BKT) SCORES GLOBAL AGREEMENT WITH SPANISH FOOTBALL LEAGUE LALIGA-India’s premier Islamic travel show for Hajj, Umrah, Ziyarat and Halal travel operators and travel agents across India "Islamic Travel Mart" returns for its second edition at WTC, Mumbai-Child’s organs save life of 60 year old man at Aster CMI Hospital-Bunts Sangha’s S M Shetty International School and Junior College students visit Aarey Tribal Community-SPEAK AND GROW TO PRESENT IN FRONT OF 300 INTERNATIONAL SCHOOLS AT THE INTERNATIONAL SCHOOL AWARDS DUBAI-Ayushmann Khurrana is ‘Breaking Bald’ in Bala’s Don’t Be Shy and is loving it-Global Leader UFI Filters Group Opens its 18th Industrial Site Worldwide: SOFIMA FILTERS INDIA PVT. LTD.-Diwali For All” a Jaiswal Youth Federation (JYF) an initiative, aims to light up the festive season for the underprivileged ones-Actress Shanthipriya embraces the Indian festivity in her traditional best-Launch of luxurious brand - Resha Interior and Decor by Brand Ambassador Gurmeet Kaur Sidhu-Cinema proves effective weapon against world hunger-DISCOVERY SPORT AND RANGE ROVER EVOQUE GEAR UP TO AMAZE MUMBAI

भारतातील ४७% एलईडी ब्रॅण्ड्स आणि ५२% एलईडी डाऊनलाइटर ब्रॅण्ड्सकडून ग्राहक सुरक्षा मापदंडांचे उल्‍लंघन: नेल्‍सन पहाणीचा निष्कर्ष

Screenshot_20190719_183638

एलईडी डाउनलायटर्ससंबंधी कायद्याने निश्चित केलेली मापके न पाळण्यामध्ये मुंबई आघाडीवर

मुंबई, २०१९: नेल्‍सन पहाणीअंतर्गत भारतातील नवी दिल्लीमुंबईकोलकाताचेन्नईदुर्गापूरबरेली,अहमदाबाद आणि हैदराबाद अशा आठ प्रमुख शहरांमध्ये घेण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार इलेक्ट्रिकल वस्तूंच्या ४०० दुकानांमध्ये विक्रीस ठेवलेले ४७%एलईडी बल्ब ब्रॅण्ड्स तसेच ५२% एलईडी डाऊनलाइटर ब्रॅण्ड्स ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस् (BIS) आणि भारत सरकारच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खात्याने विजेच्या दिव्यांसाठी निर्धारित केलेल्या ग्राहक सुरक्षा मापदंडांचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. ही नकली उत्पादने बेकायदेशीररित्या तयार केली व विकली जात असल्यामुळे भारत सरकारच्या महसूलाचे लक्षणीय नुकसान होत असून अशी उत्पादने ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही धोकादायक आहेत.

एलईडी बल्ब्सच्या गटामध्ये हैदराबाद येथे बीआयएसमापदंडांचे उल्लंघन होण्याचे प्रमाण सर्वाधिक ५७% असल्याचे आढळले तर कायद्याने निर्धारित केलेली मापके न पाळण्याचे प्रमाण अहमदाबादमध्ये सर्वात जास्त म्हणजे ६०% इतके आढळले. एलईडी डाउनलाइटर गटामध्ये बरेलीमध्ये बीआयएसचा शिक्का नसलेल्या उत्पादनांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे ७८%इतके आढळले तर सर्वेक्षणासाठी गोळा केलेल्या नमूना उत्पादनापैकी मुंबईतील सर्वाधिक म्हणजे ७८% उत्पादने ही कायदेशीर मापके न वापरताच तयार करण्यात आल्याचे दिसून आले.

मुंबईमध्ये एलईडी बल्बमधील बीआयएसचा शिक्का आणि एलईडी डाउनलाइटर्ससाठीची कायदेशीर मापके कायदेशीर मापदंडांचे पालन करण्याच्या बाबतीत होणा-या उल्लंघनाचे प्रमाण राष्ट्रीय सरासरीच्या कित्येक पट जास्त आहे. एलईडी डाउनलाइटर गटातील उत्पादनांसाठीही बीआयएस प्रमाणित उत्पादने विक्रीस ठेवण्याच्या आघाडीवरही या शहराची कामगिरी निराशाजनक आहे.

पुढील तक्त्यामध्ये नियमांच्या उल्लंघनाचे शहरनिहाय तपशील दिले असून दोन्ही उत्पादन गटांतील नियमांचे पालन न करणा-या ब्रॅण्ड्सची राष्ट्रीय संदर्भातील आकडेवारी मांडण्यात आली आहे.

नियमांचे पालन न करणा-या ब्रँड्सची टक्केवारी
निकष एलईडी बल्ब
राष्ट्रीय सरासरी दिल्ली हैदराबाद अहमदाबाद मुंबई कोलकाता चेन्नई दुर्गापूर बरेली
बीआयएसचा शिक्का 47% 52% 57% 53% 53% 41% 43% 28% 44%
कायदेशीर मापके 44% 36% 48% 60% 36% 49% 34% 34% 50%
पालन न करणा-यांची टक्‍केवारी %
निकष एलईडी डाउनलाइटर्स
  राष्ट्रीय सरासरी दिल्ली हैदराबाद अहमदाबाद मुंबई कोलकाता चेन्नई दुर्गापूर बरेली
बीआयएसचा शिक्का 52% 58% 55% 46% 48% 44% 23% 58% 78%
कायदेशीर मापके 61% 58% 57% 75% 78% 61% 40% 63% 53%

इल्‍कोमा (इलेक्ट्रिक लॅम्प अँड कम्पोनन्ट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन)च्या मते, भारतातील एलईडी बाजारपेठेचे एकूण मूल्य ११,४०० कोटी रुपये इतके आहे. एकूण एलईडी बाजारपेठेमध्ये ७८% वाटा हा एलईडी बल्ब्ज आणि डाउनलाइटर्सचा आहे, कारण ही उत्पादने घरोघरी,कचे-यांमध्ये आणि कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरली जातात.

इल्‍कोमाचे अध्यक्ष आणि सुर्या रोशनी लि.चे मॅनेजिंग डायरेक्टर राजू बिस्ता म्हणाले, नियमांचे पालन न करणारे हे उत्पादक कायद्याने अनिवार्य असलेल्या सुरक्षा प्रक्रिया वापरत नाहीत, त्यामुळे त्यांनी बनविलेली उत्पादने ही केवळ असुरक्षितच नव्हे तर ऊर्जाबचतीच्या बाबतीतही कमी परिणामकारक असतात. याचा ऊर्जाबचत करणा-या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांवर नकारात्मक परिणाम होईल तसेच एलईडी उद्योगाची प्रतिमाही डागाळली जाईल.

या विषयावर बोलताना इल्‍कोमाचे व्हाइस प्रेसिडंट आणि सिग्निफाय इनोव्हेशन्स इंडिया लि. (पूर्वीची फिलिप्‍स लायटिंग इंडिया)चे सीईओ सुमित पद्माकर जोशी म्हणाले, गेल्या ५-६ वर्षांमध्ये एलईडी उद्योगक्षेत्रामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे व त्यामुळे या बाजारपेठेतबीआयएसने घालून दिलेल्या सुरक्षा मापदंडाचे पालन न करणारी अनेक उत्पादने दाखल झाली आहेत. देशभरात विकली जाणारी जवळ-जवळ निम्मी उत्पादने अजूनही भारत सरकारने निर्धारित केलेल्या ग्राहक सुरक्षा मापदंडांचे उल्लंघन करत असल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले आहे. अशा उत्पादकांवर कठोर कारवाई केली जावी व सर्वसामान्य ग्राहकांच्या हितासाठी सुरक्षा मापदंडांचे अधिक चांगल्या प्रकारे पालन होईल याची काळजी घेतली जावी अशी आमची सरकारला विनंती आहे.

इल्‍कोमाचे सल्लागार सुनील सिक्का म्हणाले,बाजारपेठेत नकली विजेच्या दिव्यांचे वाढते प्रमाण ही लायटिंग उद्योगक्षेत्रासाठी मोठ्या चिंतेची बाब आहे,कारण अशी उत्पादने ग्राहकांच्या सुरक्षेशी खेळ करतातचपण करचुकवेगिरी करून सरकारी तिजोरीचेही मोठे नुकसान करतात.

भारतीय लाइटिंग इंडस्ट्री एकमताने अशी विनंती करत आहे कीब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्डस् आणि भारत सरकारचे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान खाते यांच्याकडून निर्धारित करण्यात आलेल्या आणि कायदेशीररित्या अनिवार्य असलेल्या सुरक्षा मापदंडांबद्दलच्या नियमांची अधिक कठोरपणे कारवाई केली जावी. नकली आणि नॉन-ब्रॅण्डेड एलईडी उत्पादनांचा बाजारपेठेतील नियमांचे पालन करणा-या,संघटित कंपन्यांना गंभीर धोका आहे तसाच तो मेक इन इंडियासारख्या सरकारच्या प्रमुख कार्यक्रमांनाही आहे. याशिवाय, अशा उत्पादनांमुळे सरकारला करापोटी मिळणा-या महसुलावरही परिणाम होतो. हाच कर एरवी कायदेशीर उत्पादकांच्या गटाकडून नियमितपणे सरकारदरबारी होऊ शकतो. असा उत्पादनांमुळे गुंतवणुकीच्या उद्देशाचीही पिछेहाट होते तसेच ही उत्पादने व्यापाराच्या सुलभतेवर भर देणा-या विद्यमान भारत सरकारच्या तत्वाच्याही आड येतात.

*नेल्सन पाहणीमध्ये नवी दिल्ली, मुंबई, कोलकाता,चेन्नई, दुर्गापूर, बरेली, अहमदाबाद आणि हैदराबाद अशा भारतातील ८ प्रमुख शहरांतील इलेक्ट्रिक साहित्य विकणा-या ४०० किरकोळ दुकानांचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण २०१८ साली घेण्यात आले.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.