Xiaomi India to plant over 1.8 lakh trees in partnership with Sadhguru’s initiative Cauvery Calling-IRCTC stock doubles on listing day-Governor Koshyari asks people to use Khadi to empower rural artisans, Khadi Fashion Show at World Trade Centre-Google Arts and Culture unveiled its latest exhibit, "Crafted in India" in New Delhi amidst members of 21 partner institutions-MEDSCAPEINDIA 8TH AWARDS NIGHT MUMBAI-ON WORLD MENTAL HEALTH DAY, MUSIC FOR MENTAL HEALTH-NORTH BOMBAY SARBOJANIN DURGA PUJA SAMITIS MAHA ASHTAMI PUJA-DADASAHEB PHALKE AND PADMA VIBHUSHAN AWARDEE BOLLYWOOD STAR ICON ASHA BHOSLE AWARDED HONORARY DOCTORATE AS UNIVERSITY OF SALFORD STRENGTHENS INVESTMENT IN INDIA-Japan’s Nippon Life Insurance, announces the integration of Nippon India Mutual Fund (erstwhile Reliance Mutual Fund)-BALKRISHNA INDUSTRIES LIMITED (BKT) SCORES GLOBAL AGREEMENT WITH SPANISH FOOTBALL LEAGUE LALIGA-India’s premier Islamic travel show for Hajj, Umrah, Ziyarat and Halal travel operators and travel agents across India "Islamic Travel Mart" returns for its second edition at WTC, Mumbai-Gensol Engineering Ltd. reaches 8% above IPO price on listing day-K7 Computing Becomes Certified ISO 9001:2015 & 27001:2013-3rd Bharat Diamond Week all set for flying start - Laxmi Diamond presents Mercedes Benz studded with 3.5 lakh CZ diamonds to sparkle the festive season-Twitter India Presents 'Know Your Leaders Better for #MaharashtraAssemblyPolls with Twitter'-Mumbaikars Get Ready To Binge On Fast-Fit Food From Pita Pit-Madhuri Dixit, Ajay Devgn Shared The Trailer Of ‘Hirkani’-HIRANANDANI FOUNDATION SCHOOL, POWAI LIFTS THE TROPHY AT THE FRANK ANTHONY MEMORIAL ALL-INDIA INTER SCHOOL DEBATE, 2019-5th Veda Session with Madhur Bhandarkar at Whistling Woods International-Vu Televisions emerge as market leaders in large size and 4K category in India

रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सच्या ‘रोगन जोश’ला ६४व्या फिल्मफेअर अॅवॉर्ड २०१९मध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार

नसरुद्दिन शहा यांची भूमिका असलेली संजीव विग यांची सुयोग्य आणि दमदार कथा

नवी दिल्ली, २६ मार्च २०१९: रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सच्या ‘रोगन जोश’ या लघुपटाला ६४व्या फिल्मफेअर अॅवॉर्डमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा (फिक्शन)पुरस्कार देण्यात आला. नसरुद्दिन शहा यांची प्रमुख भूमिका असलेल्या या लघुपटात २६/११च्या काळरात्रीचा एक विदारक अनुभव दाखवण्यात आला आहे. नायक वाढदिवसानिमित्त मित्र आणि कुटुंबियांसमवेत डिनरला जातो आणि काय घडते, याची ही कथा आहे. २६/११च्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांना हा लघुपट समर्पित करण्यात आला आहे.

लघुपटांचे क्षेत्र प्रचंड वेगाने वाढत आहे आणि त्यांनी मोठा परिणामही साधला आहे. मागील दोन पर्वांनंतर आता तिसऱ्यांदा करण जोहर, कबीर खान, विद्या बालन,रवी उदयवार, उर्मिला मातोंडकर, निखिल अडवानी आणि निरंजन अय्यंगार यांच्यासारख्या सिनेसृष्टीतील ख्यातनाम लोकांनी पाच विभागांमधील विजेत्यांची निवड केली.

या अतुलनीय विजयाबद्दल संजीव विग म्हणाले, “तुमच्या सिनेमाचे इतके कौतुक होणे ही फारच छान भावना असते. आमच्या विचारांना दाद दिल्याबद्दल मी फिल्मफेअरच्या परीक्षकांचेही आभार मानतो.फिल्मफेअर पुरस्कार जिंकणे हा सन्मान आहे,अभिमानाची बाब आहे आणि त्यातही तुमच्या पहिल्‍या सिनेमासाठी तो मिळणे म्हणजे तर फारच छान! मी एंडेमोल शाइन इंडिया, रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्मचे आभार मानतो. तसेच नसीर सर आणि इतर सर्व कास्ट व क्रूचे खास आभार. त्यांचा पाठिंबा आणि प्रोत्साहन याशिवाय रोगन जोश शक्यच होऊ शकला नसता.”

प्रतिभावान आणि ज्येष्ठ अभिनेते श्री. नसरुद्दिन शहा आपल्या तरुण दिग्दर्शकाचे कौतुक करताना म्हणाले, “तरुणांमधील प्रतिभेचे कौतुक होताना पाहणे नेहमीच आनंददायी असते. आधीच्या (माझ्या) पिढीच्या तुलनेत आपल्या कलेत फारच उत्तम काम करणाऱ्या आणि ज्या प्रकारचे सिनेमे तयार झाले पाहिजेत असे त्यांना वाटते तसेच सिनेमे बनवणाऱ्या आजच्या पिढीचा एक प्रतिनिधी म्हणजे संजीव. एंडेमोल शाइन इंडिया अशा नव्या प्रतिभांना आणि नव्या स्वरुपाच्या सिनेमांना पाठिंबा देते ही आनंदाची बाब आहे. या तरुण मुलांना मी त्यांच्या कामात सहभागी व्हावे, असे वाटते हे जाणून धन्य झाल्यासारखंच वाटतं. त्यांचं काम अत्यंत ताज्या दमाचं आणि अस्सल आहे. त्यात भविष्याची आशा आहे. या शॉर्ट फिल्म्सचा भाग असणं हा माझं भाग्‍य आहे.”

रोगन जोश ही मुंबईतील ताज हॉटेलातील एका प्रसिद्ध शेफची गोष्ट आहे. आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी त्याने आपले कुटुंबिय आणि मित्रमंडळींना आमंत्रित केलं आहे. पण, डिनर टेबलवरचा हा आनंद २६/११च्या दहशतवादी हल्ल्याने मावळतो. पण, कथा जसजशी पुढे सरकते, तसे ही रात्र अजून किती वाईट होऊ शकली असती यावर ते विनोद करू लागतात,आयुष्य बदलवून टाकणाऱ्या या हल्‍ल्‍यानंतर आपल्या असण्याचं काय महत्त्व आहे, त्याचा दर्जा काय आहे,याबद्दल त्यांना प्रश्न पडू लागतात.

रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्स ही लघुपटांच्या क्षेत्रात अग्रणी आहे. ख्यातनाम आणि नव्या दिग्दर्शकांसोबत, कथाकारांसोबत हे व्यासपीठ अस्सल आणि दमदार लघुपट कंटेंटमधील एक विश्वासार्ह नाव बनले आहे. अनेक दमदार लघुपटांमुळे त्यांनी गेल्या काही वर्षांत सिनेप्रेमींचा सिनेमा पाहण्याचा अनुभवच यशस्वीरित्या बदलला आहे. त्यांनी प्रचंड लोकप्रियता मिळवली आहेच शिवाय, भारतातील लघुपटांसाठी हे एक विश्वासार्ह व ख्यातनाम व्यासपीठ बनले आहे.

फिल्मफेअरमध्ये तीन वर्षांपूर्वी हा विभाग नव्याने सादर करण्यात आला आणि सलग तिसऱ्या वर्षी रॉयल स्टॅग बॅरल सिलेक्ट लार्ज शॉर्ट फिल्म्सने सर्वोत्कृष्ट सिनेमाचा पुरस्कर मिळवला आहे. ज्योती कपूर दास यांच्या ‘चटनी’आणि नीरज घायवान यांच्या ‘ज्युस’ला आधी हा पुरस्कार लाभला आहे.

सिनेमा पाहण्यासाठी लिंक: https://www.youtube.com/watch?v=r06uBlw0zj4

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.