सीमेवर लढणाऱ्या भारतीय तटरक्षक सैनिकांसोबत ‘संवर्धन प्रतिष्ठान’चा वर्धापन दिन साजरा!

x016

x09संवर्धन प्रतिष्ठान’ संस्थेचं कार्य प्रेरणादायीहा गृहिणींच्या मातृत्वाचा विजय!

माता आणि त्यांच्या मातृत्वाला सलाम! समाजपरिवर्तनाची शक्ती गृहिणींमध्ये सर्वाधिक!

– महानिरीक्षक विजय चाफेकर

(राष्ट्रपती तट-रक्षक पदक,  तट-रक्षक पदक, commander तट रक्षक पश्चिम क्षेत्र)

समाज परिवर्तनच शिवधनुष्य उचललेल्या स्त्रियांनी आणि त्यातही मातांनी एकत्र येऊन ‘संवर्धन प्रतिष्टान’ची स्थापना करीत गेली दहा वर्ष त्या कार्यात झोकून देत संस्थापक अध्यक्षा गौरी जोशी,सहसंस्थापक रेखा जोशी आणि त्यांच्या सारख्याच समविचारी माता – महिला परिवराने कौतुकास्पद आणि विशेष प्रेरणादायी कार्य केले आहे. त्यांनी हाती घेतलेले तळागाळातील गरीब – वंचित लहानमुलांच्या विकासकार्याचा ध्वज अधिकाधिक गरजूंच्या हातीपोहचविण्यासाठी समाजातील अन्य महिला तसेच दांनशूरांनी सहकार्य करून या कार्यात खारीचा वाटा उचलायला हवा, ‘संवर्धन प्रतिष्टानचं हे कार्य एक आदर्श मॉडेल म्हणून ओळखले जाऊन इतर नव-समजाधुरींनाही समाजकार्याची आवड प्राप्त व्हावी असा आशावाद भारतीय तटरक्षक दलाचे महानिरीक्षक विजय चाफेकर(राष्ट्रपती तट-रक्षक पदक,  तट-रक्षक पदक, commander तट रक्षक पश्चिम क्षेत्र) यांनी ‘संवर्धन प्रतिष्टान’च्या ११ व्या वर्धापनदिनी आयोजित विशेष कार्यक्रमात व्यक्त केला.

तळागाळातील लहानमुलांच्या विकासाचं कार्य हाती घेत १०वर्षांपूर्वी ‘संवर्धन प्रतिष्टान’च्या संस्थापक गौरी जोशी आणि सहसंस्थापक रेखा जोशी या दोघींनी त्यांच्या वयाच्या काही समविचारी महिलांनी एकत्र येऊन या संस्थेच बिजं रोवलं आणि पाहतापाहता हे रोप रुजून महाराष्ट्रातील हजारो गरीब आणि वंचित घटकांतील विद्यार्थ्यांच्या पंखांना आर्थिक बळ देत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याचे कार्य करू लागलं. संस्थेच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून निधी संकलनासाठी नुकताच रविंद्र नाट्यमंदिरात नृत्यावर आधारित ‘नाचे मन मोरा’ या कार्यक्रमाचे आयोजन खास देशाच्या सीमेवर लढणाऱ्या शूर जवानांसाठी विशेषत: तट रक्षक दलातील जवानांसाठी आयोजित केला होता त्याप्रसंगी सन्माननीय प्रमुख पाहुणे भारतीय तट रक्षक दलाचे महानिरीक्षक विजय चाफेकर राष्ट्रपती तट-रक्षक पदक, तट-रक्षक पदक, commander तट रक्षक क्षेत्र पश्चिम तसेच भूदल, नौदल आणि वायू दलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जवानांकरिता अश्या प्रकारचा कार्यक्रम करण्याच्या संकल्पनेचेही कौतुकचाफेकरांनी केले.

व्यक्तीचा जन्म कोणत्या घरात होणार हे नियती ठरवते. पण जन्माला आलेलं प्रत्येक मूल काहीतरी स्वप्न बघतच असते. ही स्वप्ने पूर्ण होणे सर्वांसाठी शक्य नसते. कारण आयुष्याच्या शाळेत त्यांच्या पाठीवर दप्तराचं ओझं नसून ओझं असत ते त्यांच्या परिस्थितीचं. हे बोचरं सत्य पाहून अस्वस्थ झालेल्या मातांनी आपली स्वतःची मुलेथोडी मोठी होऊन मार्गी लागल्यावर व घरातल्या जबाबदाऱ्यांतूनअंशतः मोकळीक मिळाल्यावर गृहिणी असणाऱ्या मैत्रिणींनी एकत्रयेऊन “संवर्धन प्रतिष्ठान” ही संस्था अत्यंत हालाखीचे जीवनजगणाऱ्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी विशेष प्रयत्न त्यांच्या शिकणाऱ्या मुलांचा शैक्षणिक खर्च आणि योग्य मार्गदर्शन या उद्देशाने संवर्धन प्रतिष्ठानची स्थापना प्रतिकूल परिस्थितीतून मार्ग काढीत शिक्षण घेऊ इच्छिणार्‍या मुलांच्या पाठीशी ठामपणे उभे राहत त्यांच्या शाळेची फी भरणे, शाळांसाठीविविध प्रकारच्या प्रोजेक्टसाठी साहित्य पुरविणे, संगणकांचा पुरवठा करणे तसेच हॉबी क्लासेस, खेळ, स्पर्धा परीक्षा, इत्यादी गोष्टींचे मार्गदर्शन करून प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेणार्‍या मुलांचा विकास घडविण्यासाठी ही संस्था गेली १० वर्षं झटत आहे. सस्थेने आतापर्यंत  ग्रामीण भागातील  विद्यार्थ्यांसाठी तसेच मुंबईतील काही गरीब वस्त्यांमधील विद्यार्थ्यांसाठी भरीव योगदान दिले आहे .सुसज्ज प्रयोगशाळा, वाचनालय, संगणक कक्ष, बेंचेस, कॉम्पुटरक्लास, चित्रकला, प्रज्ञा परीक्षांची फी तसेच प्रवास, गणवेश,वह्या,पुस्तकांचे वाटप,  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी मुंबईतसहली व व्यवसाय मार्गदर्शन तसेच व्यक्तिमत्व विकासाची विविधशिबिरे आयोजित करणे इत्यादि गोष्टी संवर्धन प्रतिष्ठान करीत आहे.

संस्थेच्या कार्याविषयी अधिक महितीसाठी सस्थेच्या https://www.saunvardhanpratishthan.com या संकेतस्थळावरून अधिक माहिती मिळवता येईल.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.