टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)ने आपले सुरक्षा मिशन वाढवले

Screenshot_20190130_104141कंपनीतर्फे महाराष्ट्रात (मुंबई) पहिल्या ड्रायव्हिंग स्कूलचे उद्घाटन.
Screenshot_20190130_104301

[सुरक्षाविषयक दृष्टीकोन एकत्रित करून टीकेएमची डीलरबरोबर भागीदारी, मुंबईत लाकोझी टोयोटा येथे टोयोटा ड्रायव्हिंग स्कूल स्थापन]

 • टोयोटाचे भारतातील अकराव्या ड्रायव्हिंग स्कूल, महाराष्ट्र – मुंबईत पहिले आणि लखनऊनंतर पश्चिम प्रदेशातील दुसरे स्कूल सुरू
 • 2020 सालापर्यंत टीकेएमतर्फे भारतभरात 50 टोयोटा ड्रायव्हिंग स्कूल स्थापन करण्याच्या योजना
 • राष्ट्रीय सुरक्षा मिशनला पाठिंबा देणाऱ्या`योग्य आणि सुरक्षित गाडी चालवा’ या रस्ते नियमांना प्रोत्साहन
 • आजपर्यंत टोयोटा ड्रायव्हिंग स्कूलमध्ये तब्बल 5,800 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची नोंदणी आणि 20,000 पेक्षा जास्त चौकशी (देशभऱातून)
 • सुरक्षित गाडी चालवण्यासाठी चालकांमध्ये जागरूकता करण्याचे, त्यांच्यातील सुरक्षेच्या नियमांची जाणीव वाढवण्याचे ध्येय, यासाठीच मोठ्या प्रमाणावर `सुरक्षा’ कँपेनमध्ये बदल घडवून आणत “शून्य अपघातां’’चे ध्येय

मुंबई, 29 जानेवारी 2019 (GPN) –  टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम)तर्फे आज “टोयोटा ड्रायव्हिंग स्कूल’’चे मुंबईत उद्घाटन करण्यात आले आहे, हे कंपनीचे महाराष्ट्र- मुंबईतील पहिले आणि भारतातील अकरावे ड्रायव्हिंग स्कूल आहे – टोयोटा डीलरशीप्स – लाकोझी टोयोटा यांच्याबरोबर व्यवस्थापित करण्यात आलेल्या“सेफेस्ट कार विथ सेफेस्ट ड्रायव्हर’’ या सुरक्षा मिशनचा पाठपुरावा या नव्या उद्घाटनानंतर करण्यात येणार आहे.

टोयोटा ड्रायव्हिंग स्कूलचे उद्घाटन श्री. हेमंत पाटील, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी – अंधेरी, मुंबई यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. अमर पवार, डीलर प्रिन्सिपल – लाकोझी टोयोटा आणि टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या सीनिअर मॅनेजमेंटचे उप-व्यवस्थापकीय संचालक श्री. एन. राजा आदी मान्यवर उपस्थित होते.

आपल्या देशात रस्ते सुरक्षेबाबत अधिक जागरूकता यावी यासाठी टोयोटा किर्लोस्कर मोटरतर्फे भारतात कोची, लखनऊ, हैदराबाद (2 ड्रायव्हिंग स्कूल) आणि चेन्नई (2 ड्रायव्हिंग स्कूल), कोलकाता, फरिदाबाद, विजयवाडा आणि सुरत आदी शहरांमध्ये टोयोटा सुरक्षा मिशनअंतर्गत 10 ड्रायव्हिंग स्कूल स्थापन करण्यात आली आहेत.

कंपनीच्या सुरक्षेविषयक व्हिजनचा भाग म्हणून टोयोटा ड्रायव्हिंग स्कूल हे देशातील असे एक स्कूल आहे, जेथील प्रत्येक विद्यार्थ्याला सुरक्षित आणि जबाबदार चालक म्हणून घडवण्याला प्राधान्य दिले जाते. या स्कूलमधल्या विस्तारीत चालक प्रशिक्षण उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्च क्षमता असलेली, सराव घेणारी आणि ड्रायव्हर सिम्युलेटर मेकॅनिझमसारखी भविष्यकालीन मॉडेल्स राबवली जातील, या मॉडेल्समुळे `इटिऑस अनुभव’ मिळेल. या स्कूलमधला अनुभव वास्तवाशी संबंधित असावा यासाठी टोयोटाने इन्स्ट्रुमेंट पॅनेल (आयपी), स्टिअरिंग आणि इटिऑस कारच्या खऱ्या सीट अशी वैशिष्ट्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.

स्कूलमधील अभ्यासक्रमात पुढील विषय समाविष्ट असतील:

 1. वाहतुकीच्या कोंडीचे व्यवस्थापन, नियम आणि शिस्त
 2. सुरक्षित आणि योग्य गाडी चालवण्याच्या संकल्पना
 3. चालकाचे शिष्टाचार आणि जबाबदाऱ्या
 4. रस्त्यावर प्रत्यक्ष वाहन चालवण्याआधी खऱ्या वाहनावर प्रात्यक्षिक
 5. रस्त्यावर गाडी चालवतानाच्या सर्व घटक समाविष्ट
 6. विविध प्रकारचे रस्ते आणि हवामानावर अवलंबून गाडी चालवण्याचे धडे
 7. तुमच्या गाडीबद्दल जाणून घ्या – मूलभूत देखभाल आणि दुरुस्ती
 8. अडचणीच्या वेळेस काय कराल
 9. पद्धतशीर गुणांकन आणि प्रतिक्रिया

टोयोटा ड्रायव्हिंग स्कूलच्या उद्घाटनाविषयी लाकोझी टोयोटाचे डीलर प्रिन्सिपल श्री. अमर पवार म्हणाले की, “टोयोटा किर्लोस्कर मोटरबरोबर संलग्नित होणं ही अतिशय चांगली गोष्ट आहे, यामुळे आम्ही मुंबईतील रस्ते सुरक्षेत सुधारणा घडवण्यात योगदान देऊ शकणार आहोत, तसेच नागरिकांना एक चांगला चालक बनण्यासाठी प्रोत्साहन देणार आहोत. लोकसंख्यावाढ आणि शहरी भागांमधील वाढती वाहतूक कोंडी यामुळे रस्त्यावरील सुरक्षेत घट होत आहे, याचाच परिणाम म्हणून रस्त्यांवरील अपघातांत वाढ होत आहे. आपल्या शहरांमध्ये संथ गतीने परंतु अपघाताच्या घटनांमध्ये वाढच होत आहे, यामुळेच या ड्रायव्हिंग स्कूलसह नागरिकांना शिक्षण देऊन सुरक्षा मिशन यशस्वी करून शून्य अपघाताचे ध्येय प्राप्त करायचे आहे.

टोयोटाचे जागतिक स्तरावरील ख्यातनाम, प्रोफेशनल प्रशिक्षक आणि विस्तारीत अभ्यासक्रम यासह टोयोटा ड्रायव्हिंग स्कूल आपल्या शहरातील लोकांना सुरक्षित आणि काळजीपूर्वक गाडी चालवण्याचे धडे देणार आहे.’’

यानिमित्ताने, टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपव्यवस्थापकीय संचालक श्री. एन राजाम्हणाले की, “चालकांमध्ये सुरक्षिततेची सवय रुजावी यासाठी आम्ही नियमितपणे प्रयत्नशील आहोत, यामुळेच महाराष्ट्र – मुंबईत आमचे पहिलेवहिले ड्रायव्हिंग स्कूल सुरु करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. सर्वात अलिकडच्या आकडेवारीनुसार, भारतात दर वर्षी वाहतुकीच्या कोंडीमुळे झालेल्या अपघातात तब्बल दीड लाख लोक मृत्यूमुखी पडतात. दिवसभरात 400 अपघात होतात आणि रस्ते अपघातांचे प्राथमिक कारण म्हणजे रस्त्यावरील अत्यंत खराब सुरक्षा सेवा. रस्ते सुरक्षा ही वाहतूक क्षेत्राच्या पलिकडली गोष्ट आहे, त्याचा सामाजिक आरोग्य, समाज आणि अर्थकारण यावर थेट परिणाम घडत असतो. बहुतांश देशांमध्ये रस्त्यावर वाहतूक कोंडीमुळे त्यांच्या एकूण देशांतर्गत उत्पादनांमध्ये 3 टक्क्यांची घट होत आहे.

रस्ते सुरक्षा ही विविध क्षेत्रांमधला स्वाभाविक समस्या आहे, यासबंधित भागधारक एकत्रित आले आणि त्यांनी प्रयत्न केले तर यात खऱ्या अर्थाने प्रगती होऊ शकते. उद्योगक्षेत्रातील सुरक्षेविषयक नेतृत्व म्हणून आम्ही प्रामुख्याने सुरक्षित गाड्यांबरोबरच सुरक्षित चालक असतील याची खात्री देण्याचे प्राथमिक मिशन राबवत आहोत आणि आपल्या सुरक्षा उपक्रमांसह वाहतूक अपघातांमध्ये लक्षणीय घट होत आहे.

टोयोटाने देशभऱात आमच्या `सुरक्षित कार सुरक्षित चालकांसह’ या मिशनअंतर्गत ड्रायव्हिंग स्कूल तयार केली आहेत. टोयोटा ड्रायव्हिंग स्कूल प्रत्येक विद्यार्थ्याला जबाबदार आणि सुरक्षित चालक बनवण्यावर लक्ष केंद्रीत करणारे पहिले ड्रायव्हिंग स्कूल आहे. जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान, प्रोफेशनल प्रशिक्षकांकडून देण्यात येणारे शिक्षण आणि सर्व घटकांचा समावेश असलेला अभ्यासक्रम, उच्च दर्जाचा अभ्यास आणि प्रात्यक्षिकं यासह भविष्यकालीन प्रशिक्षणाची मोड्युल्स राबवण्यात येत आहेत. अधिक विस्तारीत समाजासाठी रस्ते सुरक्षेत बदल व्हायला हवेत आणि हे बदल रस्ते वापरणारा प्रत्येकजण करणार आहे हेच आमचे ध्येय आम्हाला प्राप्त करायचे आहे.

केवळ इतकेच नाही, तर प्रशिक्षण घेता येईल अशा हुबेहुब कारलाही याचे श्रेय जाते, ही भारतातील अशी पूर्ण उच्च क्षमतेची कम्प्यूटर ग्राफिक्ससह सज्ज, उत्तम प्रक्षेपण करणारी कार आहे, तसेच प्रत्यक्ष कार गिअरचा समावेश असलेली केबिन देणारीही भारतातील पहिली कार आहे. याशिवाय नवखे आणि अत्याधुनिक चालक यांच्यासाठी प्रशिक्षणासाठी उपयुक्त ठरेल असा स्थानिक भाषांचा समावेश आणि विस्तारीत सेशन्सही समाविष्ट आहेत. या आपल्या देशात मानवी चुकांमुळे प्रामुख्याने अपघात होत असतात, त्याची संख्याही वाढत आहे, ही संख्या घटवण्याचे आमचे ध्येय आहे.

आमच्या डीलर पार्टनर – लाकोझी टोयोटा यांनी मुंबईत सर्वोत्तम दर्जाचे ड्रायव्हिंग स्कूल स्थापन करण्यासाठी आमच्याबरोबर भागीदारी केली, यासाठी आम्हांला त्यांचे आभार मानायचे आहेत. आमच्या टोयोटा ड्रायव्हिंग स्कूलमुळे ड्रायव्हिंगच्या दर्जाचे आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेचे नवीन मापदंड सेट होणार आहेत.’’असेही ते पुढे म्हणाले.

प्रशिक्षणाच्या उपक्रमातला सिम्युलेटर हा एक महत्त्वाचा भाग आहे, यामुळे तुम्हाला प्रत्यक्ष गाडीवर प्रशिक्षण घेतल्याचा अनुभव मिळतो. स्टिअरिंग, एक्सलेटर, ब्रेक आणि गिअर शिफ्ट यासारख्या कारमध्ये शिकायच्या सर्व गोष्टींचा सराव या सिम्युलेटर कारवर करता येतो, प्रत्यक्ष रस्त्यावरच गाडी चालवल्यासारखा अनुभव नवशिके चालक घेऊ शकतात. हे सिम्युलेटर विविध प्रकारचे रस्ते आणि हवामान तयार करू शकतात, धुकं, मंद प्रकाश, उंच टेकडी आणि उतार प्रदेश असे सगळेच अनुभव येथे मिळतात. टोयोटो ड्रायव्हिंग स्कूलमधून तुम्हाला अतिरिक्त शिक्षणाच्या मोड्यूल्समध्ये लवचीकता प्राप्त होते, यामुळे नवशिके चालक त्यांच्या निवडीप्रमाणे अभ्यासक्रमाची रचना करू शकतात.

टोयोटा ड्रायव्हिंग स्कूलने आतापर्यंत 5,800 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले आहे. 2020 सालापर्यंत कंपनीने भारतभरातून अशाप्रकारची 50 स्कूल तयार करण्याचा आणि याद्वारे वाहतूक सुरक्षा वचनबद्धतेचा आणखी पुरस्कार करायचे ठरवले आहे.

टोयोटा म्हणजेच सुरक्षितता हे समीकरण आहे आणि टोयोटामध्ये सुरक्षिततेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. टीकेएमने आपल्या देशातील रस्ते सुरक्षेच्या प्रश्नांबाबत नेहमीच आस्था दाखवली आहे, त्यासाठी कार्य केले आहे, केवळ तीन संकल्पनांचा स्वीकार करून अधिक सुरक्षित समाज तयार करण्याचे ध्येय कंपनीने बाळगले आहे – यात सुरक्षित कारची निर्मिती, सुरक्षित चालकांना तयार करणे आणि अधिक सुरक्षित पर्यावरण उभारणे या तीन संकल्पनांचा समावेश होतो.

सुरक्षित गाडी चालवणे: टीकेएमने 2007 सालापासून शालेय विद्यार्थ्यांसाठी रस्ते सुरक्षा उपक्रम सुरू केला आहे, यामुळे रस्त्यावरून जाणारे (चालक किंवा पादचारी) जबाबदार असावेत आणि समाजाचे रस्तेविषयक धोरण अधिक विस्तृत करणे असे प्रयत्न करण्यात येत आहेत. बहुतांश रस्ते सुरक्षा उपक्रम टप्प्यांमध्ये राबवण्यात येतात:

 • टोयोटा सेफ्टी एज्युकेशन प्रोग्रॅम (2007 सालापासून टीएसईपी) – शालेय विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना टप्प्यांटप्प्यांमध्ये शिकवणे, सर्वसामान्य लोकांना रस्ते सुरक्षेचे महत्त्व पटवून देणे आणि पर्यायाने शिकवणे आदी ध्येय ठेवण्यात आली आहेत. या उपक्रमाअंतर्गत टोयोटाने भारतातील 7,00,000 पेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षेबाबत शिक्षण दिले आहे.
 • टीम टोयोटा अॅक्टिव्हिटी (टीटीए)द्वारे शालेय विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, पालकांना आणि शालेय बस चालकांना जबाबदार सुरक्षिततेच्या सवयी शिकवणे आणि त्याबाबत संवेदनशील बनवणे, तसेच पुढील पिढीसाठी अधिक सुरक्षित वाहतूक वातावरण निर्मिती केली जाते. शालेय स्तरावर सुरक्षित विभाग आणि शाळेमध्ये सुरक्षित पार्क तयार करणे, शाळेमध्ये संवादात्मक शिक्षण उपक्रम (टीएसईपी) राबवण्याचे, शालेय वाहन चालकांना प्रशिक्षण देणे आणि शाळेत सुरक्षिततेसंबंधी गट तयार करण्याचे ध्येय समोर ठेवण्यात आले आहे. यासाठी शाळांमध्ये सहा सुरक्षिततेची मॉडेल्स आतापर्यंत तयार करण्यात आली आहेत, यामुळे विद्यार्थ्यांना रस्त्यांवरील नियमांचे पालन कसे करायचे याची माहिती प्राप्त होते.
 • टोयोटाचा प्रमुख प्रकल्प रोड सेफ्टी हॅकेथॉन आतापर्यंत दिल्ली-एनसीआरमधील 90 शाळांपर्यंत पोचलेला आहे, याअंतर्गत 600 विद्यार्थ्यांचा सहभाग असलेल्या 300 टीमची नोंदणी झालेली आहे. हॅकेथॉन उपक्रमाअंतर्गत टोयोटाने तरुण मुलांना रस्ते सुरक्षा मिशनअंतर्गत सैम्य कल्पना राबवण्यासाठी निमंत्रित केले आहे आणि त्यांचा समावेश करून घेतलेला आहे, इंडियन रोड सेफ्टी कँपेन (आयआरएससी – आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी स्थापन केलेली एनजीओ) नववी ते बारावीमधल्या विद्यार्थ्यांसह राबवली जात आहे. `इंडिया रोड सेफ्टी मिशन’साठी तरुण मुलांमधील लपलेल्या प्रतिभेला प्रोत्साहन देणे आणि ती सर्वांसमोर आणणे यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. चालकांना वागणुकीबाबत प्रशिक्षण देणे, फसवणूक तपासणीसाठी अंमलबजावणी आणि खराब रस्त्यांवर पायाभूत सुविधांची उभारणी अशा तीन संकल्पनांवर लक्ष केंद्रीत करणे.
 • टीकेएमतर्फे हैदराबाद, बंगळुरू आणि दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्टवरील टॅक्सी ड्रायव्हर्ससाठी 2014 सालापासून चालक प्रशिक्षण उपक्रम आणि आरोग्य तपासणी शिबिरं घेतली जात आहेत, याद्वारे आतापर्यंत सहभागी झालेल्या 5,000 चालकांमध्ये रस्ते सुरक्षेविषयक जागरूकता करण्यात आलेली आहे. टोयोटाच्या उपक्रमातून भक्कम रस्ते सुरक्षेची जबाबदारी चालकांमध्ये तयार व्हावी आणि त्यांनी अधिकाधिक सुरक्षित गाडी चालवावी हेच कंपनीचे ध्येय आहे.

सर्वात सुरक्षित गाड्या : टोयोटा यारीस या अलिकडेच सादर करण्यात आलेल्या गाडीमध्ये पहिल्यांदाच 7 एसआरएस एअरबॅग्जचे (डी+पी एअरबॅग्ज, साइड एअरबॅग्ज, कर्टन शिल्ड एअरबॅग्ज (सीएसए) आणि नी एअरबॅग्ज) विविध प्रकार सादर करण्यात आले आहेत. याबरोबरच सर्वोत्तम सुरक्षेची वैशिष्ट्ये असलेल्या अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (एबीएस)बरोबर इलेक्ट्रॉनिक ब्रेक डिस्ट्रिब्युशन (इबीडी), व्हेईकल स्टॅबिलिटी कंट्रोल, हिल स्टार्ट असिस्ट कंट्रोल आणि आयएसओफिक्स चाइल्ड सिट्स यासारख्या वैशिष्ट्यांचाही समावेश करण्यात आला आहे, याद्वारे आम्ही भारतीय काय इंडस्ट्रीमध्ये नवे सुरक्षिततेचे बेंचमार्क तयार करत आहोत. कधीही मात करता येणार नाहीत अशी सुरक्षिततेची वैशिष्टये घेऊन आलेल्या टोयोटा यारीसला अलिकडेच न्यू कार असेसमेंट प्रोग्रॅम फॉर साउथइस्ट एशियन कंट्रिज (एएसईएएन एनसीएपी) 5 तारांकने प्राप्त झाली आहेत. एटियॉस त्याद्वारे सादर करण्यात आली आहे.

सर्वात सुरक्षित पर्यावरण : कंपनीच्या काही सीएसआर प्रकल्पांमधून कर्मचाऱ्यांना रस्ते सुरक्षेच्या कार्यक्रमांमध्ये (सीएसआरचे प्रमुख कार्यक्रम) सहभागी करून घेण्यात येते. अलिकडच्या रस्ते सुरक्षा उपक्रमाअंतर्गत कर्मचारी मुलभूत रस्ते सुरक्षेच्या गरजा प्रमुख रस्त्यांवर राबवतात, या उपक्रमाअंतर्गत बंगळुरुच्या रस्त्यांवर रस्त्यांशी संबंधित धोके टाळण्यात आले आहेत, यासाठी रस्ते सुरक्षिततेचे साइन बोर्ड, सोलार ब्लिंकर्स, कॅट आईज रिफ्लेक्टर्स, कॉनवॅक्स मिरर्स यासारख्या मूलभूत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.

टोयोटा सुरक्षिततेतील अग्रणी कंपनी राहिली असून, सर्वोत्तम तंत्रज्ञानाद्वारे कंपनीचा सुरक्षिततेकडे प्रवास सुरू राहिला आहे, यासाठी कंपनीची उत्पादने आणि इतर सुरक्षिततेची संस्कृती विविध रस्ते विषयक कँपेनद्वारे राष्ट्रभर पसरवण्यात येत आहेत.

टीकेएमचा आढावा

कंपनीचे नाव टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड
इक्विटी पार्टिसिपेशन टीएमसी: 89 टक्के, किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेड (श्री. विक्रम एस. किर्लोस्कर) : 11 टक्के
कर्मचाऱ्यांची संख्या सर्वसाधारण 6,500
जमिनीचे क्षेत्र सर्वसाधारण 432 एकरांवर (साधारण 1,700,000 एम2)
बिल्डिंग क्षेत्र 74,000 एम2
एकूण इन्स्टॉल्ड उत्पादकांची क्षमता 3,10,000 युनिट्सपर्यंत

टीकेएमच्या पहिल्या प्लांटचा आढावा:

स्थापना ऑक्टोबर 1997 (उत्पादकांना सुरुवात : डिसेंबर 1999)
ठिकाण बिदाडी
उत्पादने इनोव्हा, फॉर्च्युनर भारतात तयार झालेल्या. प्रादो, लँड क्रूझर आणि सीबीयूजसारखी प्रीस इम्पोर्टेड
इन्स्टॉल झालेल्या उत्पादकांच्या क्षमता 1,00,000 युनिट्सपर्यंत

टीकेएमच्या दुसऱ्या प्लांटचा आढावा:

उत्पादनांना सुरुवात डिसेंबर 2010
ठिकाण टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेड, बिदाडी साइटवर
उत्पादने कोरोला अल्टीस, टोयोटा यारीस, इटिऑस, इटिऑसलिवा, इटिऑस क्रॉस, कॅमरी हायब्रिड
इन्स्टॉल झालेल्या उत्पादनांची क्षमता 2,10,000 युनिट्सपर्यंत

 ENDS

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.