इनमोशन व्हेंचर्सची २१ मिलियन डॉलरच्या फेरीत अर्जंट.ली मध्ये गुंतवणूक

Screenshot_20190130_121525

  • जॅग्वार लँड रोव्हरच्या व्हेंचर कॅपिटल विभागाची अर्जंट.ली या मोबिलिटी व रोडसाइड असिस्टन्स देणाऱ्या कंपनीत गुंतवणूक
  • स्वयंचलित, इलेक्ट्रिक आणि कनेक्टेड वाहनांशी संपर्क साधण्याच्या क्षमतेसह रोडसाइड असिस्टन्सचे नवे मॉडेल

Screenshot_20190130_121539

  • इनमोशन व्हेंचर्सची सीरिज बी राऊंडमध्ये अन्य अनेक प्रीमियम जागतिक ऑटोमोटिव्ह ब्रँड्समध्ये सह-गुंतवणूक  URGENT.LY

लंडन (GPN) – जॅग्वार लँडरोव्हरचा व्हेंचर कॅपिटल फंड असलेली इनमोशन व्हेंचर्स ही कंपनी आज अर्जंट.ली या अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारलेल्या यंत्रणेमार्फत कनेक्टेड रोडसाइड असिस्टन्स देणाऱ्या सेवेत गुंतवणूक करत असल्याचे जाहीर करत आहे.

२०१३मध्ये स्थापन झालेली अर्जंट.ली ही कनेक्टिव्हिटीचा फायदा घेऊन पहिल्या नोटिफिकेशनपासून ते वाहनाच्या दुरुस्तीपर्यंत पूर्णपणे एकात्मिक अशी रिकव्हरी सिस्टम उपलब्ध करून देणारी, पूर्ण सेवायुक्त रोडसाइड असिस्टन्स प्रोव्हायडर आहे. अर्जंट.लीच्या ग्राहकांचे आणि त्यांच्या वाहनांचे जिओ-लोकेशन म्हणजे अल्गोरिथमिकली मॅच केलेली, असाइन केलेली आणि ग्राहकांना पाठवण्यात आलेली सुयोग्य उपकरणे घेऊन तुम्हाला सर्वोत्तम मानांकनप्राप्त सेवा पुरवणारी सर्वात जवळची यंत्रणा. ईटीए, प्रोव्हायडर ट्रॅकिंग, कम्युनिकेशन्स आणि रेटिंग्जसह सर्व टप्पे अर्जंटलीच्या अतिशय सुविहित डिजिटल एक्स्परियन्सच्या माध्यमातून बांधलेले असतात.

यूएसए, युरोप नाणि आशियामध्ये फक्त दोन वर्षांच्या कामकाजात अर्जंट.लीने आपल्या प्लॅटफॉर्मवर ४५००० कनेक्टेड रिकव्हरी व्हेईकल्स आणली असून अन्य अनेक मोठ्या ऑटो उत्पादकांबरोबर आणि इन्शुअरर्सबरोबर करार केले आहेत.

इनमोशन व्हेंचर्सने बीएमडब्ल्यू आय व्हेंचर्स आणि पोर्शे व्हेंचर्स यांच्या साथीने गुंतवणूक करून अर्जंट.लीच्या, यूएसएच्या रोडसाइड असिस्टन्स सेवांच्या बाजारपेठेतील आणि अंतिमत: संपूर्ण जगातील अग्रणी सेवा पुरवठादार बनण्याच्या महत्वाकांक्षेला पाठबळ पुरवले आहे.

“जगातल्या काही सर्वोच्च ऑटोमोटिव्ह ब्रँड्ससह आमच्या गुंतवणूकदारांनी आम्हाला जे पाठबळ पुरवले आहे, त्याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. मोबिलिटी आणि रोडसाइड असिस्टन्सच्या संदर्भात ग्राहकांना अपेक्षित असलेला आणि त्यांचा अधिकारच असलेला अनुभव देणारे भविष्य घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे,” असे अर्जंट.लीचे सीईओ आणि सह-संस्थापक ख्रिस स्पॅनॉस म्हणाले. “वेगाने विकसित होत असलेल्या जागतिक ऑटोमोटिव्ह, इन्शुरन्स आणि मोबिलिटी बाजारपेठेत गेल्या ७० वर्षांत या उद्योगाचे मापदंड ठरवणाऱ्या पारंपारिक अॅनालॉग मॉडेल्सच्या तुलनेत सातत्याने ग्राहकांना अधिकाधिक समाधान देण्यात यशस्वी होत असताना आमच्या कनेक्टेड सेवांमध्ये सतत नवनवीन सुधारणा करत राहण्यावर आमचा भर आहे.” 

इनमोशनचे व्यवस्थापकीय संचालक सेबॅस्टियन पेक म्हणाले: “मोबिलिटी आणि प्रवासाच्या क्षेत्रात अत्याधुनिक नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानांचा विकास करणे आणि त्यांना आर्थिक पाठबळ पुरवणे ही प्रस्थापित ऑटोमोटिव्ह उत्पादकांची जबाबदारीच आहे. अर्जंट.लीच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांच्या प्रीमियम वाहनांच्या संदर्भात एन्ड-टू-एन्ड डिजिटल अनुभव मिळेल. ख्रिस आणि अर्जंट.लीच्या टीमला त्यांच्या विस्ताराच्या या उत्कंठावर्धक टप्प्यात साह्य पुरवण्यास इनमोशन अतिशय उत्सुक आहे.”

समाप्त

संपादकीय सूचना:

इनमोशन व्हेंचर्स बद्दल

इनमोशन व्हेंचर्स ही मोबिलिटी, वाहतूक आणि प्रवास या क्षेत्रांमधील वेगाने वाढणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते. जॅग्वार लँड रोव्हरचे पाठबळ असलेली आमची कंपनी तंत्रज्ञान क्षेत्रात नुकतीच सुरुवात केलेल्या अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करते, ज्या शहरांतील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलू पाहतात, अॅक्टिव्ह आउटडोअर जीवनशैलीला पाठबळ पुरवतात आणि प्रवासाचा एकमेवाद्वितीय अनुभव पुरवतात. आम्ही जगभरातल्या सीड ते सीरिज बीपर्यंत सर्व टप्प्यांवरच्या स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक करतो. आमच्या मुख्य गुंतवणूक कामकाजाबरोबरच आम्ही जॅग्वार लँड रोव्हरच्या, नवनवीन उत्पादनांच्या आणि सेवांच्या विकासातून नव्या व विद्यमान ग्राहकांना अविस्मरणीय अनुभव देण्याच्या व्यापक व्यवसायातही सहभागी आहोत. इनमोशन व्हेंचर्स आणि त्यांच्या गुंतवणुकीविषयी inmotionventures.comवरून अधिक जाणून घ्या.

अर्जंट.ली विषयी 

अर्जंट.लीचा जागतिक मोबिलिटी व रोडसाइड असिस्टन्स प्लॅटफॉर्म हा ग्राहक, लॉजिस्टिक्स आणि तंत्रज्ञानाधारित कंपन्यांच्या वेगाने विस्तारणाऱ्या वाहतूक पर्यायांच्या केंद्रस्थानी विराजमान आहे. जगभरात २०३०पर्यंत नवी वाहने, सेवा आणि वापरकर्त्यांच्या माध्यमातून एकंदर प्रवासामध्ये एक तृतीयांश वाढ होईल, असे विश्लेषक सांगतात. याचा अर्थ चालत्या आणि प्रवासात खीळ बसणाऱ्या वाहनांमध्ये वाढ होणार आहे. अर्जंट.ली सर्व संबंधितांना सर्व वेळ दिसत असणाऱ्या एका सुविहित, एन्ड-टु-एन्ड डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मदत पुरवते. म्हणूनच उत्तर अमेरिका, युरोप आणि आशियामध्ये ऑटोमोटिव्ह, इन्शुरन्स, टेलिमॅटिक्स आणि नव्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या क्षेत्रातील लक्षावधी ग्राहकांचा विश्वास प्राप्त केलेल्या आघाडीच्या जागतिक ब्रँड्सचा अर्जंट.ली हा पसंतीचा पर्याय आहे. अधिक माहितीसाठी http://www.geturgently.comला भेट द्या अथवा media@urgent.lyशी संपर्क साधा. ENDS

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.