एचडीएफसी अर्गो सादर करीत आहे” #CAMSURVEY “क्लेम प्रोसेसिंग

Screenshot_20190130_115117‘जल्दी क्लेम’ सेटलमेंटसाठी नवी सेवा

मुंबई, २९ जानेवारी २०१९ (GPN) – एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी ही भारतातल्या खासगी क्षेत्रातली तिसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठी नॉन-लाईफ इन्शुरन्स पुरवठादार कंपनी असून या कंपनीने आज #CAMSURVEY ही मोटर क्लेम सेवा जाहीर केली आहे. कंपनीच्या जल्दी क्लेम सेवेअंतर्गत ही सेवा पुरवण्यात येत आहे. नवीन #CAMSURVEY या सेवेमुळे मोटर क्लेम्सना लागणारा कालावधी कमी होणार असून वाहनांच्या बाह्य बॉडीच्या कामासाठी काही ठराविक नेटवर्क कार्यशाळांमध्ये ही सेवा प्रदान करण्यात येणार आहे.

क्लेम किंवा दावा म्हणजे सत्याचा खरा क्षण असून वेगवान क्लेम सेटलमेंट (दाव्यांची फेड) ग्राहकांसाठी सर्वांत महत्वाची बाब आहे, यावर एचडीएफसी अर्गोचा विश्वास आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन, जल्दी क्लेम सेवेच्या माध्यमातून दाव्यांच्या फेडीची प्रक्रिया क्रांतीकारी पद्धतीने बदलण्याचे ध्येय कंपनीने बाळगले आहे. या सेवेंतर्गत, ग्राहकांच्यादाव्यांची त्वरीत व विनादिक्कत पद्धतीने फेड (सेटलमेंट) करण्यात येणार आहेत.

#CamSurvey सेवेनुसार, एचडीएफसी अर्गोतर्फे त्यांच्या नेटवर्कमधील कार्यशाळांमध्ये कॅमेरे बसवण्यात आले असून यामुळे चारचाकींमधील बिघाड वा गाडीला झालेले नुकसान त्यांना सहजपणे समजू शकेल. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण केंद्रीय पद्धतीने करण्यात येणार असून यातून दिसणारी छायाचित्रे परिक्षणासाठी लाईव्ह-स्ट्रीम करण्यात येणार आहेत. लाईव्ह-स्ट्रीम्सच्या माध्यमातून एचडीएफसी अर्गोच्या टीमतर्फे या छायाचित्रांची पडताळणी करण्यात येईल व त्यानंतर त्वरीत दावा मंजूर करण्यात येईल. यामुळे वाहनाची प्रत्यक्ष पडताळणी करण्याकरिता सर्वेक्षकाची नेमणूक करण्यातला वेळ वाचू शकेल. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे, यामुळे विमाधारकाचा मौल्यवान वेळ वाचेल आणि वाहनाच्या पृष्ठभागावर झालेल्या कोणत्याही छोट्या दुखापतीसाठीच्या दाव्यांची त्वरित फेड करता येईल.

कोणत्याही व्यवसायात ग्राहक सेवेला अनन्यसाधारण महत्व असल्याचा एचडीएफसी अर्गोचा विश्वास आहे. ही बाब ध्यानात घेऊनच, गेली कित्येक वर्षे नव्या तंत्रज्ञानाचा अवलंब करून ग्राहकांसाठी सर्व प्रक्रिया सोप्या करण्यावर कंपनीने भर दिला आहे. 2012 साली इन्शुरन्स पोर्टफोलियो ऑर्गनायझर (आयपीओ) अॅप हे मोबाईल अॅप्लिकेशन सादर करणारी नॉन-लाईफ इन्शुरन्स क्षेत्रातली ही पहिलीच कंपनी होती. नुकतीच या कंपनीने ओव्हरनाईट व्हिइकल रिपेअर सेवा सुरू केली असून सामान्य विमा क्षेत्रात ही सेवा आजवर प्रथमच सादर करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, एचडीएफसी अर्गो ग्राहक आपली वाहनविमा योजना रिन्यू करण्यासाठी सेल्फ – इन्स्पेक्शन अॅपचाही वापर करू शकतात. यासाठी कोणत्याही प्रत्यक्ष कागदपत्रांची वा सर्वेक्षणाची गरज नाही.

नवीन #CamSurvey ही सेवा सध्या मुंबई व पुणे शहरात सुरू करण्यात आली असून लवकरच एचडीएफसी अर्गोच्या भारतभरातील सर्व नेटवर्क मोटर कार्यशाळांमध्ये ही सेवा सुरू करण्यात येणार आहे.

एचडीएफसी अर्गोबद्दल..

एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी ही हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी(एचडीएफसी) आणि जर्मनीतील म्युनिच रे समुहाची अर्गो इंटरनॅशनल एजी या दोन कंपन्यांतल्या ५१:४९ या भागीदारीतून ऑगस्ट २०१७ मध्ये जन्माला आलेली एकत्रित जनरल इन्शुरन्स कंपनी आहेएचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड आणि एचडीएफसी जनरल इन्शुरन्स लिमिटेड (पूर्वीचे नाव एल अॅण्ड टी जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड) यांच्यातील या संयुक्त व्हेंचरला आयआरडीएआयची मान्यता मिळाली आहेजनरल इन्शुरन्स क्षेत्रातील ही पहिली संयुक्त कंपनी आहेभारतातल्या खासगी क्षेत्रात कार्यरत असलेली एचडीएफसी अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड ही तिसऱ्या क्रमांकाची नॉनलाईफ इन्शुरन्स कंपनी आहे.

या कंपनीतर्फे व्यापक रेंजची जनरल इन्शुरन्स उत्पादने पुरवण्यात येत असून यात वाहन विमा,आरोग्य विमाप्रवास विमागृहविमा आणि व्यक्तीगत अपघात विमा यांचा रिटेल विभागात समावेश होतोतरमालमत्ता विमामरीन विमा आणि लाएबिलिटी विमा यांचा कॉर्पोरेट विभागात समावेश होतोएचडीएफसी अर्गोच्या १२२ शाखा १०६ शहरांमध्ये कार्यरत असून कंपनीच्या स्वतःच्या थेट विक्री नेटवर्कव्यतिरिक्त कंपनीचे वितरण जाळे खूप मोठे आहे. ENDS

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.