अॅमेझॉन इंडियाच्या पहिल्या कम्युनिटी सेंटरने साजरा केला आयुष्यांमध्ये बदल घडवून आणण्याचा चौथा वर्धापनदिन

Screenshot_20190109_161828Mumbai (GPN) : या केंद्राने भिवंडीतील स्थानिक समुदायातील १२०,००० विद्यार्थी, स्त्रिया व तरुणांसाठी संधी निर्माण केल्या आणि त्यांच्या आयुष्यात सुधारणा घडवून आणली

अॅमेझॉन केअर्स या अॅमेझॉन इंडियाच्या सीएसआर उपक्रमाने आपले पहिले कम्युनिटी सेंटर १४ नोव्हेंबर,२०१४ रोजी स्थापन केले होते. आपण ज्या परिसंस्थेत काम करतो तेथे सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांशी सुसंगती राखत महाराष्ट्राच्‍या भिवंडीतील २० खेड्यांना मदत करण्यासाठी हे केंद्र स्थापन करण्यात आले होते. आयडब्ल्यूसीएफ (इंडियन विमेन अॅण्ड चिल्ड्रन फाउंडेशन) या संस्थेच्या सहयोगाने स्थापन केलेल्या या केंद्राला आता चार वर्षे पूर्ण झाली आहेत. या चार वर्षांत शिक्षण, आरोग्य व वैयक्तिक स्वच्छता,पर्यावरण, उपजीविकेची साधने आणि कौशल्य विकास तसेच स्त्री सबलीकरण यांसाठी केंद्राने काम केले आहे.सध्या या भागात तीन कम्युनिटी सेंटर्स आहेत. शाश्वत विकासाचे ध्येय ठेवून देशभरात अशी १४ कम्युनिटी सेंटर्स काम करत आहेत.

“आमचे तत्त्व डोळ्यापुढे ठेवून गेल्या चार वर्षांत आम्ही भिवंडी भागातील १२०,०००हून अधिक व्यक्तींना त्यांच्या क्षमतांचा उपयोग करता यावा म्हणून संधी निर्माण करून दिल्या आहेत आणि पर्यायाने स्थानिक समुदायांतील लोकांच्या आयुष्यात परिवर्तन घडवून आणण्यात मदत केली आहे. आमची नवकल्पना व तंत्रज्ञानाची संसाधने वापरून विविध समुदायांना यशस्वी होण्याची क्षमता देण्यासाठी आम्ही बांधील आहोत.आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांच्या माध्यमातून भारताच्या विकासास आम्ही हातभार लावू शकू असे आम्हाला वाटते,” असे अॅमेझॉन इंडियाच्या कस्टमर फुलफिलमेंट विभागाच्या संचालक करुणा पांडेम्हणाल्या.

सरवली गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना प्रकाश भोईर यासंदर्भात म्हणाल्या, या सेंटरने आमच्या गावातील स्त्रियातरुण व लहान मुलांना विविध कौशल्ये शिकण्यासाठीसंगणक साक्षर होण्यासाठीपुस्तके वाचण्यासाठी तसेच शैक्षणिक साधनांच्या सहाय्याने शिकण्यासाठी एक जागा उपलब्ध करून दिली आहेगेल्या चार वर्षांत आरोग्य व वैयक्तिक स्वच्छतेच्या पद्धती स्वीकारल्यामुळे आमच्या आयुष्याच्या दर्जात लक्षणीय बदल झाला आहेअॅमेझॉन इंडियाकडे असलेला अनुभव आणि त्यांनी आमच्या स्थानिक समुदायावर दिलेला भर यांमुळे आमच्यासाठी एक अधिक चांगले भवितव्य निर्माण करण्यासाठी शाश्वत प्रयत्न होत आहेतअसा विश्वास वाटतो.”

शिक्षण:

राष्ट्रीय डिजिटल साक्षरता मिशनशी (एनडीएलएम)जोडून राबवल्या जाणा-या शैक्षणिक मदत उपक्रमांमुळे डिजिटल साक्षरतेच्या माध्यमातून स्थानिकांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध झाले आहे. याचा लाभ आत्तापर्यंत सुमारे ६५,००० सदस्यांना नक्कीच मिळाला आहे. या केंद्रांनी स्त्रिया व तरुणांसाठी कम्प्युटरविषयक कौशल्यांवर काही पायाभूत प्रशिक्षण सत्रे, वाचन व लेखन कार्यशाळा तसेच करिअरविषयक समुपदेशन सत्रे घेतली आहेत. नोकरीच्या अधिक चांगल्या संधी मिळण्यासाठी हे उपयुक्त ठरत आहे.

२-६ वर्षे या वयोगटातील मुलांसाठी केंद्रांनी अर्ली चाइल्डहूड डेव्हलपमेंट सेंटर स्थापन केले आहे. यामध्ये विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना खेळता-खेळता शिक्षण दिले जाते. प्रत्येक केंद्रामध्ये वाचनालय असून,प्रत्येक वाचनालयात काळजीपूर्व निवडलेली १००० पुस्तके आहेत. आत्तापर्यंत ११,५०० विद्यार्थ्यांनी या वाचनालयांचा लाभ घेतला आहे. कम्युनिटी सेंटरचे पाठबळ असलेल्या शाळांपैकी एका शाळेत अॅमेझॉन केअर्सने एक छोटे तारांगण (प्लॅनेटोरिअम) स्थापन केले आहे. यामुळे १५० शाळांतील विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी दिसणारे आकाश व अवकाशातील घटकांचे निरीक्षण करण्याची व त्यांच्याबद्दल शिकण्याची संधी मिळाली आहे. अॅमेझॉनने एक कल्पक विज्ञान प्रयोगशाळा स्थापन केली आहे. यामध्ये हवेचा दाब, पाण्याचा दाब,चुंबकीय शक्ती, गुरुत्वाकर्षण यांसारख्या बाबींमागील विज्ञान सोप्या प्रयोगांच्या माध्यमातून शिकवले जाते.कचरा तसेच आसपासच्या पुनर्वापर झालेल्या वस्तूंमधून(रिसायकल्ड) चालवली जाणारी ही प्रयोगशाळा १७००हून अधिक विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत आहे.

उपजीविकेचे साधनउपजीविकाविषयक उपक्रमांचा भर समुहातील सदस्यांमध्ये सरकारी योजनांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर आहे. समाजातील सीमांत तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत गटांसाठी सरकार राबवत असलेल्या योजनांची माहिती समुदायातील सदस्यांना दिली जाते. हा प्रकल्प आत्तापर्यंत समुदायातील ४,००० लाभार्थींपर्यंत पोहोचला आहे.

स्त्री सबलीकरणस्त्री सबलीकरणाला प्रोत्‍साहन देण्यासाठी या केंद्रांनी १०,००० स्थानिक स्त्रियांना आपल्या कुटुंबांना आर्थिक आधार देण्यात मदत केली आहे. या स्त्रियांना शिवणकाम, पाककला तसेच सौंदर्यप्रसाधनातील नवीन कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात आले आहे आणि त्यायोगे त्या उत्पन्न प्राप्त करत आहेत.काही स्त्रियांकडे पूर्वीपासूनच पापड किंवा मसाले तयार करण्याचे कौशल्य होते. त्यांना सुक्ष्म-उद्यमशीलतेचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रात्यक्षिकांच्या आधारे प्रशिक्षण कसे दिले जाते हे दाखवण्यात आले.

आरोग्य  वैयक्तिक स्वच्छताअॅमेझॉन इंडिया स्थानिक वैद्यकीय समुदाय तसेच सरकारी संस्थांच्या सहयोगाने प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेचा प्रसार करत आहे. स्वच्छता तसेच घरगुती कच-याचे व्यवस्थापन,बाळंतपणातील काळजी, मासिक पाळीच्या वेळची स्वच्छता यांबाबत जागरूकता कार्यक्रमांसारखे काही उपक्रम केंद्रांमध्ये घेतले जातात. याशिवाय, सर्व वयोगटांसाठी आरोग्य तपासणी शिबिरे नियमित घेतली जातात. आत्तापर्यंत २०,०००हून अधिक प्रौढ तसेच लहान मुलांना या कार्यक्रमांचा लाभ मिळाला आहे.

अॅमेझॉन इंडिया ज्या परिसरात काम करते तेथील लोकांसाठी उपक्रम राबवून अॅमेझॉन केअर्स‘शेजारधर्मा’चे तत्त्व पाळत आहे. आपले कर्मचारी,ग्राहक, विक्रेते, स्थानिक समुदाय व अन्य संबंधितांमध्येही कंपनी सबलीकरणाचे तत्त्वज्ञान बिंबवते, ज्यायोगे हे सर्वजण संधी निर्माण करण्यात व आयुष्ये घडवण्यात योगदान देऊ शकतील.

अॅमेझॉन‍के असा‍डवर्षयी‍
अॅमेझॉनचा‍या‍तत्त्वावर‍गाढ‍ डवश्वास‍आिे‍की, लोकांच्या‍कल्पकतेला‍वाव‍देणारी‍आडण‍तयांची‍स्वप्ने‍साकार‍
करायला‍ तयांना‍ मदत‍ करून‍ तयांचे‍ सक्षमीकरण‍ करणारी‍ संशोर्नेच‍ क्रांतीकारी‍ संशोर्ने‍ ठरतात.‍ अॅमेझॉन
कं पनीचे‍ग्रािक‍व‍कमाचारी‍राित‍असलेल्या‍िागांमध्ये‍राबवण्यात‍येणार्‍या‍डवडवर्‍समाजोपयोगी‍उपक्रमांतून‍
अॅमेझॉन के असा‍ एक‍ उतकृ ष्ट‍ शेजार‍ ककं वा‍ उत्तम‍ साथीदार‍ आिे, या‍ तत्त्वज्ञानाचे‍ प्रडतबबंब‍ ददसून‍ येते.‍ संर्ी‍
डनमााण‍ करून‍ आयुषये‍ बदलून‍ टाकण्याच्या‍ अॅमेझॉनच्या‍ ध्येयांमध्ये‍ कं पनीच्या‍ कमाचारी, ग्रािक, डवक्रेता,
स्थाडनक‍समुदाय‍आडण‍अन्य‍िागीदारांना‍सििागी‍करून‍घेऊन‍ तयांचेिी‍सक्षमीकरण‍करण्यासाठी‍अॅमेझॉन
या‍तत्त्वज्ञानाचा‍वापर‍करते.‍अॅमेझॉन‍के असातफे ‍सध्या‍वेगवेगळे‍उपक्रम‍राबवले‍जात‍असून‍‘डगफ्ट‍अ‍स्माईल’
िा‍ तयातलाच‍एक‍ उपक्रम‍आिे.‍ यात‍‘दान’ करण्याचे‍ डवडवर्‍मागा‍सुचवून‍ दानासाठी‍ ग्रािकांना‍ उद्युि‍के ले‍
जाते.‍स्थाडनक‍समुदायांना‍ डवडवर्‍सार्न‍व‍सेवांच्या‍वापरासि‍ तयांच्या‍ डवकासाकररता‍संर्ी‍उपलब्लर्‍करून‍
देणारा‍‘अॅमेझॉन इन‍द‍कम्युडनटी’ िािी‍असाच‍एक‍समाजडित‍सार्णारा‍उपक्रम‍आिे.
अॅमेझॉन‍डवर्षयीीः‍
अॅमेझॉन कं पनी‍चार‍ तत्त्वांवर‍चालवली‍जातेीः‍ स्पर्ाकावर‍फोकस‍करण्यापेक्षा‍ ग्रािक‍ पोिोचवर‍लक्ष कें दद्रत,
शोर्क‍ वृत्तीची‍आवि, कायाशील‍ उतकृ ष्टतेप्रती‍करटबद्धता‍आडण‍ दीघा‍ डवचारशिी.‍ ग्रािक‍ पुनरावलोकन, १-
डललक‍ शॉबपंग, वैयडिकृ त‍ डशफारसी, प्राईम, अॅमेझॉनद्वारे‍ पूताता, एिब्लल्यूएस, ककं िल‍ िायरेलट‍ पडब्ललबशंग,
ककं िल, फायर‍टॅब्ललेट्स, फायर‍टीव्िी, अॅमेझॉन एको‍व‍अॅलेलसा‍िी‍अॅमेझॉनद्वारे‍देण्यात‍येणारी‍कािी‍उतपादने‍
व‍सेवा‍आिेत.‍अडर्क‍माडितीसाठी‍िेट‍द्याीः‍amazon.com/about ककं वा फॉलो‍करा: @AmazonNews.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.