Lisiting of Vishwaraj Sugar Industries Ltd. At BSE On Successful Completion of its IPO-Tourism Australia invites Indians to ‘Experience the game and beyond’ at the ICC T20 World Cups in 2020-Mercedes-Benz commences its product offensive; Introduces for the first time in India the iconic 'G-Class' in its new guise- The 'G 350 d'-Xiaomi India to plant over 1.8 lakh trees in partnership with Sadhguru’s initiative Cauvery Calling-MEDSCAPEINDIA 8TH AWARDS NIGHT MUMBAI-NORTH BOMBAY SARBOJANIN DURGA PUJA SAMITIS MAHA ASHTAMI PUJA-DADASAHEB PHALKE AND PADMA VIBHUSHAN AWARDEE BOLLYWOOD STAR ICON ASHA BHOSLE AWARDED HONORARY DOCTORATE AS UNIVERSITY OF SALFORD STRENGTHENS INVESTMENT IN INDIA-Japan’s Nippon Life Insurance, announces the integration of Nippon India Mutual Fund (erstwhile Reliance Mutual Fund)-BALKRISHNA INDUSTRIES LIMITED (BKT) SCORES GLOBAL AGREEMENT WITH SPANISH FOOTBALL LEAGUE LALIGA-India’s premier Islamic travel show for Hajj, Umrah, Ziyarat and Halal travel operators and travel agents across India "Islamic Travel Mart" returns for its second edition at WTC, Mumbai-Child’s organs save life of 60 year old man at Aster CMI Hospital-Bunts Sangha’s S M Shetty International School and Junior College students visit Aarey Tribal Community-SPEAK AND GROW TO PRESENT IN FRONT OF 300 INTERNATIONAL SCHOOLS AT THE INTERNATIONAL SCHOOL AWARDS DUBAI-Ayushmann Khurrana is ‘Breaking Bald’ in Bala’s Don’t Be Shy and is loving it-Global Leader UFI Filters Group Opens its 18th Industrial Site Worldwide: SOFIMA FILTERS INDIA PVT. LTD.-Diwali For All” a Jaiswal Youth Federation (JYF) an initiative, aims to light up the festive season for the underprivileged ones-Actress Shanthipriya embraces the Indian festivity in her traditional best-Launch of luxurious brand - Resha Interior and Decor by Brand Ambassador Gurmeet Kaur Sidhu-Cinema proves effective weapon against world hunger-DISCOVERY SPORT AND RANGE ROVER EVOQUE GEAR UP TO AMAZE MUMBAI

झी मराठीच्या प्राईम टाइममध्ये ‘जाडूबाई.. ‘ची भर !!

Screenshot_20171130_074845

Screenshot_20171130_074509जी. पी. एन (ग्लोबल प्राइम न्यूज) /  मुंबई,२५ नोव्हेंबर २०१७ : 27 नोव्हेंबरपासून सोम-शनि. संध्या. 6 वाजता ‘जाडूबाई जोरात’ प्रसारित करण्यात येईल.

गेली 18 वर्ष सतत नाविन्यपूर्ण मनोरंजनाने जगभरातील मराठी प्रेक्षकांना झी मराठी वाहिनीने भुरळ पाडली आहे. मराठी दूरचित्रवाणी क्षेत्रातील पहिली दैनंदिन मालिका ‘आभाळमाया’ असो वा मराठी नाट्य-चित्रपटसृष्टीतील मानाचा समजला जाणारा ‘झी गौरव पुरस्कार’ असो, किंवा जग पादाक्रांत करणारा ‘चला हवा येऊ द्या’ सारखा धमाल कार्यक्रम असो! झी मराठी वाहिनीने प्रेक्षकांच्या मनोरंजनाची भूक नेहमीच भागवली आहे. धकाधकीच्या जीवनात जेवढी दगदग वाढतेय तेवढीच ही मनोरंजनाची भूक वाढत चालली आहे. रसिकांची हीच गरज लक्षात घेऊन झी मराठीने संध्याकाळी मनोरंजनाची वेळ वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 27 नोव्हेंबरपासून दुपारी 1 वाजता प्रक्षेपित होणारी ‘जाडूबाई जोरात’ ही मालिका संध्याकाळी 6 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे. दररोज संध्याकाळी 6.30 वाजता होम मिनिस्टरपासून सुरु होणाऱ्या या मनोरंजनाच्या यात्रेचा शुभारंभ आता संध्याकाळी 6 वाजल्यापासून ‘जाडूबाई’ अगदी जोरात करतील.
वेगवेगळ्या विषयांचं कल्पक सादरीकरण हे झी मराठी वाहिनीचं वैशिष्ट्य! ‘जाडूबाई जोरात’ ही मालिका याचं उत्तम उदाहरण! निर्मिती सावंत आणि किशोरी शहाणे अशा दोन दिग्गज अभिनेत्रीच्या अभिनयाची जुगलबंदी सध्या चांगलीच रंगात आली आहे. मालिकेने सुरुवातीपासूनच रसिकांच्या मनाची पकड घेतली होती. नव्या वेळेत मालिकेची हीच पकड आता अधिक घट्ट होईल, अशी आशा मालिकेची टीम व्यक्त करत आहे.
जाडबाईने जरी डाएटचा मार्ग स्वीकारला असला तरी प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा हा खुराक कधीही कमी होणार नाही, याची प्राइम टाईम वाढवून झी मराठीने पुरेपूर काळजी घेतली आहे. 27 नोव्हेंबरपासून संध्या. 6 ते रात्री 11 हा संध्याकाळपासून सुरु होणारा प्राइम टाईमचा प्रवास प्रेक्षकांसाठी आनंदाची पर्वणी ठरेल.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.