गोयंकरांनी अनुभवाला ‘दशक्रिया’

Screenshot_20170625_043838

१०व्या गोवा चित्रपट महोत्सवात ‘दशक्रिया’ला हाऊसफुल्ल प्रतिसाद!

नुकत्याच संपन्न झालेल्या ‘१० व्या गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ सौ. कल्पना विलास कोठारी यांच्या ‘रंगनील क्रिएशन्स’ निर्मित व संजय कृष्णाजी पाटील लिखित आणि संदीप भालचंद्र पाटील दिग्दर्शित ‘दशक्रिया’ या चित्रपटाचा खेळ आयोजित करण्यात आला होता. ६४ व्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटांचा या महोत्सवात समावेश होता. या महोत्सवात  दर्दीप्रेक्षक, आणि मान्यवरांसोबतच गोयंकरांचे लक्ष वेधत ‘दशक्रिया’ने हाऊसफुल्ल प्रतिसाद मिळवीत बाजी मारली. या महोत्सवाला मनोज जोशी, अभिनेत्री – निर्माती कल्पना विलास कोठारी, अभिनेत्री उमा सरदेशमुख, आशा शेलार, अदिती देशपांडे, ‘रंगनील’चे नील कोठारी इत्यादी मान्यवर आवर्जून उपस्थित होते.

‘कान’ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात’ जगभरातल्या जाणकारांच्या पसंतीस उतरलेल्या ‘दशक्रिया’ची निर्मिती सौ. कल्पना विलास कोठारी यांच्या ‘रंगनील  क्रिएशन्स’ या संस्थेने केली आहे. चित्रपट निर्मितीत आपले दमदार पदार्पण करीत ‘दशक्रिया’ सारखा अत्यंत वेगळा विषय रसिकांसोमोर आणण्याचे धाडस त्यांनी केले आहे. ‘दशक्रिया’ या चित्रपटाने ३ राष्ट्रीय पुरस्कार, ११ राज्य शासन पुरस्कार, ४ संस्कृती कला दर्पण पुरस्कार आणि २ पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये  पुरस्कार असे सन्मान मिळविले आहेत. तसेच नुकत्याच जाहीर झालेल्या ९व्या ‘निफ’ या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात या चित्रपटाला तब्बल १३ विभागांमध्ये नामांकनं जाहीर झाली आहेत.

दशक्रिया’ चित्रपटाला ‘जोगवा’, ‘पांगिरा’, ‘७२ मैल एक प्रवास’ सारख्या दर्जेदार चित्रपटांचे लेखक – प्रस्तुतकर्ते संजय कृष्णाजी पाटील यांचे पटकथा, संवाद, गीत लेखन लाभलं असून जेष्ठ साहित्यिक बाबा भांड यांची ‘दशक्रिया’ ही बहुचर्चित साहित्यकृती, संदीप भालचंद्र पाटील यांचं दिग्दर्शन आणि सोबतीला अनुभवी सकस कलावंत तंत्रज्ञांची फौज या जमेच्या बाजूंमुळे ‘दशक्रिया’चा कॅनवास अधिक फुलून आला आहे.

या चित्रपटात जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, मनोज जोशी, अदिती देशपांडे, मिलिंद शिंदे, मिलिंद फाटक, उमा सरदेशमुख, आशा शेलार, नंदकिशोर चौघुले, संतोष मयेकर, उमेश मिटकरी, पंकज चेंबूरकर, अनुश्री फडणीस, रसिका चव्हाण, संदीप जुवाटकर, विद्यासागर अध्यापक, प्रशांत तपस्वी, अनिल राबाडे, उमेश बोलके, संस्कृती रांगणेकर, राहुल शिरसाट, सोनाली मगर, अभिजित झुंझारराव, गणेश चंदनशिवे, प्रफुल्ल घाग, मनोहर गोसावी, तृप्ती अटकेकर, विनोद दोंदे बालकलाकार आर्य आढाव, विनायक घाडीगावकर, कैवल्य पिसे, क्षितिजा पंडित, श्रेया चौघुले, यांच्यासोबत जवळपास १५० नवोदितांना अभिनयाची संधी मिळाली असून आनंदा कारेकर, जयवंत वाडकर, कल्पना कोठारी यांनी विशेष भूमिका केल्या आहेत.

जनसंपर्कात आपला वेगळा ठसा उमटवणारे राम कोंडीलकर यांनी या चित्रपटाची कार्यकारी निर्मिती केली असून जेष्ठ सिनेमॅटोग्राफर महेश अणे यांनी ‘दशक्रिया’चा कॅनव्हास जिवंत केला आहे. अमितराज यांचे संगीत चित्रपटाचे माधुर्य वाढविण्यात यशस्वी झाले असून स्वप्नील बांदोडकर, बालशाहिर पृथ्वीराज माळी, कस्तुरी वावरे, आरती केळकर, आरोही म्हात्रे यांनी स्वरांची उधळण केली आहे. नृत्य दिग्दर्शन सुभाष नकाशे यांनी केले असून चंद्रशेखर मोरे यांनी कलादिग्दर्शन केले आहे. स्टोरीबोर्ड आर्टिस्ट अनिल जाधव असून महावीर साबण्णवार यांनी सिंकसाऊण्ड डिझाईन केले आहे. रंगभूषाकार श्रीकांत देसाई यांनी आकर्षक रंगभूषा केली असून वेशभूषा सचिन लोवेलेकर यांची आहे. निर्मिती संकल्पना सौ.स्वाती संजय पाटील यांची असून सुनील जाधव यांनी संकलन केले आहे. पार्श्वसंगीत विजय नारायण गवंडे, मिलिंद जोशी यांनी दिले आहे तर स्थिर चित्रण किशोर निकम यांनी केले आहे.

About the Author

Sachin Murdeshwar
Sachin Murdeshwar is a Sr.Journalist and Columnist in several Mainline Newspapers and Portals.He is an ardent traveller and likes to explore destinations to the core.

Be the first to comment on "गोयंकरांनी अनुभवाला ‘दशक्रिया’"

Leave a comment

Your email address will not be published.


*